आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपद्वारे स्वयंचलित वाहनांना मिळणार ‘दृष्टी’, गुगल-उबरसारख्या कंपन्यांद्वारे चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंचलित कारनिर्मितीवर सतत प्रयोग सुरू आहेत. उबरने अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथील रस्त्यांवर १४ डिसेंबर रोजी अनेक स्वयंचलित वाहने उतरवली. अर्थात, परमिटशिवाय उतरवण्यात आलेल्या या कारवर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असला तरी या वाहनांसोबत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चालक देण्यात असल्यामुळे परमिटची आवश्यकता नाही, असे उबरचे मत आहे. जनरल मोटर्सदेखील लवकरच मिशिगनमध्ये स्वयंचलित कारची चाचणी घेईल. या सर्व चाचण्यांमध्ये एकसूत्रता असते.  

मेंदूने डोळ्याद्वारे उभी केलेली प्रतिमा ओळखणे हे काम कोणत्याही मानवनिर्मित प्रणालीसाठी अत्यंत कठीण असते. त्यामुळे ही क्षमता वाढवण्यासाठी सर्व कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अभियंते रस्ता ओळखण्यासाठी वाहनात अनेक सेन्सर्स लावत आहेत. एका सेन्सरने समोरून येणारा प्रवासी ओळखला नाही तर दुसरा सेन्सर तरी समोरील अडथळा ओळखून बचावासाठी योग्य पाऊल उचलू शकतो.  
 
स्वयंचलित कारमध्ये कॅमेरा, अल्ट्रासोनिक डिटेक्टर आणि रडार या तीन सेन्सर प्रणालींचा वापर केला जात आहे. या प्रणाली स्वस्त असून सहज वापरता येण्याजोग्या आहेत. लिडार ही चौथी प्रणाली लेझर स्कॅनिंगची असून याद्वारे कारच्या आजूबाजूला त्रिमितीय प्रतिमा उभी केली जाते. इतर तीन सेन्सर्सने जमा केलेल्या डेटावरून लिडारद्वारे ही प्रतिमा उभी केली जाते. लिडार प्रणाली मात्र महागडी (अंदाजे एका कारच्या किमतीएवढी), तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट, आकाराने मोठी आहे.  

आकाराने लहान आणि स्वस्त लिडार बनवण्यावर प्रयोग सुरू आहेत. लहान सिलिकॉन चिपचा एक पर्याय समोर आला आहे. डेल्फी, झेडएफसह ऑटोमोबाइल भागांच्या मोठ्या वितरकांना या चिपच्या कॉपी देण्यात आल्या आहेत. चाचणीत यशस्वी झाल्यास पुढील तीन वर्षांत लिडार चिप्स वाहनांमध्ये लावल्या जातील. 

इनफिनऑन या जर्मन चिपनिर्माता कंपनीने हे लहान लिडार तयार केले आहेत. रडार डिटेक्टरमध्ये लावल्या जाणाऱ्या चिपची ही सर्वात मोठी निर्माता कंपनी आहे. रडार रेडिओ लहरी पाठवते आणि समोरील वस्तूंशी टक्कर देऊन ते सिग्नल पकडते. लहरी पाठवणे आणि ते परत येण्यादरम्यानचा वेळ मोजला जातो. यावरून वस्तू किती दूर आहे हे कळते. वस्तू हलणारी असेल तर तिचा वेगही ओळखला जातो.  

१५ वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या रडार सेन्सरची किंमत ३ हजार डॉलर एवढी होती. इनफिनिऑनने आता हे सेन्सर्स चिपमध्ये बदलले. यामुळे किंमतही कमी झाली. लिडारचा आकारदेखील अधिक लहान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ६० च्या दशकात लेझरच्या निर्मितीनंतर सर्व्हेतील एका प्रक्रियेसाठी लिडार प्रणाली विकसित करण्यात आली. ही प्रणाली एखाद्या परिसराचा अंदाज घेण्यासाठी लेझर किरण पाठवून परत आलेले सिग्नल अोळखते. रेडिओ लहरींपेक्षा प्रकाशलहरींची लांबी कमी असल्याने लिडार लहान वस्तूंवरून तत्काळ परावर्तित होते. मात्र रडारच्या रेडिओ लहरी लांब असल्याने अशा वस्तू दुर्लक्षित होऊ शकतात.  

नकाशे बनवणे, हवामानातील बदल लक्षात घेणे, अपघात किंवा गुन्हा घडलेल्या ठिकाणाचा तपास करताना पोलिसांसाठी लिडारचा उपयोग होतो.  व्यावसायिक लिडारची किंमत ५० हजार डॉलरपर्यंत असते. मात्र लहान आकाराचे लिडार १० हजार डॉलरपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. 
 
भविष्यातील स्वयंचलित कारमध्ये सूक्ष्म लिडार, रडार, अल्ट्रासोनिक सेन्सर्स तसेच डिजिटल कॅमेरे असतील असे अभियंत्यांचे मत आहे. समोरील वस्तूचे अंतर आणि वेग ओळखण्याचे काम रडार करते.  अंधार आणि धुक्यातही ते काम करू शकते. मात्र त्यातील प्रतिमा वेगवेगळ्या करणे कठीण असते. तसेच रबरासारख्या काही वस्तूंवरून रडारच्या लहरी परावर्तित होत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर टायर्सचे ढीग असले तरी रडारला ते ओळखणे कठीण जाते.  दृश्यमानता स्वच्छ असल्यास कारच्या कॅमेऱ्यांद्वारे टायर दिसेल. लिडारद्वारे टायर ओळखले जाऊ शकतात, मात्र धुक्यांमध्ये त्यांची कार्यक्षमता कमी होते. 

गुगल, उबरसह बहुतांश कारनिर्मात्यांनी लिडारचा वापर सुरू केला आहे. लिडार प्रणालीविरोधातही काही कंपन्या आहेत. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीने मात्र लिडारचा उपयोग न करता स्वत:च्या यंत्रणेवर सुसज्ज कार तयार केल्याचा दावा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...