आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोसारखे काम अन्य सरकारी संस्थांकडून का होत नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने अंतराळात नुकतेच १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून जगात एक विक्रम प्रस्थापित केला. इस्रोच्या असामान्य यशानंतर एकच प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतो की, इस्रोप्रमाणेच सर्व सरकारी संस्था काम का करू शकत नाहीत?
 
 
विषयांचे तज्ज्ञ : वैज्ञानिक आणि विशेषज्ञांच्या आधारे इस्रोचे काम चालते, तर इतर सरकारी विभाग अशा अधिकाऱ्यांच्या हातात असतात, की जे आपापल्या विषयातील तज्ज्ञ नसतात. यातील त्यांना खूपच कमी माहिती नसते.
 
इस्रोचे सध्याचे अध्यक्ष अंतराळ विभागाचे सचिवदेखील आहेत आणि ते आपल्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. तर आरोग्य विभागाचे सचिव आयएएस अधिकारी असून त्यांना इतिहास आणि माध्यम संवादात पदवी मिळालेली आहे. इतर विभागांचीही हीच गत आहे. सरकारी धोरण तयार करण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. सामान्य शैक्षणिक पात्रता असलेल्यांकडून संबंधित विभाग अधिक सक्षमतेने चालवण्याची अपेक्षा करणे गैर आहे.  
 
दीर्घ कार्यकाळ : १९६३ मध्ये स्थापनेपासून इस्रोला आठ अध्यक्ष मिळाले. त्यांचा कार्यकाळ साधारण ७ वर्षांचा होता. दुसरीकडे १९५० पासून भारतात ३१ कॅबिनेट सचिव होऊन गेले. त्यांचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षे किंवा त्यापेक्षा थोडा अधिक होता. आपल्या विभागात जास्त वेळ मिळाल्यास प्रमुख व्यक्तीला विचार करण्यास आणि योजलेली कामे पूर्णत्वास नेण्यास पुरेसा वेळ मिळतो.  
 
पात्रतेवर भर : इस्रोमध्ये आरक्षणावर वैज्ञानिक नेमले जात नाहीत. इतर भारतीय संस्थांमध्ये जवळपास ५० टक्के कर्मचारी आरक्षणाच्या आधारे नियुक्त केले जातात.  
 
इस्रोतच विकसित नेते : डॉ. विक्रम साराभाई यांच्यापासून डॉ. सतीश धवन यांच्यापर्यंत इस्रोचे सर्व दिग्गज नेते याच संस्थेत दीर्घकाळ राहिले होते. यापैकी अनेकांनी जगातील प्रख्यात विद्यापीठांमध्ये शिक्षणही घेतले होते. कुणीही यूपीएससी पास करून इस्रोत आलेले नाही.
 
संस्थेअंतर्गतच शास्त्रज्ञांची अधिक तयारी करून घेणे आणि विकसित करण्याच्या धोरणामुळे इस्रोला खूप फायदा झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने जगात ख्याती होईल अशी अनेक कामे केली. इस्रोची स्थापना यापैकीच एक आहे. इस्रोसारखे यश साजरे करण्यासाठी इतर सरकारी विभागांनीही त्यापासून धडा घेऊन आपली काम करण्याची पद्धत बदलावी.
बातम्या आणखी आहेत...