आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची क्षमता वाढवण्यासाठी दुपारची वामकुक्षी लाभदायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोडीशी डुलकी घेण्याची वेळ काही ठरलेली नसते. जर सकाळी ६ वाजता आपण उठत असू अाणि रात्री १० ते १०.३० वाजता झोपत असू तर दुपारच्या वेळी थोडी झोप घेणे योग्य आहे. जर रात्री उशिरापर्यंत काम करत असलो आणि सकाळी ९ वाजता उठतो, तर दुपारी ३ ते ४ वाजता डुलकी घेणे चांगले असते. आपल्या दिनचर्येत थोडासा बदल केला तर अधिक ताजेतवाने राहू शकतो. थोडे उपाय केले पाहिजेत. म्हणजे दुपारी वामकुक्षी घेतल्याने आपणास कामात उत्साह येतो.


झोपेचे फायदे कोणते, यावर खूप काही वाचण्यात-ऐकण्यात आले आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले असण्यासाठी आठ तास झोप घेणे आपणास किती आवश्यक आहे, हे आपणास माहिती आहे. मात्र दुपारी थोडी डुलकी घेतली तर आपणात खूप उत्साहवर्धक बदल घडतो, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. क्षणिक आवेगात येणे किंवा चिडचिडेपणा येणे किंवा निरुत्साही वाटणे टाळण्यासाठी दुपारी थोडी वामकुक्षी घेणे आवश्यक आहे.
संशोधकांनी १८ ते ५० वर्षे वयोगटातील काही लोकांचा अभ्यास केला. त्यानंतर जाणून घेतले की, तीन रात्री झोपल्यानंतर या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी निद्रानाशाशी निपटण्याची क्षमता तपासण्यासाठी कॉम्प्युटरवर आधारित चाचणी दिली. यात एक अशक्य काम करण्याचे आव्हान होते. याचबरोबर त्यांनी आळस, मूड, आणि तणातणी यावरून काही प्रश्नही विचारले. नंतर त्यांना एक तासाची झोप किंवा जगाशी संबंधित एखादा व्हिडिओ पाहण्यास सांगितले. "पर्सनॅलिटी अँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस' यात प्रकाशित अध्ययनानुसार डुलकी घेणे किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतरचे निरीक्षण नोंदवले गेले होते. डुलकी घेण्याआधी प्रत्येकाने ते आव्हान पूर्ण करण्यासाठी एकसारखी वेळ दिली. तथापि, नंतर डुलकी घेणाऱ्यांनी हे आव्हान पूर्ण करण्यासाठी खूप वेळ दिला. मात्र डुलकी न घेणाऱ्यांनी आपले प्रयत्न अर्धवट सोडून दिले.

या अध्ययनाची प्रमुख लेखिका आणि मिशिगन विद्यापीठाची संशोधक जेनिफर आर. गोल्डश्माइड हिने सांगितले, अभ्यासासाठी देण्यात आलेले सॅम्पल छोटे होते. लोकसंख्येच्या इतर वर्गांवर हे लागू होत नसेल. परंतु आलेले निष्कर्ष मात्र बहुमोल आहेत. डुलकी घेण्याचे किती चांगले परिणाम दिसून येतात, हे समजून घेण्यास आम्हाला खूप मदत मिळाली. त्यांनी सांगितले, लोकांना आता लक्षात येऊ लागले आहे की, थोडी थोडी डुलकी घेतल्याने काम करण्यात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत किती चांगला परिणाम होऊ शकतो. मात्र, छोट्या समूहावर प्रयोग करणे आणि झोप व जागेपणातील अवस्था मोजताना इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग न करण्याबाबत त्यांनी मान्य केले. पण डुलकीमुळे निद्रानाश नाहीसा होऊ शकतो हेच खूप महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ गेम खेळल्याने मानसिकतेत बदल
व्हिडिओ गेम खेळणे आपले मन:स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योग्य ठरू शकते. केंब्रिजचे संशोधक अॅमिली ए. होम्स आणि अॅला एल. जेम्स यांना संशोधनाअंती आढळून आले की, व्हिडिओ गेममुळे लक्ष विचलित होण्यापासून सुटका होऊ शकते. या चाचणीत भाग घेणाऱ्यांना अप्रिय दृश्ये दाखवण्यात आली. त्यानंतर टेट्रिस नावाचा व्हिडिओ गेम खेळण्यास सांगितले गेले. नंतर असे आढळून आले की, व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांच्या मनात पुढच्या सात दिवसांत खूप कमी दृश्ये लक्षात होती. अॅल्यूड नावाचा व्हिडिओ गेम गँगरिन झालेल्या रुग्णांना त्यांचा आजार समजून घेण्यास सहायक ठरतो. तर "स्नो वर्ल्ड ' गेम शारीरिक दुखण्यापासून आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो.
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...