आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलुचिस्तानवरून आक्रमक भूमिका; पाकला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बलुचिस्तानात पाककडून करण्यात येणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित झाला, याचा उल्लेख पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी भाषणात केला होता. भारताने आजवर काश्मीरच्या मुद्द्यावरून बचावात्मक पवित्रा घेतला होता.
पाकिस्तान आपल्यावर काश्मीर बळकावण्याचा आणि तेथील लोकांवर अत्याचार करत असल्याचे आकांडतांडव करत होता आणि आपण विचारपूर्वक परिपक्व राजकीय भाषेत उत्तर देत होतो. मात्र, बलुचिस्तानात होत असलेल्या अत्याचारावर आज आपण पाकच्याच भाषेत त्यांना सुनावत आहोत, तर बलुचिस्तानमध्ये आपण हिंसाचार भडकावत असल्याचा अारोप पाक करतो आहे.

पाकिस्तान सरकारच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये जनता रस्त्यावर उतरली असून तेथे मोठ्या प्रमाणावर स्वतंत्र बलुचिस्तानाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. यात हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत. मोदींनी आपल्या भाषणात केवळ धमकीच दिली नसून देशात शांतता कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला कडक शब्दांत इशाराही दिला आहे. दहशतवाद्यांचे समर्थन करणारा पाकिस्तान हा एकमेव देश आहे.

परंतु पाककडून अशा कारवाया चालूच राहणार आहेत. जर पाकिस्तानने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर त्यांची अवस्था आणखी वाईट होईल. जगातील सर्व देश पाककडे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून पाहू लागतील. ते काहीही असले तरी पाक आणि भारत
अण्वस्त्र संपन्न देश आहेत. यामुळे जास्त संघर्ष घडला तर युद्ध होण्याचा धोका आहे. यामुळे आपल्या देशाकडून नेहमी शांततेच्या मार्गाने बोलणी सुरू करण्याचे प्रयत्न होते. परंतु पाकिस्तानने या वेळी काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवून आपली मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत भारताचे आक्रमक धोरण स्वागतार्ह आहे.

निकिता आनंद, २७
नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट भोपाळ
बातम्या आणखी आहेत...