आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकोरी सोडाल तरच होईल देशात परिवर्तन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला शालेय जीवनातील तो काळ अाठवत असेल. शिक्षक विचारतात, तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनाल? मला असे वाटते की, अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंता किंवा सीए होण्याची इच्छा व्यक्त करणारे फार जण नसतील. त्या वयात मुले गायक, अॅक्टर, डान्सर, अॅथलिट किंवा अॉफबीट करिअर सांगत होती. अाता तुम्ही मोठे झाला असाल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा सध्याच्या नोकरीत संतुष्ट आहात काय? तुम्हाला मोठा पगार मिळत असेल. मग लहानपणी तुम्ही असे ठरवले होते काय? हीच खरी समस्या आहे. माणूस ज्या क्षेत्रात जायची इच्छा करतो त्यापेक्षा वेगळ्याच क्षेत्रात जातो. समाज आणि पालकांचा दबाव याचे मूळ कारण असते.

परदेशात शारीरिक शिक्षण त्याच विषयाचे शिक्षक देतात. भारतात पीटीच्या शिक्षकांना इतर विषयही शिकवावे लागतात. कारण खेळापेक्षा गणित आणि विज्ञान विषय महत्त्वाचे वाटतात. नाच, गाणे आणि कला हे विषय गौण आहेत. हे विचार रिओ ऑलिम्पिकच्या कामगिरीवरून डोक्यात आले. भारतातील बहुतांश लोकांना दीपा कर्माकार आणि पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक कोण आहेत हे माहितीच नव्हते. आपण केवळ आयएएस अधिकारी, आयआयटीयन एमबीए करणाऱ्या लोकांकडे आदराने पाहतो.

खेळाडूंना ऑलिम्पियन किंवा क्रिकेटर झाल्याशिवाय ओळख मिळत नाही. हे खेळाडूसोबतच होते असे नव्हे तर कलावंत व्हायचे असेल तर पालकांना डॉक्टर व्हावे, असे वाटत असते. मुलांचा अभ्यास चांगला नसेल तर त्याला शिक्षा दिली जाते. करिअरचे पर्याय अथांग सागराप्रमाणे आहेत; परंतु भारतीय समाज काही पर्याय स्वीकारण्यास तयार नाही. एका सामर्थ्यशाली आणि अधिक वाव असणाऱ्या नाच, गाणे, विनोदी कलावंत होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायला हवे. त्यांना पूर्णकालीन करिअर निवडीसाठी मूलभूत सेवा-सुविधा द्यायला हव्यात.

(जागरण लेक सिटी, भाेपाळ)
बातम्या आणखी आहेत...