आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुभव आणि प्रतिमा वापरून मुद्दा पटवून द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका चांगल्या लीडरसाठी आपल्या कामाबरोबरच दुस-या विभागांची, विशेषत: कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही डेटा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन अथवा फोकस ग्रुपची मदत घेऊ शकता. ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी वैयक्तिक जीवनातील उदाहरणे घ्या. लीडरच्या भूमिकेबाबत हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने काही टिप्समधून दिलेली ही माहिती...
प्रेक्षकांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा - वक्तृत्वावर तुमचे प्रभुत्व असेलच असे नाही. परंतु तुमचे म्हणणे पटवून देण्यासाठी वैयक्तिक जीवनातील उदाहरणे घ्या. कसलेला वक्ता एखाद्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपले म्हणणे पटवून देण्याचा आणि परिस्थितीशी एकरूप करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे अन्य एखादे उदाहरण देऊन तो महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करतो. त्यामुळे ‘तुमचा मुद्दा महत्त्वाचा का आहे?’ हे समजावून सांगणे सोपे जाते. तुमचे म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रतिमा आणि अनुभवाचा वापर करू शकता. त्यामुळे कमीत कमी शब्दांत सबंध मुद्दा मांडता येतो. (स्रोत : लर्निंग चरिसमा, लेखक : अँटोनाकिस, मारिका फेनले आणि स्यू लेचिटी)
डेटाच्या मदतीने करा परफॉर्मन्सचे मूल्यमापन - तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सच्या मूल्यमापनासाठी मानदंड ठरवले आहेत. परंतु कंपनीचा परफॉर्मन्स माहीत करून घेताना या तीन गोष्टींची खबरदारी घ्या-
स्पर्धकांवर लक्ष ठेवा- अन्य स्पर्धकांशी तुलना करा. हा डेटा सहज उपलब्ध होणार नाही. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.
नवे मानदंड ठरवा- झाले गेले विसरून जा. नवीन मानदंड तयार करा. कंपनीच्या उपलब्धीसाठी आज जे निर्णय घेतले, ते उद्या उपयोगी ठरतीलच असे नाही.
गुणात्मक मूल्यमापन करा- डेटामुळे वस्तुस्थितीचे पूर्णपणे आकलन होत नाही. संख्यात्मक डेटाबरोबरच गुणात्मक मूल्यमापनही करा. त्यामुळे तुम्हाला वस्तुस्थिती कळण्यास मदत होईल.
(स्रोत : गाइड टू फायनान्स बेसिक्स फॉर मॅनेजर्स)
वित्त अहवालामधून कळेल वस्तुनिष्ठ परिस्थिती
आर्थिक स्थितीवरून कंपनीची वस्तुनिष्ठ परिस्थिती कळते. लीडर या नात्याने कंपनीची आर्थिक स्थिती माहीत करून घ्या. आकड्यात मोजता येऊ शकत नाहीत अशा बाबींकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या.
1. सर्वेक्षण अहवालावर विसंबून राहा
आर्थिक आकडे कंपनीला होणा-या धोक्याची माहिती देत नाहीत. संभाव्य धोक्यांसाठी कर्मचारी, फोकस ग्रुप, सर्वेक्षण अहवाल, मुलाखती आदींवर विसंबून राहू शकता.
2. ग्राहकांच्या मनातले समजून घ्या
ग्राहक तुमच्या उत्पादनाबाबत काय विचार करतो? तो एकदा वापरल्यानंतर उत्पादन दुस-यांदा वापरू इच्छितो का? हे समजून घ्या.
(स्रोत : गाइड टू फायनान्स बेसिक्स फॉर मॅनेजर्स)
केवळ आदेश दिल्याने टीमचे मनोधैर्य खचेल
लीडर या नात्याने टीम किंवा युनिटला प्रत्येक वेळीच केवळ आदेश किंवा निर्देश देऊ नका. त्यामुळे टीमचे मनोधैर्य खच्च्ी होऊ शकते. पुढच्या वेळी टीमशी बोलताना ‘हे काम असे झाले पाहिजे’ असे सांगण्याऐवजी ‘कदाचित माझे चुकत असेल परंतु हे काम या पद्धतीनेही करता येऊ शकते’, असे सांगा. निर्देशाऐवजी हायपोथिसिस द्या. एखादा कर्मचारी जर चांगला तोडगा सुचवत असेल तर तुमचे हायपोथिसिस सोडून द्या. लीडरच्या या सकारात्मक अ‍ॅप्रोचमुळे लोक मोकळेपणाने आपले विचार मांडू लागतील. (स्रोत : ‘मॅनेजिंग युवरसेल्फ - एक्स्ट्रीम प्रॉडक्टिव्हिटी,’ लेखक : रॉबर्ट सी. पॉजन)
तुमचे म्हणणे स्पष्ट व प्रांजळपणे मांडा
अन्य कौशल्यांच्या तुलनेत आपले म्हणणे प्रांजळपणे मांडणारे कर्मचारीच चांगला परफॉर्मन्स देतात. परफॉर्मन्स वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा -
1. स्पष्ट मत मांडा- सरळ आणि स्पष्टपणे मते मांडणारा लवकर पुढे जातो. आत्मविश्वासाने टीमचे मन जिंका. त्यामुळे ते मोकळेपणाने आपले विचार मांडू लागतील.
2. ठोस पावले उचला- सकारात्मक बदलासाठी बोल्ड अ‍ॅप्रोच आवश्यक आहे. बदलाच्या काळात येणा-या समस्यांवर स्पष्ट चर्चा करा. त्यामुळे सहजपणे समस्येची सोडवणूक करता येईल.
3. प्रामाणिकपणे बोला- स्पष्ट आणि प्रामाणिकपणे विचार मांडल्यामुळे तुम्ही सहजपणे सत्यासाठी आवाज उठवू शकला.
(स्रोत : ‘द वन स्कील ऑल लीडर्स शुड वर्क ऑन’, लेखक : स्कॉट अ‍ँडिगर)
कर्मचा-याचे खरे कौशल्य ध्यानात घ्या
टीममधील सर्वच सदस्य प्रत्येकच गोष्टीवर सहमत असतीलच असे नाही. कौशल्य ओळखण्यात गल्लत झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती तीन प्रकारे दूर करता येऊ शकते-
1. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा
प्रत्येक कर्मचा-याचा दुस-या कर्मचा-याच्या कौशल्याबाबत वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे आपले कौशल्य चांगल्या प्रकारे समजावून या समस्येतून मार्ग काढता येऊ शकतो.
2. तुमचाही दृष्टिकोन सांगा
एखाद्याला काम देताना किंवा सल्ला घेताना त्या व्यक्तीकडे ते इनपुट देण्याइतपत ज्ञान आहे का, हे लक्षात घ्या.
3. बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या
लोकांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे समस्या लवकर सुटण्यास मदत होते.
(स्रोत : ‘मॅनेज युवर टीम्स डिससेन्सिस’, लेखक : हेडी के. गार्डनर)