आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ वर्षांपूर्वीची चोरीस गेलेली कार अधिकाऱ्यांनी शोधली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: जर एखादी कार किंवा अन्य वाहन चोरीस गेले तर काही वर्षांतच ती फाइल बंद केली जाते. द. आफ्रिकेतील प्रिटोरियाच्या तपासी अधिकाऱ्यांनी मात्र तब्बल २२ वर्षांपूर्वी चोरीस गेलेली कार शोधण्यात यश मिळवले आहे. तेथील एक व्यावसायिक डेरिक गुसन यांना तपासी अधिकारी वाकवा टोकोला यांनी फोन करून आश्चर्याचा धक्का दिला. टोकोला यांनी सांगितले,
त्यांची १९८८ च्या माॅडेलची कार चोरीस गेलेली ग्रे कलरची टोयाेटा कार सापडली आहे. गुसन यांनी १९९३ मध्ये कार चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. टोकोला यांच्या मते, लिम्पोपो राज्यात पोलिसांनी इंजिनच्या नंबराची खाडाखोड केलेली कार ताब्यात घेतली होती. पोलिस कर्नल रोनेल ओट्टो यांनी सांगितले, टोकोला यांनी त्या कारचा क्रमांक मिळवण्यात यश प्राप्त केले. गुसन यांनी
टोकोला प्रामाणिक अधिकारी असल्याची प्रशंसा केली. इंजिनाच्या क्रमांकाबरोबरच कारचे मालक डेरिक गुसन असल्याचे माहिती झाले. गुसन यांना आपली कार परत मिळाल्याचा आनंद आहे. या कारसोबत माझ्या काही आठवणी आहेत. आता याची डेंटिंग-पेंटिंग करेन आणि दूर प्रवासास जाईन. तपासी अधिकारी टोकोला यांचे त्यांनी आभार मानले आहेत.Âjamaicans.com
बातम्या आणखी आहेत...