आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींना खुले पत्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अशी व्यक्ती, ज्याने तुमची, तुमच्या कुटुंबाची किंवा पक्षाची कित्येक दशकांपासून सेवा केलेली नाही, ती तुम्हाला भेटूच शकत नाही. म्हणून नाइलाजाने हे खुले पत्र लिहावे लागत आहे. देशात आणि राजकारणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे तुम्ही नुकतेच म्हटले आहे. तुम्ही या मूळ मुद्द्यावर आणि जनतेसमोर इतकेही बोललात, हाच तुमच्यातला मोठा बदल आहे.

बोलणे जरी सोपे असले तरी, तुमचे हेतू , विचार आणि आदर्शवाद प्रत्यक्षात आणणे कठीण वाटते. तुमच्याजवळ 1.2 अब्ज लोकांचे नशीब बदलण्याची संधी आहे. एक तर या संधीचा फायदा घेऊन त्यांचे नशीब बदलू शकता किंवा या देशातील इतर राजकीय नेत्यांप्रमाणे, आपला आणि नातेवाइकांचा फायदा करून घेऊ शकता. तुम्ही हेही खरे सांगितले की, आपण लोकांचे म्हणणे ऐकले पाहिजे, चांगले राजकारणी तयार करावे लागतील आणि युवकांना संधी दिली पाहिजे. तुमचे भाषण लिहिणाºयांनी लोकांना ज्या गोष्टी बोललेल्या आवडतात, ते सर्व मुद्दे भाषणात घेतले होते; परंतु तुम्हाला हे निश्चितपणे माहिती आहे की, तुमच्यासारख्या व्यक्तीला हा बदल घडवून आणणे किती कठीण जाणार आहे. अनेक लोकांना आपली क्षमता, हेतूबद्दल शंका आहे, किंवा असेही म्हणता येईल, दोहोंवर संशय आहे. तुमच्या वलयांकित परिवारामुळे बहुतांश व्यक्ती तुम्हाला युवराज म्हणून पाहतात. याच कारणाने सोशल नेटवर्किंगमध्ये तुमच्या कार्यापेक्षा तुमच्याबाबतीत घडवलेले विनोदच लोकप्रिय आहेत. आपल्या देशात निंदानालस्तीच जास्त होते. यामुळे कदाचित असे असावे. अथवा सत्तास्थानावर बसलेल्या लोकांनी निराशही केले आहे; पण तुमची इच्छा प्रामाणिक आहे, तुम्ही जे बोललात ते साध्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे मी गृहीत धरतो.

पण हे होणार कसे? जी यंत्रणा राजकीय नेत्यांच्या घराण्यासाठी राबवण्यात येते, तिला तुम्ही कसे बदलणार? हे तुम्हीसुद्धा पाहत आला आहात. ज्यांनी तुमच्या आजींची हत्या केली अशा विश्वासू सुरक्षारक्षकांचा उल्लेख तुम्ही तुमच्या भाषणात केला; पण तुमच्या पक्षातील अनेक विश्वासू नेते देशाचे नुकसान करत आहेत, त्यांना कसे रोखणार?
अनेक लोकांना असे वाटते की, तुम्हाला जवळपास अमर्याद अधिकार आहेत, पण हे खरे नाही. केंद्रात तुमचे संख्याबळ वाढवण्यासाठी अनेक दिग्गज काँग्रेस नेते मदत करतात. जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्या हितसंबंधांना धक्का बसेल असे काही उपाय योजले तर ते तुमच्यापासून दूर होऊन तुमच्या विरोधातही जातील. अशाने तुमचे बळ आणखी कमी होईल आणि आजच्या तुलनेत परिस्थिती आणखी नाजूक होईल. काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला अथवा नाही केलात तरीही तुम्हालाच दोषी धरले जाते. ही एक गुंतागुंतीची परिस्थिती असते.
मग काय सर्व आशा संपुष्टात येतात का? नाही. तुम्ही बदल घडवून आणू शकता, पण हे अचानक घडणार नाही. तुम्हाला लोकांना हळूहळू बदलाकडे न्यावे लागेल. वाईट गोष्टी रात्रीतून चांगल्या होत नसतात. वाईटपणा हळूहळू कमी होत जातो आणि हळूहळू तो चांगला बनतो. यासाठी आपला स्वत:वर विश्वास पाहिजे. तुम्हाला निवडणुका जिंकण्यापेक्षा आपली तत्त्वे आणि मूल्यांवर जास्त भर द्यावा लागेल. जर चांगल्या गोष्टीसाठी निवडणूक हरलात तरी तो तुमचा विजयच असेल. तुम्ही तरुण आहात, तुमच्याजवळ धैर्य आहे, तर पुढची निवडणूक ही एकमेव गोष्ट नाही.

तरुणांचा राग शांत करण्यासाठी माझी एक सूचना आहे की, राजकारणी आणि उद्योगपतींची युती तोडली पाहिजे. यामुळे खºया अर्थाने अर्थव्यवस्था उदार बनेल. आर्थिक सुधारणांच्या पहिल्या टप्प्यात विकास आणि रोजगारात वाढ झाली होती, पण नंतर नोकºया थांबल्या. कारण, मर्यादित उदारीकरणामुळे उद्योगपतींबरोबरच त्यांचे घनिष्ठ सहकारीच जास्त निर्माण झाले. सरकारचे अजूनही अनेक गोष्टींवर नियंत्रण आहे: तेच उद्योजक यशस्वी होतात, जे राजकारण्यांना खुश ठेवतात.
प्रथमवर्गीय राजकारणी द्वितीयवर्गातील भांडवलदार यांचे साट्यालोट्याचे संबंध तोडले पाहिजेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पाठीशी घालणे बंद करा, या ठरावीक उद्योगपतींना पाठीशी घातल्याने तृतीयवर्गातील थोडेफार श्रीमंत आणि सुशिक्षित मध्यमवर्गांना, चतुर्थवर्गीय बहुसंख्य वंचितांना पर्यायाने देशाला अडचणीचे जात आहे.
उद्योगधंद्यांना चालना द्या, पण काही विशिष्ट उद्योजकांना नव्हे. नियम व कायदे असे तयार झाले पाहिजेत जे प्रायोगिक अथवा धाडस दाखवण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी घालतील. तसेच त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतील. राजकारण्यांना वाचवण्यासाठी या कायदे व नियमाचा वापर होईल.

भ्रष्टाचाराचा पसरलेला रोग यांसारख्या समस्या सोडवणे खरेच अवघड आहे, पण राजकारणी आणि उद्योजकांचे हितसंबंध तोडणे किंवा उद्योगधंद्यांना चालना देणे ही कामे साध्य होऊ शकतात.
माझे आपणास हेही सांगणे आहे की, तुम्ही नेहमी बोलते व्हावे. लोकांच्या आणि माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे. बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची हे खरे आहे, पण लोकांशी संवाद साधल्याने तुमचा साधेपणा आणि लोकांचे मत जाणून घेण्याची इच्छा दिसून येईल. भलेही लोक तुम्हाला युवराज म्हणून पाहत असतील, पण तुम्ही मनापासून लोकांची चिंता करता, हे सिद्ध होईल. तुम्ही अनेक लोकांचा विश्वास गमावलेला आहे. तो पुन्हा कमवावा लागणार आहे. कारण, जेव्हा तुम्ही एखादा पेच निर्माण करणारे बदल करत असाल तर ते तुमचे समर्थन करतील. त्यामुळे बोला, तुमच्यासाठी हेच गरजेचे आहे.

chetan.bhagat@gmail.com