आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीला विरोध करणारे चार मुद्दे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना चार प्रमुख मुद्दे मांडले जात आहेत. त्यांचे विश्लेषण करूया.
१- हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपयांची नोट का आणली?
२००१ मध्ये पाचशे आणि हजार रुपयांचा चलनातील वाटा ३० टक्के होता, तर २०१५ मध्ये तो ८६ टक्क्यांवर पोहोचला. यादरम्यान भारताची आर्थिक वृद्धी झाल्याने लोकांना मोठ्या नोटांची गरज भासू लागली. दोन हजारची नोट काढण्यामागेदेखील हेच कारण आहे. खर्चात कपात हेदेखील एक कारण आहे.

२- नोटाबंदीमुळे प्रचंड अव्यवस्था झाली, काही बळीही गेले
भारतात एक लाख लोकांमागे व्यावसायिक बँकांच्या १३ शाखा आहेत. पन्नास दिवसांचा काळ खूप मोठा आहे.

३० डिसेंबरपर्यंत बँकेचे दहा तास मोजले, तर एका कुटुंबातील एका सदस्याला रांगेत उभे न राहता व्यवहारासाठी सुमारे २० मिनिटे लागतील. नागरिकांनी नियोजनपूर्वक आणि संयम राखल्यास सर्व कामे मार्गी लागू शकतील.

३- हातावर पोट भरणाऱ्यांची समस्या
या समस्येवर एक प्रश्न विचारावा वाटतो, मनरेगात काम करणारा मजूर चेक स्वरूपात वेतन स्वीकारू शकतो, तर बांधकाम मजूर किंवा लग्नासाठीचे केटरर्स चेक का नाही स्वीकारत? हजार आणि पाचशेच्या नोटांचा ८६ टक्के वाटा काढला तरी अजूनही १४ टक्के वाट्याच्या नोटा चलनात आहेत. याचे समान वितरण झाल्यास प्रत्येक कुटुंबाला ९ हजार रुपये मूल्याच्या छोट्या नोटा मिळू शकतात.

४- सामान्यांच्या पैशातून बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले जात आहे
बँकांमध्ये सामान्यांनी जमा केलेले पैसे नागरिकांना कधीही काढता येऊ शकतात.
वरील आकडेवारी तंतोतंत खरी नसली तरी यावरून एका नव्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्याची आशा नागरिकांकडून करता येऊ शकते.
दिवाकर झुराणी, २७
द फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी टफ्ट युनिव्हर्सिटी, अमेरिका.
बातम्या आणखी आहेत...