आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या संवेदनशीलतेच्या मर्यादा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मानवी समाजात न्यायाच्या शोधाची गरज इतक्या व्यापक प्रमाणावर का भासते, असा सवाल अमर्त्य सेन यांनी त्यांच्या ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या पुस्तकात उपस्थित केला आहे. त्यांच्या मते माणसाला माणसाविषयी वाटत असलेली सहानुभूती आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याची असलेली प्रबळ इच्छा ही त्याची प्रमुख कारणे आहेत. दुस-याचे दु:ख किंवा अपमान हा आपलाच अपमान आहे, अशी अनुभूती म्हणजे सहानुभूती.

गतवर्षीच्या थंडीच्या शेवटच्या आठवड्यात मानवी सहानुभूतीची भावना व्यापक प्रमाणावर दिसून आली. जेव्हा तरुणांनी देशाच्या राजधानीतील रस्त्यावर उतरून आपले दु:ख आणि लोकक्षोभाचे दर्शन घडवले. छोट्याशा ठिणगीचा अचानक भडका होणे हा आमच्या सार्वजनिक जीवनातील असामान्य क्षण होता.सामुदायिकपणे आम्ही विरोध दाखवून देण्यासाठी अशा प्रकारे एकत्र यासाठी आलो की त्या निष्पाप, पीडित व्यक्तीच्या वेदनेची तीव्रता आपणच अनुभवली, म्हणूनच न्याय मागण्यासाठी निघालो.

पाशवी गँगरेपला बळी पडलेल्या तरुणीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मी त्याच दिवशी संध्याकाळी जंतर-मंतरवर गेलो होतो. तेथे एका बाजूला राजकीय पक्षाशी संबंधित तरुण टीव्ही कॅमे-या समोर प्रक्षोभक घोषणाबाजी करत होता, तर त्यांच्या शेजारीच मोठ्या संख्येने जमलेले तरुण मूकपणे बसून मेणबत्त्या पेटवून मृताच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत होते. तसे पाहिले तर शिकूनसवरून वैद्यकीय व्यवसायिक होणे किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहण्यास जाण्याची सर्वसाधारण इच्छा असणा-या त तुमची व माझी मुलगी, बहीण किंवा मैत्रीणही असू शकते. या कारणामुळेच त्या तरुणीवर कोसळलेली आपत्ती जणू आपल्यावरच आली आहे, इतके एकरूप झालो, जिचे नाव आणि चेहराही पाहिलेला नाही.

या सरत्या आठवड्याबरोबरच मला आमच्या संवेदनशीलतेच्या मर्यादाही लक्षात आल्या. 1992 मध्ये राजस्थानात भंवरीदेवी नावाच्या कनिष्ठ वर्गातील महिलेने बालविवाह रोखला म्हणून तिच्यावर सामुदायिक बलात्कार करण्यात आला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध न्याय मागण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. या वेळी तिला पोलिस आणि वकिलांनी वारंवार लांच्छनास्पद वागणूक दिली. गावक-या नी तिला नव-या सह बहिष्कृत केले. महाराष्ट्रातील खैरलांजी गावात एक दलित महिलेवर अमानुष बलात्कार करून तिची हत्या केली गेली. तीसुद्धा अशासाठी की सवर्ण जातीतील लोकांना तिच्या कुटुंबाची उन्नती पाहवली गेली नाही. ग्रामीण दलित महिला तर पिढ्यांपिढ्यांपासून किंवा जुन्या काळापासून अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार सहन करत आल्या आहेत.

जातीय दंगलींच्या काळात बलात्कारांची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत.2004 मध्ये मणिपूरमध्ये सशस्त्र दलांच्या जवानांनी मनोरमा नावाच्या युवतीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने तेथील महिलांना इतके व्यथित केले की या घटनेच्या विरोधात अनेक महिलांनी लष्कराच्या कार्यालयासमोर विवस्त्रावस्थेत निदर्शने केली.

ज्या शहरात आपण राहतो, तेथे सर्वाधिक असुरक्षित तर बेघर महिला आणि मुली असतात. आमच्या पहिल्या नारीनिकेतन केंद्राच्या स्थापनेनंतर तेथे राहण्यास आलेल्या महिलांना मी विचारले, येथे आल्यानंतर त्यांना कोणता बदल जाणवला तेव्हा एका महिलेने सांगितले, ‘सतरा वर्षांनंतर मी येथे पहिल्यांदाच शांतपणे झोपू शकले. कारण रात्रीच्या वेळी आता माझ्याशी कोणी छेडछाड करणार नाही.’रस्त्यावर राहून गुजराण करणा-या महिलांवर दर दोन-तीन दिवसांआड बलात्कार होतात. त्या असहाय महिला असे अत्याचार रोखूही शकत नाहीत.

याबरोबरच घरकामासाठी किंवा वेश्या व्यवसायासाठी लहान वयाच्या मुलींना शहरात आणून विकण्याच्या घटनाही घडतात. अनेक मुलींनी सांगितले, आमच्या घरी रोज रोज होणा-या मारहाणीला कंटाळून त्या पळून आलेल्या आहेत. काही मुली अशाही होत्या की त्यांच्यावर बापच अत्याचार करत असे. असे असूनही या महिला किंवा मुलींसाठी आपण मोर्चे काढत नाही की मेणबत्त्या पेटवत नाही. यावरून स्पष्ट होते की आपल्या संवेदनशीलतेला काही मर्यादा आहेत. आमच्या संवेदनशीलतेच्या मार्गात सर्वात मोठा अडसर पीडितांसाठी नसून असे भयानक गुन्हे घडवणा-या चा असतो. तेसुद्धा आमची दया किंवा थोडा तरी विचार करण्याइतके लायक नसतात का?

त्या 17 वर्षीय मुलाचेच उदाहरण घ्या, ज्याने दिल्ली गँगरेपमध्ये बळी पडलेल्या युवतीवर अशा भयानक कृत्याच्या घटनेत कथितरीत्या सहभाग घेतला, तो वयाच्या 13 व्या वर्षीच घरातून पळून आलेला होता. का आला होता त्याचे कारण माहीत नाही. पण माझे सहकारी आणि मी अशा अनेक मुलांचा सांभाळ करतो, ज्यांची कहाणी या मुलांसारखीच आहे.

अशी मुले मुख्यत: लहानपणीच झालेल्या अत्याचारास किंवा दारुड्या बापाकडून सतत होणा-या मारहाणीस कंटाळून पळून आलेली होती. रस्त्यांवर ही असहाय मुले वर्दीधा-या कडून किंवा वयस्कर गुंडांकडून शिवीगाळ, मारहाण, शोषण सहन करतच मोठी होतात. त्यांना प्रेम देणारी, संरक्षण आणि विश्वास ठेवून योग्य मार्ग दाखवणारी, योग्य-अयोग्याची जाणीव करून देणारी जबाबदार वयस्क मंडळी त्यांना भेटलेली नसतातच.
जर आम्ही आपले कर्तव्य समजून, या रस्त्यावरील मुलांपर्यंत दयाभावना आणि त्यांच्याशी समरस होण्यासाठी पोहोचलो, तर त्यांच्यात सुधारणा होऊ शकते. कायद्याची पदवीधर वेदकुमारीने प्रश्न उपस्थित केला की, त्यांना पशू बनवण्यात जबाबदार कोण? युवा न्याय विभाग त्यांच्यापर्यंत का पोहोचला नाही? त्यांची अशी प्रवृत्ती बनण्यापासून रोखण्यात का आले नाही?

या गुन्ह्यात सहभागी अन्य लोकांचा विचार करूया. आपण बिनधास्तपणे एक डोळे दिपवणारे, चंगळवादी असे अत्यंत स्वैराचारी जग निर्माण केले. अशा जगाशी त्यांचा सातत्याने संबंध आला, पण त्यामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त होते. तरीही यातील कोणालाही अशा अमानुष कृत्यासाठी माफ केले जाऊ शकत नाही. तरीही एक अनमोल तारुण्याचे जगणे आपल्यापासून हिरावून घेतले. त्या घटनेला कोठे ना कोठे आपणदेखील जबाबदार नाही ना, याचाही अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)