आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘टार्गेट’ गिलानी (विशेष लेख)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान युसूफ रझा गिलानी गुरुवारी स्वत: कार चालवत न्यायालयात पोहोचले. न्यायालयात ते म्हणाले की, राष्ट्रपती झरदारी या पदावर दोनतृतीयांश बहुमताने पोहोचले असून त्यांच्या विरोधात खटला सुरू करणे चुकीचे आहे. त्यानंतर न्यायालयाने एक फेब्रुवारीपर्यंतची तारीख दिली. पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव 22 मार्च 2008 रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज), अवामी नॅशनल पार्टी, जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ) व मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या त्याच्या मित्रपक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. सरायकी भाषा क्षेत्रातून निवडून आलेले गिलानी हे पहिले पंतप्रधान आहेत. फोर्ब्सच्या सर्वात शक्तीशाली लोकांच्या 2009 साठीच्या यादीत गिलानी 38व्या क्रमांकावर होते. त्यांनी फोरमॅन ख्रिश्चियन कॉलेज युनिव्हर्सिटीतून इंटरमिजिएट आणि पंजाब विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
सय्यद मुसा यांचे वंशज
गिलानी यांचा जन्म 9 जून 1952 रोजी कराची येथे झाला. ते मुलतान येथील प्रभावी राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचे वडील सय्यद मुसा पाकिस्तानचे मूळ रहिवासी होते आणि सूफीवादाच्या कादिरी धारेचे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. गिलानी यांचे आजोबा अफगाणिस्तानातील पाकतिका प्रांतातून आले होते.
राजकीय करिअरची सुरुवात
गिलानी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जनरल झिया-उल-हक यांचे लष्कर शासन असताना 1978 मध्ये केली. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या सेंट्रल वìकग कमिटीसोबतही त्यांचा संबंध आला असून लोधरन मतदारसंघातून ते पहिल्यांदा मेंबर ऑफ नॅशनल असेंब्ली (एमएनए) म्हणून निवडून आले. नवाज शरीफ यांच्याशी मतभेद झाल्यानंतर 1988 मध्ये ते पाकिस्तान पीपल्स पार्टीशी जोडले गेले. बेनझीर भुट्टो यांच्या सरकारमध्ये गिलानी 1988 ते 1990 या कालावधीत पुन्हा नॅशनल असेंब्ली 152 या मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघावर आता लियाकत अली यांची पकड आहे. गिलानी मार्च 1989 ते जानेवारी 1990 या कालावधीत पर्यटनमंत्री होते आणि जानेवारी ते ऑगस्ट 1990 या कालावधीत ते गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते. नंतर भुट्टो सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात ऑक्टोबरमध्ये नॅशनल असेंब्लीचे सभापतीही होते.
सहा वर्षे काढली कारागृहात
गिलानी यांना 11 फेब्रुवारी 2011 रोजी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनबीए) ने अटक केली. भ्रष्टाचारविरोधी असलेल्या या संस्थेची स्थापना लष्कर सरकारने 1999 मध्ये केली होती. या संस्थेने गिलानी यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये सभापती असताना अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप लावला होता. आपल्या मतदारसंघातील 600 लोकांना सरकारी नोकरी दिल्याबद्दल ते प्रामुख्याने दोषी होते. गिलानी यांच्या या कार्यामुळे राष्ट्रीय कोशाचे सुमारे तीन कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान झाले आहे, असा दावा एनबीएने केला आहे. मुशर्रफ यांनी स्थापन केलेल्या अँटी करप्शन कोर्टाने गिलानी यांना दोषी ठरवले आणि त्यांना सहा वर्षे कारागृहात घालवावी लागली. अनेकांनी ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले. गिलानी यांची पार्टी मुशर्रफ यांचा विरोध करत होती, कारण पार्टीच्या सदस्यांनी पक्षांतर करावे, असे त्यांना वाटत होते. गिलानी यांच्या शिक्षेबाबत अनेकांनी टीका केली होती. त्यामध्ये पीएमएल-क्यू पक्षाचे वरिष्ठ नेते मुशाहीद हुसेन सय्यद यांचाही समावेश होता. कारागृहात सुमारे पाच वर्षे घालवल्यानंतर गिलानी यांची 7 ऑक्टोबर 2006 रोजी सुटका झाली.
दोन वर्षांनी झाले पंतप्रधान
पीपीपीने मित्रपक्षांसोबत चर्चा करून 22 मार्च 2008 रोजी गिलानी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले. त्यानंतर लवकरच आसिफ अली झरदारी त्यांची जागा घेतील, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र, पंतप्रधानपदासाठी इच्छुक नसल्याचे 24 मार्च 2008 रोजी झरदारी यांनी जाहीर केले. त्यानंतर गिलानी यांना पंतप्रधान घोषित करत, गिलानी या पदावर 2013 पर्यंत कायम राहतील, असे झरदारी यांनी जाहीर केले. दुसर्‍याच दिवशी त्यांना मुशर्रफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. गिलानी यांच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाने 31 मार्च रोजी 24 मंत्र्यांसोबत शपथ घेतली. त्यातील 11 सदस्य पीपीपीचे होते. गिलानी यांनी टीव्हीवर देशाला संबोधून पहिले भाषण 19 जुलै 2008 रोजी दिले. त्यामध्ये त्यांनी धान्याची कमतरता, भारनियमन, दहशतवाद, न्यायाधीशांना अधिकार, आर्थिक मंदी आणि देशातील बेरोजगारी या विषयांवर प्रामुख्याने भर दिला.
हत्येचा प्रयत्न
गिलानी यांच्या ताफ्यावर अज्ञात बंदूकधार्‍यांनी 30 सप्टेंबर 2008 रोजी गोळीबार केला. लाहोरच्या पूर्व भागाचा दौरा आटोपून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांचा ताफा रावळपिंडी येथील चकलाला मिलिटरी एअर बेस येथून इस्लामाबादकडे जात होता. या गोळीबारामध्ये दोन गोळ्या गिलानी यांच्या बुलेटप्रूफ गाडीला लागल्या होत्या. अहवालात असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे प्रमुख नवाज शरीफ यांच्या ताफ्यावर 27 डिसेंबर 2007 रोजी हल्ला झाला होता त्याच ठिकाणी ही घटना घडली. हा हल्ला पीपीपीच्या अध्यक्ष बेनझीर भुट्टो यांच्यावर रावळपिंडीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच झाला होता. मार्च 2009 मधील राजकीय पेचप्रसंगादरम्यान गिलानी यांनी राष्ट्रपती झरदारी यांना मुख्य न्यायाधीश इफ्तिखार महंमद चौधरी यांच्या हवाली करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे गिलानी यांची पंतप्रधानाच्या रूपातील भूमिका बळकट झाल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.