आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतन चाैहान कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच वादंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी)च्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. गजेंद्र चौहान यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. नवी नियुक्ती होण्याआधी एनआयएफटीचे प्रमुख कोण होते? याची कोणाला कल्पना नसताना असा गोंधळ घालणे योग्य नाही. एखादी संस्था चालवण्यासाठी उत्तम प्रशासकाची गरज असते. चौहान एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्यास सल्लागार समिती तर असेलच.

‘एनअायएफटी’सारख्या शैक्षणिक संस्था सुरुवातीपासूनच सुयाेग्य पद्धतीने स्थापित झालेल्या असतात. अाता अामच्या शिक्षण पद्धतीला नियमित करण्यासाठी धाेरणात्मक बदल करण्याची अधिक गरज अाहे. निश्चितच व्यावसायिक पार्श्वभूमी समान असण्याचे अनेक फायदे अाहेत, परंतु नव्या दृष्टिकाेनामुळे काेणतेही नुकसान हाेत नाही. फॅशन उद्याेगात संधी विस्तारत चालल्या अाहेत म्हणूनच अशा परिस्थितीत काही धाेरणात्मक निर्णय घेण्याची गरज अाहे जेणेकरून केवळ ‘एनएफअायटी’चा सर्वार्थाने बहरेल असेच नव्हे तर त्याचे मानक अाणि प्रतिष्ठादेखील कायम राहायला हवी. तथापि, चेतन चाैहानच्या नियुक्तीस पूर्णत: सहमती मिळणे कठीण असले तरी ही संस्था अधिक उत्तम बनवण्याच्या दृष्टीने त्यांच्या विशेषत्वाचा उपयाेग करून घेतला पाहिजे. सर्वांनाच पुरेशी संधी मिळाली पाहिजे. या लेखात एक नवा दृष्टिकाेन दिला ज्यामुळे अाम्ही एकंदर स्थितीकडे नव्या दृष्टीने पाहू शकताे. अाता काळच हे ठरवेल की, सहभाग किती माैल्यवान ठरताे अाणि टीकेला ती किती निरर्थक सिद्ध करू शकते.

पार्थिवी जोशी,
२५ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर येथे अंतिम वर्षाची विद्यार्थिनी.
बातम्या आणखी आहेत...