आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्ष्य साध्य करण्यासाठी संयम आणि धैर्य बाळगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहण्यासाठी उत्तम पर्याय नसल्याने अनेक जणांना गरीब वस्त्यांमध्ये राहावे लागते. प्रत्येक शहरात अशी एक तरी जागा असतेच. या वस्त्यांमध्ये राहणारे लोक वाईट प्रवृत्तींचे नसतात. त्यांना शहरातील मुख्य प्रवाहाचा भाग मानायला हवे. मुंबई उपनगरातील मीरा रोडही अशीच जागा आहे. येथील लोकही वाईट नाहीत. परंतु तरीही त्यांना बँकेतर्फे क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध केली जात नाही. इतकेच नव्हे तर तेथील लोक बॉम्बस्फोटात सहभागी असल्यासारखे त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. 30 वर्षांची मीरा जाधव हिची जीवनगाथाही सामान्य मुंबईकराप्रमाणे संघर्षपूर्ण आहे. मीराला बॉलीवूडमध्ये तिचे स्थान निर्माण करायचे होते. अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते. कोल्हापूरमध्ये सातवीत शिकत असताना तिने एका नाटकात काम केले होते. तेव्हापासूनच अभिनेत्री बनण्याची मनीषा बळावत गेली. आई-वडिलांनी तिला भरपूर समजवले की, ‘रंग सावळा असल्याने तू अभिनेत्री बनू शकणार नाहीस. त्यासाठी गोरा रंग असणे आवश्यक आहे. शिवाय तुला उत्तम इंग्रजीही बोलता येत नाही.’ परंतु मीराने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही व स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी ती झटत राहिली. मध्यमवर्गातील असल्याने सॉफ्ट स्किल्स, फॅशन सेन्समध्येही ती कमजोर होती. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मीराने कोल्हापुरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अँडमिशन घेतले. त्यानंतर एके दिवशी अचानक ती कोल्हापूर सोडून पुण्याला पोहोचली. तिला एअर टिकेटिंगमध्ये नोकरीची संधी मिळाली. हिंदी आणि इंग्रजी उत्तम बोलता-लिहिता येईल म्हणून तिने नोकरीस तत्काळ होकार दिला. त्यानंतर पुणे सोडून ती मुंबईतील उपनगरीय ठिकाण असलेल्या मीरा रोडवर राहण्यास गेली. केस लांब असल्याने तिला तत्काळ शँपूच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. परंतु कामाच्या शोधात वणवण भटकणे तिच्यासाठी अवघड जात होते. असे असतानाही तिने नकारात्मक विचार केला नाही व फिल्म इंडस्ट्रीमध्ये लहान-मोठय़ा भूमिका करू लागली. ‘गली’ आणि ‘बैमानुस’सारखे लहान चित्रपट केल्यानंतर अनुराग कश्यपने तिला टीव्ही सीरियल ‘राजूबेन’मध्ये काम दिले. परंतु मीराचे स्वप्न मोठे होते. त्यासाठी तिला या लहान भूमिकांची काही मदत होताना दिसत नव्हती. आर्थिक दृष्टिकोनातूनही ती अद्याप सक्षम झाली नव्हती. कमी पैसे मिळत असले तरी ती मीरा रोडचा परिसर सोडून गोरेगावमधील बेस्टनगरमध्ये 200 चौरस फुटांच्या अपार्टमेंटमध्ये ती राहू लागली. येथील परिसर पाहिजे तसा प्रसिद्ध आणि चांगला नव्हता. परंतु चित्रपट स्टुडिओत जाण्या-येण्यासाठी ही जागा तिला सोयिस्कर होती.

सावळ्या रंगाची, लहान शहरातून आलेली मराठमोळी मुलगी मुंबईतील गरीब वस्त्यांमध्ये राहत होती. लहान- मोठय़ा भूमिका करत होती. परंतु तिच्या करिअरची गाडी वेग पकडत नव्हती. अनेकदा मीराला हिंदी सीरियलमध्ये काम मिळायचे; पण ते घरकाम करणार्‍या बाईचे असायचे. भूमिका मिळत नसल्याबद्दल मीराला स्वत:बद्दल वाटायचे की, आपण मागास जातीचे तर नाहीत ना? यानंतर एके दिवशी मीराला मराठी चित्रपट ‘धग’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यात तिने एका किशोरवयीन मुलाच्या आईची भूमिका केली. या चित्रपटात पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा देणार्‍या महिलेची भूमिका तिने स्वीकारली. चित्रपटातील भूमिकेनंतर तिची तुलना स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्याशी केली गेली. 18 मार्च 2013 रोजी जेव्हा मीराला सर्वर्शेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या दिवशी सर्व टीव्ही चॅनलच्या ओबी व्हॅन तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी रांग लावून उभ्या होत्या.

फंडा काय आहे..
तुमचा स्वत:वर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये.