आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीससारख्या अर्थव्यवस्थेसारखे युरोपातही आणखी काही देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपीय देश ग्रीस युरोझोनमध्ये असेल की नाही, हे येणारा काळच सांगेल. परंतु ग्रीसमुळे ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, त्या निराशाजनकसुद्धा आहेत आणि आशादायकही. जनतेच्या मतदानामुळे बुडत्या अर्थव्यवस्थेच्या देशाला कितपत अाधार मिळेल हे तर येणारा काळच सांगेल. ग्रीसची परिस्थिती पाहून उर्वरित युरोपात सर्वकाही आलबेल आहे, असे मानणे चुकीचे ठरेल.

येत्या काळात अन्य युराेपीय देशांतही असे संकट येऊ शकते. मी प्रामुख्याने फिनलँडसंदर्भात सांगतो आहे. तेथील लोकांना मॉडेल युराेपियन सिटिझन म्हटले जाते. सरकार प्रामाणिक असून अार्थिक परिस्थितीसुद्धा चांगली आहे. कर्जे देणाऱ्या देशांनाही या देशावर विश्वास असल्याने त्यांना कमी व्याजदरात कर्ज देत आहेत. सध्या तेथे गेल्या ८ वर्षांपासून मंदी चालू आहे. गृहउद्योग १० टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे आता काही घडेल असे मला वाटत नाही. परंतु काही अवधीत तेथील परिस्थिती बिघडू शकते. यामुळे युरोपात अार्थिक महासंकट येऊ शकते.

फिनलँड हा एकमेव देश नसून आर्थिक घसरणीमुळे अशी परिस्थिती उत्तर युरोपातून डेन्मार्क आणि नेदरलँड्सपर्यंत गेली आहे. डेन्मार्क युरोझोनमध्ये नसून तो आपल्या मुद्रेेचे व्यवस्थापन स्वत: करू शकतो. या देशांची आर्थिक कामगिरी निराशाजनक होते आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर बोजा इतका वाढलेला आहे की त्यातून सावरणे कठीण वाटते आहे. युरोझोनची परिस्थिती यामुळेच वाईट झाली आहे. फ्रान्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्थाही चांगली नाही. परंतु त्यांनी आपली अर्थव्यवस्था सावरली आहे. ग्रीस आणि या देशानंतर उर्वरित देशांत काय घडते आहे, यावर नजर टाकली असता, काही महिन्यांपूर्वी स्पेनचाही आर्थिक घसरण चालू असलेल्या देशांत समावेश होता. परंतु त्याने त्यात सुधारणा केली. युराेपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, स्पेनमध्ये रिकव्हरी होते आहे. तेथे नोकरीच्या संधींतही वाढ होते आहे. युरोपातील यशाच्या प्रमाणाचा विचार केला तर आज बेराेजगारीचे प्रमाण २३ टक्के इतके असून माणशी मूळ उत्पन्न ७ टक्के घटले आहे. पोर्तुगालच्याही अार्थिक परिस्थितीचा स्तर ६ टक्क्यांनी घटला आहे.

युरोपात आर्थिक महासंकटे पाहण्यास का मिळतात, असा प्रश्न उरतोच. कारण ग्रीसमध्ये खूप काही उधारीवर खरेदी केली असून स्पेनने मात्र तसे केलेले नाही. स्पेनचे खासगी क्षेत्र खूप मजबूत असून तेथील हाउसिंग मार्केटमध्ये तेजी आहे. फिनलँडमध्ये आर्थिक घसरण येण्याचे मूळ कारण उधारी नसून वनक्षेत्रातील मागणी घटल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशातील उत्पादन, निर्मिती करणाऱ्या क्षेत्राला मोठा झटका बसला आहे.

उदाहरणच द्यायचे झाल्यास, तेथील आघाडीच्या नोकियाचे देता येईल. या देशाच्या अर्थव्यवस्थेत एक गोष्ट मात्र समान आहे. युरोझोनमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय अर्थव्यवस्थेला एक कवच मिळवून देईल, असे त्यांना वाटत होते. पण युरोझोन तयार करण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. याचा अर्थ त्यातून या देशांना काढावे असा नाही. पण हे कवच थोडे सैल करावे लागेल. यामुळे काही देशांच्या अर्थव्यवस्थेत बदल होऊ शकतो.
© The New York Times