आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कारांसाठी यथार्थ निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य अकादमीचेमराठी भाषेसाठी अातापर्यंत ज्या साहित्यिकांना पुरस्कार मिळाले अाहेत, ते अत्यंत मानाचे साहित्यिक अाहेत. अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जाेशी, बा. भ. बाेरकर, कुसुमाग्रजांपासून ते ग्रेसांपर्यंत अशी अनेक दिग्गजांची नावे १९५५ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांत घेता येतात. तर गेल्या सहा-सात वर्षांपासून सुरू झालेल्या बालवाङ््मय अाणि युवा साहित्यिकांसाठी असलेल्या अकादमीच्या पुरस्कारांतही जी नावे अाली अाहेत तीदेखील ताेलामाेलाचीच अाहेत. म्हणजेच जर यापैकी एकाही साहित्यिकाने असहिष्णुतेचा मुद्दा घेऊन पुरस्कार परत करण्याचे पाऊल उचलले असते, तर मराठी साहित्यविश्वात खळबळ उडाली असती. पण अापल्या साहित्यिकांनी त्या-त्या वेळी संयम बाळगला अाणि अापली मुख्य साहित्य निर्मितीची कृती सुरू ठेवली. याचीच री अाेढत साहित्य अकादमीत मराठी भाषेसाठी प्रतिनिधित्व करणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या माध्यमातून यंदाचा हा पुरस्कार बालसाहित्यातील याेगदानासाठी राजीव तांबे तर युवा पुरस्कार मनस्विनी लता रवींद्र यांना ‘ब्लाॅगच्या अारशापल्याड’ या लघुकथासंग्रहासाठी जाहीर झाला अाणि मराठी साहित्यसृष्टीने त्याचे स्वागत केले. तांबे यांच्या काेणत्याही एका साहित्याला नव्हे, तर एकूणच बालसाहित्यातील समग्र याेगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला अाहे. अातापर्यंत त्यांची तब्बल ५५ ते ६० पुस्तके प्रकाशित झालेली अाहेत. केवळ बालवाङ््मयच नाही तर त्यांनी लेखनाचे सगळे विषय हाताळले अाहेत. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी अाहेत. बालमन, पालकांची मानसिकता अाणि शिक्षणपद्धती यावर ते समुपदेशन करतात. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार थाेडा उशिरा जरी जाहीर झाला असला, तरी अाताही ती सुखावह बाब अाहे.

तर अाधुनिक विचार करणारी, सरळ लिहिणारी लेखिका मनस्विनी ही तरुणांचे प्रतिनिधित्व करणारी एक अाघाडीची नाटककार अाहे. ‘एका लग्नाची दुसरी गाेष्ट’, ‘दिल दाेस्ती दुनियादारी’ अशा मालिकांच्या लेखनातून घराघरात ती पाेहाेचली. रमा-माधवसारख्या एेतिहासिक चित्रपटाचेही तिने लेेखन केलेले अाहे. तर अलविदा, एकमेकांत, माझ्या वाटणीचं खरंखुरं, लखलख चंदेरी अाणि सिगारेट‌्स ही तिची गाजलेली नाटकं. तिची प्रायाेगिक नाटकं वास्तवाचे भान देतात. म्हणूनच तिच्या ‘ब्लाॅगच्या अारशापल्याड’ या लघुकथा संग्रहाला जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर हाेताे तेव्हा मराठी चित्र-नाट्य इंडस्ट्रीदेखील अानंद व्यक्त करते. विशेष म्हणजे २०११पासून सुरू झालेल्या या पुरस्कारात कथासंग्रहाला मनस्विनीच्या रूपाने प्रथमच गाैरविले अाहे. अशा सहिष्णुता, असहिष्णुतेच्या वातावरणात या दाेन वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पण साहित्यसेवेचा वसा घेतलेल्या द्वयींचा हा गाैरव मराठी साहित्यविश्वाला अभिमान देणारा अाहे.

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झााले अाणि २०१५च्या सप्टेंबर महिन्याचे सगळ्यांनाच स्मरण झाले. ते यासाठी की, हा हंगाम हाेता साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याचा. शासनाबद्दल राेेष व्यक्त करण्यासाठी त्या वेळी अनेक साहित्यिकांनी लेखणी साेडून अापले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावला हाेता. बाेटावर माेजण्याइतपत साहित्यिकांनी पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कमही परत केली हाेती ते अलाहिदा. १९८६मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल यांना साहित्य अकादमीने पुरस्कार दिला हाेता. ताे त्यांनी परत केला. त्यानंतर हिंदीतील लेखक उदय प्रकाश यांना २०१०मध्ये अकादमीचा मिळालेला पुरस्कार त्यांनीही परत केला. त्यानंतर ही पुरस्कार परत करण्याची लाटच अाली. मल्याळम लेखिका सारा जाेसेफ, पंजाबी लेखक बलदेव सिंग सादकनाम, वर्यमसिंग संधू, गुजराती साहित्यिक अनिल जाेशी यांनी अापले पुरस्कार परत केले. या सगळ्यामागे कारण हाेतं ते कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीत निर्माण झालेले मतभेद. साहित्यिकांनी सरकारवर अापला राेष व्यक्त करण्याची तशी ही पहिलीच वेळ हाेती. पण या कृतीने अकादमीचे पुरस्कार किती ‘वजनदार’ अाहेत हे तरी कळले. पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये एकही मराठी साहित्यिक नव्हता. ही कृती मराठी साहित्यविश्वातील प्रगल्भताच अधाेरेखित करते. त्यामुळेच साहित्य क्षेत्रात वेगळ्या रेषेवर शब्द रेखाटणाऱ्या राजीव तांबे अाणि मनस्विनी लता रवींद्र या लेखकांची पुरस्कारासाठी अकादमीने ही जी निवड केली अाहे ती अत्यंत यथार्थ अाहे असेच मानले पाहिजे.
(लेखक नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...