आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिवसः शाॅर्टकट मराठीची चिंता कशाला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अापल्या माेबाइलवर रात्री फिरणाऱ्या पाेस्ट वाचा... J1 झाले का?, good ना8 असे कितीतरी शब्द टाइपताना उत्स्फूर्तपणे निर्माण झालेे अाहेत. अर्थात अापण काेणती भाषा कशी वापरावी याचे स्वातंत्र्य प्रत्येकजण घेत असताे. पण सध्या बाेटांवर खेळणाऱ्या जगण्यात भाषा थाेडी बदलली तर फरक काय पडताे?
 
सदाशिवपेठी मराठी ते ग्लाेबल मराठी असा विश्वव्यापी संचार जरी मराठीने केला असला अाणि अभिजाततेच्या उंबरठ्यापर्यंत पाेहाेचलेल्या मराठी भाषेने माेबाइल क्रांतीमुळे एक वेगळे रूप घेतले अाणि ते रूप जगद्व्यापी हाेत प्रत्येकाच्या बाेटावर खेळता-खेळता मनात रुजलेही. मग अाता या शार्टकट मराठीची चिंता कशाला? अाजच्या मराठी भाषा दिनानिमित्त या मराठीच्या या रुजलेल्या रूपाविषयी थाेडेसे... 
 
पुण्याच्या अस्खलित मराठी बाेलणाऱ्या सदाशिव पेठेत जा... एखाद्या ढकांबे किंवा ढेंगळी पिंपळगाव नावाच्या गावात जा... तरी लाेकांच्या हातात भ्रमणध्वनी कधीच नसताे त्यांच्या हातात असताे ताे माेबाइल... इथे भाषाद्वेष मुळीच नाही पण, सरावाचे झालेले काही शब्द ग्लाेबल वातावरणात जसेच्या तसे वापरले जातात. जसे लाइट. कुठेही जा फार कमी लाेक वीज गेली किंवा वीज लाव असे म्हणत असतील (खरं तर या बाबतीतही शंकाच अाहे.) लाइटच म्हणतात. असे काही शब्द माेबाइलवर टाइपतानाही तयार झाले अाहेत अाणि त्यांनीच अाता ग्लाेबल रूप घेतले अाहे.
 
हे ग्लाेबल रूप घेताना मराठी भाषेतील शब्द सहजगत्या शाॅर्टकट झाले अाहे. खरं तर माेबाइलवरची मराठी अशी एक वेगळीच भाषा निर्माण झाली अाहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अापल्या माेबाइलवर रात्री फिरणाऱ्या पाेस्ट वाचा... J1 झाले का?, good ना8 हे तर उदाहरण झाले; असे कितीतरी शब्द माेबाइलवर टाइपताना उत्स्फूर्तपणे निर्माण झालेे अाहेत. मग अाता मुद्दा असा अाहे की, या भाषेला काय म्हणावे. अनेक जण विनाकारण टाहाे फाेडतात की, असे शब्द मराठीला मारक ठरत अाहेत तर ही भाषा वापरणारे अशा टाहाेंकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अर्थात अापण काेणती भाषा कशी वापरावी याचे स्वातंत्र्य प्रत्येकजण घेत असताे. 

पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात खरं तर असे म्हणण्यापेक्षा बाेटांवर खेळणाऱ्या जगण्यात भाषा थाेडी बदलली तर फरक काय पडताे. कथा, कादंबरी, कवितांमध्ये अाहेच की, अापली भाषा. बाेलीभाषेचा जसा एक लहेजा अाहे, ग्रामीण भागातील जनतेची लिहिण्याची भाषाही थाेडी वेगळी अाहे. (तीला अापल्याकडे काही विद्वान अशुद्धही म्हणतात) तशीच ही माेबाइलवरची शाॅर्टकट भाषा अाता प्रत्येकाच्या हाती खेळायला लागली अाहे. किंबहुना ती अाता सर्वमान्य हाेत अाहे. या भाषेत विचार असे लिहिले जात नाही तर वि4 किंवा प्रचार असे न लिहिता प्र4, शीवG असे लिहिले जाते. गृहमंत्री असे लिहिण्याएेवजी घराचे चित्र अाणि त्यापुढे मंत्री टाइप केले जाते. फाेटाे पाठव असे लिहिण्यासाठी कॅमेऱ्याचे चित्र अाणि पुढे पाठव असे लिहिले जाते. 
 
अशा या मराठीतील वेगळ्या भाषेला अापण नाकारणार अाहाेत का? किंवा नाकारणार असू तर कसे? काही जण याला मराठी भाषेसाठी मारक म्हणतात तर काहीजण चिरफाड म्हणतात. पण मराठी सारस्वत म्हणा की, मराठी भाषाप्रेमी म्हणा या माेबाइल लँग्वेजला राेखू शकणार अाहाेत का? तर माेबाइलच्या या विस्फाेटात अाता हे शक्य नाही असेच त्याचे उत्तर मिळते. मग या शाॅर्टकट मराठीची चिंता करण्याचे कारणच काय? मराठी ग्लाेबल व्हायला पाहिजे असे एकीकडे म्हणतात, त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न हाेत असताना तीच मराठी अापल्या काही भाषाभगिनींशी मिलन करून जर वापरली जात असेल तर तीचे स्वागत करायलाच हवे. जुन्या संगीत नाटकांसारखी वा ब्लॅक अँड व्हाइट काळात जशी मराठी वापरली जायची तशी ती त्या-त्या साहित्यकृतींमध्ये वापरली जातेच की. म्हणून मग मराठीचे रुपडेच पालटू नये असे काेणी म्हणत असेल वा माेबाइलवरच्या शाॅर्टकट मराठीची चिंता करत उगाच शिव्या देत असेल तर अशा लाेकांनी वा स्वयंघाेषित सारस्वतांनी अशी शाॅर्टकट मराठी राेखण्यासाठीचे उपाय वा प्रयत्न सुचविणे अधिक अाैचित्याचे ठरेल. 
 
नव्या भाषेचे स्वागतच व्हायला हवे
माेबाइलवर युनिव्हर्सल किबाेर्ड हा इंग्रजी असताे. त्यात विविध भाषांचे किबाेर्ड अॅड केले जातात. एकेका शब्दासाठी असे किबाेर्ड बदलणे घाईच्या कामांमध्ये वा काॅर्पाेरेट जगात शक्यच नाही. म्हणूनच मग दाेन भाषा एकत्र करून एक नवीन भाषा निर्माण हाेते अाहे वा शाॅर्टकट भाषा तयार हाेते अाहे अाणि ती सर्वमान्यही हाेत असल्याने तिची चिंता करण्याची काहीच गरज नाही. 
 
 
बातम्या आणखी आहेत...