आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन प्रकाशकांची अक्षरयात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचन संस्कृतीबद्दल चिंताव्यक्त केली जाते... ही विचारप्रवृत्त बाब अाहे, पण याच चिंतेने उद्या उग्र रूप घेऊ नये म्हणून काही प्रयत्न केले जातात का? हा खरा प्रश्न अाहे. साहित्य संमेलनांसारख्या माेठमाेठ्या व्यासपीठांवरुन ते अगदी गल्ली बाेळात हाेणाऱ्या व्याख्यानांमध्येही ‘हल्ली लाेकं वाचतच नाहीत..., तरुण तर वाचनापासून दूरच गेला अाहे’, असा अाेरड वजा गवगवा केला जाताे. पण हे लाेक अापली वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी फारसे काही करताना दिसत नाहीत. मग पुन्हा प्रश्न निर्माण हाेताे की, खरंच परिस्थिती अशी अाहे का? प्रकाशकांच्या सर्वेतून त्याला दुजाेराच मिळालेला अाहे. म्हणूनच मग अापण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी, जपण्यासाठी वा पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजेत हा विचार घेऊन साहित्य चळवळीत प्रथमच दाेन प्रकाशक पुढे अाले अाहेत अाणि ही घटना साहित्य विश्वात अापले वेगळेपण अधाेरेखित करणारीच ठरणार अाहे.

समकालीन प्रकाशन अाणि राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून ‘उत्सव वाचनाचा, अाविष्कार संस्कृतीचा’ हा उपक्रम सुरू हाेत अाहे. याचे पहिले पुष्प अाैरंगाबादमध्ये अाणि सप्टेंबरला गुंफले जाणार अाहे. मराठी वाचलेच जात नाही, वाचनसंस्कृती लयाला जात अाहे, पुस्तकेच मिळत नाहीत. फक्त साेशल मीडियाचा तेवढा उपयाेग हाेताे, असा सूर कायमच येताे. पण, यावर उपाय काय किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन काय करता येईल याविषयी काेणीही पुढे येत नाही.

काही उपाय दिले जातात पण कृती हाेत नाही. हाच विचार घेऊन समकालीन अाणि राजहंस प्रकाशन या दाेन्ही संस्था पुढे अाल्या अाहेत. एरवी चांगल्या लेखकांची पुस्तके अापल्याच संस्थेतून प्रसिद्ध व्हावी, वा चांगली पुस्तके अापल्याकडेच यावी अाणि व्यवसायासंबंधी इतर स्पर्धा प्रकाशकांमध्ये दिसून येते. पण, फक्त वाचन वाढावे या एकाच कारणासाठी प्रथमच दाेन प्रकाशन संस्था एकत्र येत असल्याचा हा याेग दुर्मिळच म्हणावा लागेल. त्यातही त्यांचा ‘उत्सव वाचनाचा, अाविष्कार संस्कृतीचा’ हा उपक्रम फक्त अाैरंगाबाद वा दाेन चार शहरांमध्येच हाेणार अाहे असे नाही तर त्याला विविध शहरांच्या साहित्य वातावरणानुसार अायाम देत ताे महाराष्ट्रभर राबविला जाणार अाहे. हे विशेषच म्हणावे लागेल. भविष्यात तर या दाेन्ही संस्था हेच काम पुढे नेण्यासाठी माध्यमांनाही साेबत घेणार अाहेत. अर्थात त्यामुळे हा उपक्रम लाेकांपर्यंत पाेहाेचण्यास अाणि हेतू साध्य करण्यास हातभारच लागणार अाहे. या उत्सवाची गरज का भासली याविषयी समकालीनचे अानंद अवधानी यांनी स्पष्ट केले अाहे की, अगदी पत्रकार, लेखक, प्राध्यापक, प्रकाशक जे जे पुस्तकाशी संबंधित अाहेत, ते प्रत्येकजण वाचन या विषयी नकारात्मक री अाेढत असतात. म्हणूनच ही कल्पना पुढे अाली अाणि हा उत्सव ठरला. अाता या दाेन संस्था एकत्र येऊन काय करणार तर असे काही ठाेस ठरवलेले नाही, पण सुरुवात तर करूया या तत्त्वाने पहिला दाेनदिवसीय उत्सव अाैरंगाबादमध्ये घेण्याचे ठरवले अाहे. यात पुस्तक प्रदर्शन अाणि व्याख्याने हाेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर राजहंसचे डाॅ. सदानंद बाेरसे यांनीही स्पष्ट केले अाहे की, वाचन-संस्कृती आणि पुस्तक-प्रसार यांद्वारे महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण प्रगल्भ व्हावे, वाचनातून सुसंस्कृत आणि सुजाण नागरिकाची जडणघडण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे प्रगतिशील आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी यासाठी या दोन्ही प्रकाशन संस्था पुस्तक-निर्मितीबरोबरच अन्य विविध उपक्रम राबविणार अाहेत.

अर्थातच हे उपक्रम स्थलसापेक्ष असतील असेही ते म्हणतात. या उपक्रमातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दाेन्ही प्रकाशन संस्था मिळून फक्त निवडक १०० पुस्तकांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविणार अाहेत. त्याचा उद्देश असा की, खूप माेठे प्रदर्शन भरविले की वाचक गाेंधळतात, हवे ते पुस्तक शाेधण्यात वेळ जाताे. काहींना पुस्तकं चाळायची असतात तर काहींना माहिती हवी असते, काहींना एखादे पुस्तक खरेदी करायचे असते. त्यामुळेच खूप माेठ्या पुस्तक प्रदर्शनाला फाटा देत रसिकांनी नक्की वाचावी अशीच पुस्तके या प्रदर्शनात असणार अाहेत.

प्रकाशकांनीच केलेल्या एका सर्वेनुसार अाजही महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये चांगली पुस्तकांची दुकानंच नाहीत, जवळपास ३५० तालुक्यांमध्ये हीच परिस्थिती अाहे. मग अशी स्थिती असताना केवळ वाचन संस्कृतीवर टीका करता या विसंगतीवर अाता खऱ्या अर्थाने काम सुरू हाेतं अाहे त्याला वाचकांसह साहित्य संस्कृतीच्या धुरीणांनी साथच द्यायला हवी. तरच हा उत्सव महाेत्सव हाेईल.
बातम्या आणखी आहेत...