आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Plant One Tree To Save Our Existance Apeals Dainik Bhaskar Group

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक वृक्ष, एक जीवनः दैनिक भास्कर समूहाचे एक पाऊल निसर्गासाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच जून. जागतिक पर्यावरण दिन. एक महत्त्वाचा दिवस. आम्हाला आमच्या अस्तित्वाची आठवण करून देणारा. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहेत. परंतु सृष्टीचे हे वैभव संकटात सापडले आहे.
भारत म्हणजेच जगाची 18 % विशाल लोकसंख्या आणि पृथ्वीचा केवळ 2.4 टक्के भाग. संकेत स्पष्ट आहे... निसर्ग आणि नैसर्गिक स्रोतांवर चहुबाजूंनी दबाव वाढत आहे. हिरवाईची किंमत मोजूनच तर बेफाम विकास होत आहे. एका पाहणीनुसार स्वातंत्र्यापासून आजतागायत 53 लाख हेक्टरवरील घनदाट जंगल नष्ट झाले आहे. शहरांच्या बेसुमार विस्तारामुळे नद्या आणि तलावांची काय अवस्था झाली हे तर सर्वांना दिसतेच आहे. आता आम्ही जागे होण्याची वेळ आली आहे. केवळ जागे होण्याचीच नाही, तर काहीतरी करण्याचीदेखील. या निमित्ताने दैनिक भास्कर समूह आपले ग्रीन प्लांटेशन अभियान ‘एक वृक्ष, एक जीवन’ सुरू करत आहे. यामागील उद्देश एकच. प्रत्येकाने आपल्या हयातीत किमान एक रोपटे तरी लावावे. केवळ लावायचेच नाही, तर वृक्ष होईतोवर त्याचे संगोपन करायचे. पर्यावरण रक्षणाचा हाच सर्वात सरळ मार्ग आहे. जो स्वत:पासून सुरू होतो. यासंदर्भात पावसाळ्याच्या दिवसांत रोपे लागवडीसाठी आमच्या टीम आपल्याकडे येतील.
पर्यावरण रक्षणाचे अनुकरणीय उपक्रम देशभर सुरू आहेत. इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेले निसर्गाचे असे असंख्य पराक्रमी लोक आहेत. त्यामुळेच ग्रीन प्लांटेशन अभियानांतर्गतच ‘दैनिक भास्कर ग्रीन आयडॉल अ‍ॅवॉर्ड’चीही स्थापना करण्यात येत आहे. व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला जाईल. हिरवाई वृद्धिंगत करण्यासोबतच तिच्या संगोपनात भरीव योगदान देणा-या निसर्गप्रेमींचा यातून गौरव करण्यात येईल. चांगला बदल एकजुटीनेच घडवणे शक्य आहे. आमचे ब्रीदवाक्यच आहे... वृक्ष हेच ब्रह्म आहे. हाच संकल्प घेऊन आपण सगळे पुढे जाऊ या. समाधानकारक मान्सून आणि विस्तीर्ण हिरवाईच्या आगाऊ शुभेच्छांसह...
आपला
रमेशचंद्र अग्रवाल
चेअरमन, दैनिक भास्कर समूह