आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : यशवंताचा पाठ, उद्धवदादूंची वाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाची मात्र फायनलच

नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एकत्रितरीत्या सोलापूरचा दौरा केला. सोलापूर शहरातील विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन भाषणे ठोकण्याबरोबरच दुष्काळाचीही आढावा बैठक घेण्यास ते विसरले नाहीत. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करताना सुशीलकुमारांनी भाषण ठोकले. सोलापूरकरांना शिंदे यांचे भाषण आता तोंडपाठ झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणात नावीन्य काहीच नसते. शिंदे यांनी या अगोदर अनेकवेळा असे जाहीरपणे सांगितले की, यंदाची आपली निवडणूकही अंतिम आहे; परंतु निवडणूक आली की ते पुन्हा उमेदवार असतात, पण याबाबतचे स्पष्टीकरण देताना ते सांगण्यास विसरत नाहीत की, पक्षश्रेष्टीचा आदेश मानणारा मी साधा कार्यकर्ता असून त्यांच्या आदेशामुळेच ही निवडणूक लढवत आहे; परंतु नुकत्याच झालेल्या सोलापूर दौर्‍यात शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सागितले की, यंदाची निवडणूक मात्र फायनल आहे. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमधील चर्चा मात्र चांगलीच रंगली, हा भाग वेगळा.