Home »Editorial »Columns» Pope Resignation And Catholic Church Politics

कॅथलिक चर्चचे राजकारण

हॉवर्ड चुआ इओन | Feb 24, 2013, 09:38 AM IST

  • कॅथलिक चर्चचे राजकारण

ती तीर्थयात्रा सामान्य वाटत होती. परंतु त्याचे महत्त्व अखेरीस स्पष्ट झाले आहे. 28 एप्रिल 2009 ला मध्य इटलीतील भूकंप प्रभावित शहर ल अकिलाच्या यात्रेदरम्यान पोप बेनेडिक्ट सोळावे (जोसेफ रेटजिंगर) केवळ पाच महिने पदावर राहणारे 13व्या शतकातील पोप सेलेस्टाइन पाचवे यांच्या कबरीवरही गेले होते. शांतता प्रार्थनेनंतर बेनेडिक्ट यांनी खांद्यावर परिधान करण्यात येणारे वस्त्र आपल्या या माजी पूर्वाधिकार्‍याला समर्पित केले. जे 2005 मध्ये पोप बनल्यानंतर त्यांना मिळाले होते. सेलेस्टाइन यांनी पोपच्या पदावरून निवृत्ती स्वीकारल्यानंतर संन्यासी रूपात जीवन व्यतित केले. बेनेडिक्ट यांनी 28 फेब्रुवारीपासून आपले पद सोडण्याच्या आपल्या निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी सेलेस्टाइन यांचाही विचार केला असेल.
व्हॅटिकनला चालवणार्‍या गोपनीय अधिकारशाही क्यूरियाचे एक सदस्य सांगतात, हा निर्णय घेताना पोप यांना एकटेपणा जाणवला असेल. मागे पोप ग्रेगरी सातवे यांनी चर्चमध्ये 40 वर्षांपासून चाललेली प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी एक करार करत 1415 मध्ये पदत्याग केला होता.
यंदा कोणतेही संकट नाही. 85 वर्षीय बेनेडिक्ट आरोग्य कारणांमुळे पदत्याग करत आहेत. त्यांचे भाऊ ज्योर्गने सांगितले, डॉक्टरांनी पोप यांना लांबपल्ल्याचा हवाई प्रवास करू नये, असा सल्ला दिला आहे. पेसमेकरच्या आधारे ते जगत आहेत. आपले पूर्वाधिकारी पोलंडमध्ये जन्मलेल्या जॉन पॉल द्वितीयच्या तुलनेत बेनेडिक्ट सोळावे यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ विशेष नव्हता. जॉन पॉल यांनी साम्यवादी गटाला उद्ध्वस्त करण्याची भूमिका निभावली होती. त्यांच्या जागतिक यात्रांनी कॅथोलिक चर्चचा प्रभाव वाढवला. पोप बनण्यापूर्वी कार्डिनल जोसेफ रेटजिंगर त्यांचे मित्र जॉन पॉलची व्हॅटिकन चालवण्यास मदत करत.
वादांचे उत्तराधिकारी
जर्मनीत जन्मलेल्या बेनेडिक्ट यांना उत्तराधिकारात अनेक वाद मिळाले होते. यात सर्वात महत्त्वाचा आहे पादरींद्वारे लैंगिक छळ केल्या जाणार्‍या प्रकरणांना दडपण्याचा प्रयत्न. बेनेडिक्ट यांनी यात आणखी काही वाद जोडले. त्यांच्या टिपणांनी मुस्लिम, यहुदींना दु:खी केले. कॉँडोमच्या उपयोगानेही आफ्रिकेतील एड्सच्या संकटावर नियंत्रण करण्यात मदत होणार नाही, या त्यांच्या वक्तव्याने वादंग माजला होता. परंतु, बेनेडिक्ट यांनी ज्ञान आणि सक्षमतेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी गर्भ निरोधक , चर्चमधील महिलांच्या भूमिकेसह जॉन पॉल यांच्या अनेक जुन्या सिद्धांत आणि धोरणांना जपले आहे. यामुळे अमेरिका, युरोपात अनेक उदार कॅथोलिकांसोबत मतभेद झाले.
प्रभाव आणि ताकद
बेनेडिक्ट पद सोडत आहेत. परंतु अशी शक्यता आहे की, पोप पदाच्या जबाबदारीचे वहन केल्याशिवाय ते अधिक प्रभाव आणि शक्ती मिळवण्याच्या काळात प्रवेश करत आहेत. चर्चच्या इतिहासातील हा दुर्मिळ क्षण असेल जेव्हा एक पोप दुसर्‍या एका माजी पोपसोबत एकाच व्यासपीठावर असतील, ज्यांच्या विद्वत्ता आणि बौद्धिक क्षमतेला तोड नाही. एखादा निवृत्त पोप आणि वर्तमानातील पोपच्या जवळ राहिल्याने निर्माण होणार्‍या स्थितींविषयी कुणालाही माहिती नाही. ला स्टेम्पा वर्तमानपत्राचे व्हॅटिकन येथील वार्ताहर टोरनिएल्लीच्या मते, व्हॅटिकनमध्ये माजी पोप त्यांच्या उत्तराधिकार्‍यावर ओझे सिद्ध होतील. रेटजिंगरच्या हयातीत त्यांच्या निर्णयांना बदलणे त्यांच्या उत्तराधिकार्‍यासाठी कठीण असेल. बेनेडिक्ट पदावरून गेल्यानंतर व्हॅटिकनमध्येच राहतील. बेनेडिक्ट यांनी पद सोडण्याचा निर्णय घेत पुढील पोप निवडीचे नवीन गणित मांडले आहे. कॅथोलिक न्यूज सर्व्हिसचे माजी ब्युरो चीफ जॉन थाविस सांगतात, गरजेचे नाही की प्रत्येक पोपने 85 वर्षे वयातच निवृत्ती स्वीकारावी. परंतु, भविष्यात कोणताही पोप वयाच्या 75व्या वर्षी निवृत्त होऊ शकतो. राजीनाम्याचा पर्याय असल्याने कार्डिनल अपेक्षेप्रमाणे तरुण उमेदवारांचा विचार करतील. नवीन पोपची निवड करणारे अधिकांश कार्डिनल बेनेडिक्ट यांनी नियुक्त केले आहेत. बेनेडिक्ट यांनी 90 कार्डिनल नियुक्त केले आहेत. यापैकी 67 त्यांच्या उत्तराधिकार्‍याच्या निवडणुकीत मत देऊ शकतील. अशा परिस्थितीत लॅटिन अमेरिका, आफ्रिका किंवा अशियातून एखाद्या पोपची निवड झालीच तर ते बेनेडिक्ट यांच्या रुढीवादाचे अनुकरण करतील.
चर्चसमोरील आव्हाने
बेनेडिक्ट यांच्या उत्तराधिकार्‍याला वारशाने काही समस्यांची यादीही मिळेल. पादरींच्या सेक्स स्कॅँडलमुळे झालेल्या खोल जखमा भरून येण्यास वेळ लागेल. यामुळे आयरलॅँड सारख्या कॅथोलिक देशाचे समर्थन पुन्हा मिळवण्यात अनेक पिढ्या लागतील. दुसरीकडे चर्चचे मुख्य केंद्र युरोपावरून हटत आशिया, आफ्रिकेकडे सरकत आहे. आत्ताही युरोपावर केंद्रित चर्चसाठी या महाद्वीपांच्या सामाजिक, राजकीय अपेक्षांना पूर्ण करणे आव्हान असणार आहे. व्हॅटिकनला लॅटिन अमेरिकेतील गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एका सर्वेक्षणानुसार 1996 मध्ये लॅटिन अमेरिकी देशात 81 टक्के कॅथोलिक आणि चार टक्के इवेंजिलिकल होते. 2010 मध्ये कॅथोलिकांची संख्या घसरत 70 टक्के झाली आणि इवेंजिलिकल वाढत 13 टक्के झाले. अमेरिकी ननच्या स्वायत्तत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांवर रोम, व्हॅटिकनवरून आलेल्या आदेशांमुळे अमेरिकेचे उदार कॅथोलिक असंतुष्ट आहेत. व्हॅटिकनने नन (जोगीन) विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली होती. आपल्या कार्यक्षमतेमुळे प्रसिद्ध बेनेडिक्ट, अनेक कामे अर्धवट सोडून जात आहेत. त्यांनी ऑक्टोबरमध्ये 2012-13 हे ‘श्रद्धा’ वर्ष जाहीर केले होते. परंतु, ते मध्यातच पदत्याग करत आहेत. ते कार्डिनल, बिशपसाठी महत्त्वपूर्ण
पत्र पाठवू शकणार नाहीत. ज्यांना लिहिण्याची सुरुवात त्यांनी केली होती. ते सप्टेंबर 2012 मध्ये राजीनामा देण्याची योजना आखत होते. परंतु, व्हॅटिकनच्या संबंधात खळबळजनक खुलासे आणि बॅँक स्कॅँडलने त्यांना थांबवले. असो. पद सोडल्यावरही त्यांना चर्चच्या जबाबदारीचे वहन केल्याची जाणीव होत राहील.

वार्तांकन : अलेस्सांड्रो स्पेशिएल / रोम, एलिझाबेथ डायस/ वॉशिंग्टन, मेगन गिब्सन, ओली जॉन आणि सोरछा पोलक / लंडन

विशेष वृत्तांत : पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा देत खुला केला नवीन मार्ग

Next Article

Recommended