चर्चेत - त्यांची कंपनी पॉस्कोसोबत प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत
भूषण स्टीलच्या सिंघल यांची कन्या प्रियंकाशी त्यांचा विवाह झाल्याने दोन्ही ग्रुपमधील नातेसंबंध पोलादी झाले.
दक्षिण कोरियाची कंपनी पॉस्कोला ओडिशातील प्रोजेक्टमध्ये बरेच नुकसान सोसावे लागले आहे. मात्र, ते आता उत्तम गाल्वा ग्रुपच्या अंकित यांच्यासोबत महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करत आहेत. मिगलानी कुटुंब म्हणजे राजेंद्र मिगलानी आणि अंकित उत्तम गाल्वा स्टील ग्रुप चालवतात. उत्तम गाल्वा ग्रुपचे नाव अंकित यांचे आजोबा उत्तमचंद यांच्यावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी तोट्यातील लॉइड स्टीलच्या युनिटची खरेदी केली होती.
जगातील मोठी पोलाद कंपनी आर्सेलर मित्तल त्यांच्यासोबत आहेत.मात्र, तरीही आर्सेलर मित्तल यांनी कंपनीच्या संचालक मंडळात कोणतेही पद स्वीकारले नाही. अंकित यांचे वडील राजिंदर यांचे लक्ष्मीनिवास मित्तल यांचे वडील एम.एल. मित्तल यांच्याशी ४० वर्षे जुना स्नेह आहे. २००९ मध्ये करार झाला तेव्हा अंकित त्यात सहभागी नव्हते. या वेळी पॉस्कोला आपल्या ग्रुपसोबत येण्यासाठी तयार करण्याचे श्रेय अंकित यांना जाते. पोलादाच्या व्यवसायात येण्याआधी अंकित वॉल स्ट्रीटमध्ये प्रायव्हेट बुटीक फर्ममध्ये ट्रेडिंग करत होते. तिथे ते शेअर्सची खरेदी-विक्री करत होते. वडिलांसोबत पोलाद व्यवसायात उतरण्याआधी त्यांनी डेट्रॉइट कोल्ड रोलिंग स्टीलमधील बारकावे शिकले. त्यांचे मोठे बंधू अनुज आणि वडील यांच्यासोबत तिघे जण ग्रुप चालवतात,असे अंकित यांनी सांगितले.
अंकित पुरवठादार व ग्राहकांसाठी सहजासहजी उपलब्ध होतात. त्यामुळे व्यवसायातील आवश्यक बदल त्यांना चांगला समजतो. त्यांची पत्नी प्रियंका भूषण पॉवर अँड स्टीलचे संजय सिंघल यांची मुलगी आहे. कधीकाळी दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. नातेसंबंध तयार झाल्यामुळे दोन्ही कंपन्या मिळून काम करत आहेत. प्रियंका यांची बहीण राधिका यांचा विवाह व्हिडिओकॉनच्या धूत कुटुंबात प्रदीप धूत यांचे पुत्र सौरभ यांच्याशी झाला. ते व्हिडिओकॉन डीटीएचचा व्यवसाय पाहतात. लक्ष्मीनिवास मित्तल यांची मिगलानी कुटुंबाच्या उत्तम गाल्वा ग्रुपमध्ये काही भागीदारी आहे. यासोबत मित्तल भूषण स्टीलमध्येही ते भागीदारीसाठी इच्छुक आहेत.
अंकित मिगलानी, व्यावसायिक
वय - ३६
वडील - राजिंदर मिगलानी
कुटुंब - पत्नी प्रियंका
शिक्षण - व्हार्टन स्कूलमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी