आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा आदर करा, हे केवळ नाटक आहे का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडर -30 . चालू घडामोडींवर ३० वर्षे वयाखालील तरुणाईचे मत

नुकत्याच आलेल्या ‘पिंक’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. स्त्रीने स्वबचावासाठी पुरुषावर केलेल्या हल्ल्याच्या प्रसंगाच्या आधारावर हा सिनेमा स्त्रीच्या चारित्र्यावर पुरुषप्रधान समाजाने बनवलेल्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे करतो.
अनिरुद्ध रॉय चौधरीच्या ह्या सिनेमात पुरुषाच्या सहवासात स्त्रीची संमती व स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्या समस्यांवर प्रकाश टाकतो. पण हा सिनेमा खरंच आपल्या विचारांना बदलू शकेल का? अलीकडील अनेक घटनांनी हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण केला आहे.
गुजरातच्या राजकोटमध्ये एका पुरुष ग्राहकाने एका महिला सेक्स वर्करची हत्या केली. कारण तिने त्याला लग्न करण्यास नकार दिला. दिल्लीत एका एकवीस वर्षीय तरुणीस प्रियकराने सुरा किंवा कात्रीसारख्या धारदार हत्याराने भोसकून तिची हत्या केली. ह्या मुलीने त्याच्यासमक्ष पोलिसात फिर्याद दाखल केलेली असूनही निर्घृण घटना घडली. ह्याच दरम्यान राजधानी दिल्लीमध्येच लग्नाला नकार देणाऱ्या मुलीला तिच्या प्रियकराने मारहाण करत गच्चीवरून खाली ढकलून दिले. उत्तर प्रदेशच्या माऊ जिल्ह्यात दोघांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून
तिला ट्रेनमधून बाहेर फेकून दिले. आपण डिसेंबरमध्ये निर्भयाचे स्मरण करतो. भारतात अजूनही स्त्रीवर तिच्या नवऱ्याने केलेल्या बलात्काराविरोधात शिक्षेची तरतूद नाही. संमती आणि नाही म्हणू शकण्याचा अधिकार अजूनही स्वीकारण्यात येत नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार करण्यात येतो. दर तासाला अत्याचाराच्या २६ फिर्यादी नोंदवण्यात येतात. हे आकडे आपल्या भारतीय संस्कृतीने महिलांना दिलेल्या ‘सन्मान’ आणि ‘समानते’ च्या मान्यतांना ढोंगी ठरवतात.
22 वर्षीय लेखिका या मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस विद्यार्थीनी आहे.
बातम्या आणखी आहेत...