आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्राची हॉलीवूडमध्ये गगनभरारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलेला सीमा नाही. गाण्याचे सूर सगळीकडे सारखेच असतात. सकाळी-संध्याकाळी, भारतात, परदेशात सगळीकडे ऐकायला गोडच वाटतात. ह्या सगळ्या सीमा माणसाने तयार केल्या, स्वतःच्या सोयीसाठी. कलेला जातपात, भाषा, सौंदर्य, जागा, देश-धर्म अशा काल्पनिक आणि वास्तविक कशाच प्रकारचे बंधन नसते. कला ही फक्त मनोरंजनासाठीच नसते, तर कलेला आपण उपजीविकेचे साधन बनवू शकतो. आपल्या अभिनयकलेचे उत्तम प्रदर्शन करत अनेक अभिनेत्रींनी भारताबाहेरही नाव कमावले आहे. बॉलीवूडप्रमाणे हॉलीवूडमध्येही कलेचे योगदान दिले आहे.
हल्ली तरुणांमध्ये जीओटी, flash, friends, अशा हॉलीवूड सीरियलसचे वेड जाणवते आहे. त्यात Quantico, ही सिरीजसुद्धा लोकप्रिय झाली आहे. ह्यात भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही मुख्य भूमिकेत आहे. ही नाट्य, रोमांच, थ्रिल ह्यांचा मेळ घालणारी कथा आहे. आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रियंकाने ७४ कोटींची कमाई करून जगातील सर्वात जास्त मानधन असलेल्या दूरचित्रवाणी अभिनेत्रींमध्ये आठवा क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्व अभिनेत्रींमध्ये भारतीय अभिनेत्री आहे ह्याचा अभिमान आहेच; परंतु अन्य अभिनेत्रींसाठी प्रेरणा आहे. कला-संगीताच्या, अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वच कलागुणांचा कस लागतो. पण आम्हाला अशक्य असे काहीच नाही, कोणत्याच सीमा आम्हाला रोखू शकत नाहीत, हे प्रियंकाने सिद्ध केले.
सगळ्या गोष्टींची किंमत पैशात होत नाही. पण प्रसिद्धी, समाधान, यश मोजण्याचे साधन पैसा असू शकतो. कला क्षेत्रातही पैसा आहे आणि तेही समाधान आणि यशाबरोबर, हे प्रियंकाने दाखवून दिले. त्यामुळे कला क्षेत्रात करिअर करण्यास विरोध असणाऱ्या पालकांनी पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. ६४ कलांचा वारसा असलेल्या देशात कलावंतांची कमी नाही. कलेचा हा वारसा पुढे चालूच राहील यात शंका नाही!
लेखिका या एनडीएमव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक येथील आहेत.
बातम्या आणखी आहेत...