आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेवर आधारित उपचार पद्धतीस प्रोत्साहन; चीन सर्व सरकारी रुग्णालयांत टीसीएम विभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एकेकाळी पुरेसा शास्त्रीय आधार नसल्याने संशयाने पाहिली जाणारी चिनी औषधे आता लवकरच जगभरात वाऱ्यासारखी पसरतील’, असे चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने गेल्या वर्षी म्हटले होते. त्या वेळी ती अतिशयोक्ती वाटली. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीची अशी काही योजनाही नव्हती. मात्र, आता कम्युनिस्ट पार्टी टीसीएम (ट्रॅडिशनल चिनी मेडिसिन)उपचारपद्धतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या तसेच टीसीएम रुग्णालय व क्लिनिकचे नेटवर्क मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. 

गेल्या काही वर्षांत चीनमध्ये टीसीएम वेगाने वाढत आहेत. २००३ मध्ये याची २०० रुग्णालये होते. २०१५ च्या अखेरीस ती ४ हजार झाली. यासंबंधी परवानाधारक डॉक्टरही ५० टक्क्यांनी वाढून ४.५० लाख झाले आहेत. देशातील राजेशाहीचे पतन झाल्यावर १९११ मध्ये टीसीएमला अंधश्रद्धा मानले गेले होते.

माओंना यावर विश्वास नव्हता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गनिमी काव्यात मदत केली होती, त्यात टीसीएम लोकप्रिय होते.त्यामुळे ते सुरूच राहिले. ही उपचारपद्धती अॅक्युपंक्चर व काही प्राणी व वनस्पतींच्या घटकांपासून बनलेल्या काढ्यावर आधारित आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या पद्धतीचे पुरस्कर्ते आहेत. जुलै महिन्यात सर्व सरकारी रुग्णालयात टीसीएम विभाग उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

सकस आहार आणि जीवनशैलीचा विचार केल्यास टीसीएम योग्य असेल. पण यावर पैसा खर्च करणे म्हणजे चीनच्या दयनीय प्राथमिक आरोग्य प्रणालीला कमी पैसा मिळणार. तसेच पर्यावरण व दुर्मिळ प्राणीही धोक्यात येणार. तिबेटमध्ये यासाठी  इल्ली आणि फंगसच्या शोधात गवताळ प्रदेश नष्ट करण्यात आला. संधीवातावरील औषधासाठी द. आफ्रिकेतील सवाना येथे शिंग असलेल्या गेंड्यांची शिकार केली जात आहे. ही यादी खूप मोठी आहे. शी स्वत:ला देशभक्त आणि चिनी संस्कृतीचे पाठीराखे भासवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा अर्धवट वैद्यांऐवजी त्यांनी विज्ञानाला प्रोत्साहन दिले तर देशाचे भलेच होईल.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved. From The Economist, translated by DB Corp, published under licence. The original article, in English, can be found on www.economist.com
बातम्या आणखी आहेत...