आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा नदीच्या खोऱ्यातील शेतीविकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भ हा पावसावर आधारित शेतीचा प्रदेश असून, पीक उत्पादन आणि पाणी वापर कार्यक्षमता ही मान्सूनच्या अनियमिततेमुळे असमान आहे.
विदर्भात उपलब्ध सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर केल्यानंतरसुद्धा भविष्यात जवळपास ८५ ते ९० टक्के पिकाखालील क्षेत्र हे मान्सूनच्या पावसावर अनियमिततेवर अवलंबून राहणार आहे.
विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील उपजत खारपाणपट्ट्यातील शेतीविशेष असे वेगळे आव्हान आहे. या खारपाणपट्ट्यातील समस्या या इतर भागांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात या भागातील शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे क्रमप्राप्त आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे अगत्याचे आहे.
व्याप्ती: खारपाणपट्ट्यातविदर्भातील अकोला (१.९४ लाख हेक्टर), अमरावती (१.७४ लाख हेक्टर) बुलडाणा (१.०२ लाख हेक्टर) या तीन जिल्ह्यांच्या १६ तालुक्यांतील सुमारे लाख ७० हजार हेक्टर पिकाखालील जमिनीचा समावेश आहे. या खारपाणपट्ट्यातील जमिनीशी सुमारे १५ लाख लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न संलग्न आहे.
उत्पत्ती: पूर्णानदीचे खोरे पायनघाट मैदानाचा भाग असून. त्याच्या उत्तरेस मेळघाट, तर दक्षिणेस अजंठा पर्वताच्या रांगा आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार हा खारवट पट्टा प्राचीन काळी ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकांमुळे आणि लाव्हा रसाने खाडी बुजली गेली आजूबाजूचा गाळ साचून या खोऱ्यात खोलवर निव्वळ काळी, भारी, कसदार, खारवट सपाट माती भरली गेली. या जमिनी बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्यात. इतकेच नव्हे, तर खोऱ्यातील उत्तर आणि मध्यवर्ती भागाच्या भूगर्भातील पाणीसुद्धा खारवट आहे. त्यामुळे या भागाला खारपाणपट्टा म्हणूनसुद्धा संबोधले जाते.
वनस्पती: याखोऱ्यात बहुवर्षीय वनस्पतीचे प्रमाण कमी असून, या भागातील झाडांची घनता दर हेक्टरी ०.५ हेक्टरपेक्षा कमी आहे. सर्वसाधारणपणे या भागात गावांलगत आढळून येणारी झाडे म्हणजे बाभूळ, कडुनिंब, विलायती बाभूळ आणि मारवेल, कुंदा या प्रकारचे गवत आढळून येते. खरिपामध्ये कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर आणि रब्बीमध्ये करडई, हरभरा, ही पिके घेतली जातात.
भौतिकगुणधर्म : अतिशयकाळी खोल आणि कसदार जमीन कमी निचरा होणारी चिकण माती चुनखडीचे प्रमाण जास्त असलेली मोठ्या प्रमाणावर आकुंचन प्रसरण पावणारी आणि उन्हाळ्यात रुंद खोल भेगा पडणारी जमीन आहे.
समस्या: याजमिनी क्षार असून, चोपण आहेत त्यांची जलवाहकता अत्यल्प आहे. पावसाळ्यात जमिनी फुगणे, उन्हाळ्यात आकुंचन होऊन खोल रुंद भेगा पडणे, या खोऱ्यातील पाणीसुद्धा खारे (विम्लयुक्त) असून, ते ओलितासाठी उपयुक्त नाही. या पाण्याने ओलित केल्यास जमिनीच्या भौतिक रासायनिक गुणधर्मात अधिकच बिघाड होऊन तिची उत्पादनक्षमता घटते नापीक होतात. खरिपामध्ये पावसाच्या जमिनीच्या भूपृष्ठावर जास्त पाणी साचून राहते. याउलट रब्बीमध्ये खोल रुंद भेगा पडून जमिनीतील ओलावा कमी होतो. वनस्पती आच्छादनाची कमतरता आणि चिकणमातीचे अधिक प्रमाण यामुळे जमिनीची अधिक धूप होते.
उपाययोजना: भूगर्भातीलपाणी आम्ल असल्यामुळे खारपाणपट्ट्यात पिण्यासाठी गोड्या पाण्याचा पुरवठा करणे. ब्रिटिशकालीन जुन्या तलावाचे नूतनीकरण नवीन तलाव करणे, शेत रस्त्यांची निर्मिती दुरुस्ती करणे, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जिप्सम, जैविक, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, कास्तकारीच्या पद्धतीमध्ये बदल करून मूलस्थानी मृद जल संधारणाचे अवलंबन करणे, व्यापक प्रमाणात शेत तळ्याची योजना राबवून संकलित पाण्याची संरक्षित ओलितासाठी वापर करणे. नाल्याचे रुंदीकरण मीटरपर्यंत खोलीकरण करणे बाजूंचा उतार २:१ ठेवणे. नदीपात्रालगत पाण्याच्या प्रतवारीनुसार कूपनलिकांनाच प्राधान्य देऊन संरक्षित ओलितासाठी सोय करणे.नि:क्षारीकरणासाठी तसेच लवकर वापसा येण्यासाठी भूपृष्ठाखालील निचरा पद्धतींच्या वापरास चालना देणे.
जमिनीचेव्यवस्थापन भूसुधार द्रव्यांचा वापर : सोडियमचेप्रमाण कमी करण्यासाठी कॅल्शियमचा पुरवठा करणे. जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शियमची द्रव्यता वाढवण्यासाठी भूसुधार द्रव्ये वापरावे. २.५ टन प्रती हेक्टर (१ टन प्रती एकरी) जिप्सम दिल्यास कपाशी, ज्वारी, मूग आणि सोयाबीन यांचे उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्के वाढ दिसून आली. जिप्सम दिल्यामुळे िनचऱ्यामध्ये तसेच इतर भौतिक रासायनिक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. जिप्सम देताना जमिनीची उन्हाळ्यात मशागत करून घ्यावी.
अमरावती: जिल्ह्यातील१.७४ लाख हे. क्षेत्रातून या वर्षी अंदाजे सरासरी ३.४८ ते ४.३५ दशलक्ष टन माती पूर्णा नदीत वाहून गेली. त्याचसोबत १२९८ ते १५६२ टन नत्र, ३५१ ते ४४५ टन स्फुरद, ३८६४७ ते ४९०८३ टन पालाश आणि ०.१३ ते ०.१८ लाख टन सेंद्रिय कर्बएवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये वाहून गेलीत.
अकोला: जिल्ह्यातील१.९४ लाख हे. क्षेत्रातून अंदाजे सरासरी ३.८८ ते ४.८५ दशलक्ष टन माती पूर्णा नदीत वाहून गेली असून, त्यासोबत जमिनीतील १३५८ ते १७४२ टन नत्र, ३९१ ते ४९६ टन स्फुरद, ४३०८९ ते ५४७२५ टन पालाश आणि ०.१६ ते ०.२ लाख टन सेंद्रिय कर्ब वाहून गेले.
बुलडाणा: बुलडाणाजिल्ह्यातील १.०२ लाख हे. क्षेत्रातून अंदाजे २.०४ ते २.५५ दशलक्ष टन माती ७१४ ते ९१५ टन नत्र, २०६ ते २६१ टन स्फुरद, २२६५५ ते २८७७४ टन पालाश आणि ०.०८ ते ०.१० लाख टन सेंद्रिय कर्ब पूर्णा नदीत वाहून गेले. तिन्ही जिल्ह्यांतील ४.७० लाख हे. खारपाणपट्ट्याच्या म्हणजेच ८९४ गावांमधील शेतशिवारातून या वर्षी अंदाजे ते १२ दशलक्ष टन माती त्याचसोबत ०.३० ते ०.३८ टन सेंद्रिय कर्ब, ३२९० ते ४२२० टन नत्र, ९४९ ते १२०३ टन स्फुरद, १०४३९ ते १३२५८ टन पालाश पूर्णा नदीत वाहून गेल्याचे वास्तव समोर आले. एवढ्या माेठ्या प्रमाणात माती अन्नद्रव्यांच्या नुकसानीची जर दखल घेतली गेली नाही, तर या भागात राहणाऱ्या जवळपास १५ लाख शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न अधिक बिकट होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून मूलस्थानी जल मृद संधारणाचे साधे सोपे किफायतशीर तंत्रज्ञान वापरल्यास जवळपास वाहून जाणारी माती सेंद्रिय कर्ब आणि इतर अन्नद्रव्यांच्या प्रमाणात २८ ते ३७ टक्के घट होऊ शकते.
या शेतकऱ्यांच्या सहभागाने त्यांच्या शेतावर डॉ. पंदेकृवि अकोलातर्फे करण्यात आलेली प्रयोगांती सिद्ध झाले आहे. गरज आहे ती फक्त आता तातडीने उपाययोजना करण्याची आजमितीस उपलब्ध तंत्रज्ञानाच्या शिफारशींचे अवलंबन करण्याची.

लेखक हे कृषी पद्धती पर्यावरण केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संचालक आहेत. मो.९८२२७२३०२७