आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक मंदीच्या काळात बदलती फॅशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय नेत्यांच्या पत्नीच्या फॅशनवर सर्वांचेच लक्ष असते. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. कॅनेडी यांची पत्नी जॅकी कॅनेडी यांचा ग्लॅमरस अंदाज महिलांना प्रेरणा देत असे. जॅकी यांच्या हॅट, कार्डिगन आणि हेअर स्टाइलचे अनेक महिलांनी अनुकरण केले. वर्तमानकाळातील राजकीय नेत्यांच्या पत्नी कोणत्या ना कोणत्या रूपात जॅकी यांचेच अनुकरण करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे मिशेल ओबामा यांनी हवाई येथे सुट्यांचा मनमुराद आनंद लुटला. या दरम्यान 11516 रुपयांचा सोफी थीलेटचा सन ड्रेस त्यांनी परिधान केला होता.
एन. रोमनी यांनीही टीव्हीवर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत 50175 रुपयांचा रीड क्रेकोफचा बर्ड ब्रिंट ब्लाऊज घातला होता. आर्थिक मंदी लक्षात घेत फॅशन डिझायनर्सने या प्रसिद्ध महिलांसाठी स्वस्त कपडे डिझाइन केले आहेत. स्वस्त कपडे परिधान केल्याने उच्चपदस्थ राजकारणी आणि त्यांच्या पत्नीशी सामान्यांची नाळ जोडली जाऊ शकते. लग्नानंतर प्रिन्स विल्यम्ससोबत पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर कॅट मिडिलटनने स्पॅनिश रिटेलर जाराचा 5018 रुपयांचा निळा शर्ट परिधान केला होता. इंग्लंडमधील मध्यमवर्गीयांना तो भावला. अमेरिकेत एका टीव्ही कार्यक्रमात मिशेल ओबामा यांच्या एचएमच्या नक्षीदार ड्रेसने सा-यांना प्रभावित केले होते. जारा, एच अ‍ॅँड एम आणि युनिकलोसारख्या स्वस्त ड्रेस तयार करणा-या कंपन्यांनी अमेरिकी अ‍ॅपरेल निर्मात्यांना मोठे आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. अत्यंत झपाट्याने या कंपन्यांनी आधुनिक स्टाइल सादर केल्याने फास्ट फॅशन रिटेलर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांत युरोपियन आणि जपानी कापड उद्योगांनी गॅप व अमेरिकन ईगल आऊटफिटर्ससारख्या परंपरागत अमेरिकी कंपन्यांना पछाडत प्रगती साधली आहे. अमेरिकी कापड उद्योजकांनीही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी दुसरा मार्ग निवडला आहे. आता गॅप आणि मॅस्सीने टी शर्टऐवजी हँड बॅग, हेअर बॉबल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. याउपरही झपाट्याने बदलणारे स्टाइल आणि डिझाइनच्या मॉडेलचा अमेरिकी कंपन्यांना फटका बसू शकतो. विक्री अधिक आणि कमी नफा यावर हे मॉडेल आधारित असून, तुर्कस्तान, रोमानिया अशा जवळच्या देशांतून युरोपियन कंपन्या कमी कालावधीत कच्चा माल विकत घेऊ शकतात. अमेरिकी कंपन्यांचे पुरवठादार चढ्या दराने माल विकतात. या सा-यांमुळे अमेरिकी कंपन्यांच्या संकटांमध्ये वाढ होत आहे.