आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हाइट हाऊसमध्ये मानसोपचारतज्ज्ञाची नियुक्ती करा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेत्यांची भाषा आणि त्यांच्या वागणुकीचा अनेक शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात. त्यापैकीच काहींनी विचारले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा डोके ठिकाणावर आहे का? आपल्या देशाच्या अध्यक्षांविषयी कुणी असे विचारत असेल तर विचित्र वाटते. मात्र, कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी टेड ल्यू यांनी नुकतेच म्हटले की, ते व्हाइट हाऊसमध्ये मानसोपचारतज्ज्ञाच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवणार आहेत. 
 
यासोबतच अन्य काही मेंदूविकार तज्ज्ञांनी व्हाइट हाऊसमधील या तज्ज्ञाच्या नियुक्तीला पुष्टी दिली आहे. निवडणूक निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्यात एका वर्तमानपत्राने तीन प्रसिद्ध मानसिक आरोग्य विषयाच्या प्राध्यापकांचे हस्तलिखित पत्र जारी केले. यात स्पष्ट लिहिले होते की, ट्रम्प यांना भव्यपणा आवडतो. मात्र, कुणाचाही अपमान करायला त्यांना आवडते. त्यांना टीका आवडते, मात्र कल्पना आणि वास्तवातील फरक ते समजू शकत नाहीत. मेंदू अस्थिर असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे.  
 
तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या केवळ मानसिक आरोग्याच्याच नव्हे, तर शारीरिक आरोग्याच्याही चाचण्या घेणे आवश्यक आहे. मेंदूविकार तज्ज्ञांकडूनही तपासणी झाली पाहिजे. एका मनोविकार तज्ज्ञाने तर आणखी पुढचे वक्तव्य केले.
 
 यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टमध्ये त्यांनी  ‘टेंपरामेंट टेंट्रम’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात विघातक पातळीवरचा अहंकार आहे. त्यामुळेच ते कुणालाही अपमानास्पद वागणूक देतात तसेच असामाजिक वर्तणूक करतात.  
 
मेंदूचे आरोग्य जाणणारे, अभ्यासणारे हे तज्ज्ञ भयंकर  स्वभाव असलेल्या राष्ट्राध्यक्षापासून देश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लेटर टू एडिटर’मध्ये ३५ मनोविकार तज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर बाबी मांडल्या होत्या. त्यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये भावनात्मक अस्थिरता आहे. त्यांच्या निर्णयांवरून ते राष्ट्राध्यक्ष या पदावर राहून सरकार चालवण्यास पात्र नाहीत, असेच वाटते. त्यामुळे आम्हा सर्वांना देशाच्या भवितव्याबाबत भीती वाटते.’
 
 न्यूरोसायन्स व मानवी वर्तणूक तज्ज्ञ  
बातम्या आणखी आहेत...