आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोटला रांगेत थांबवून विकत घेतला आयफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक देशांत अॅपलच्या नव्या उपकरणासाठी लोक काही दिवस आधीच रांगेत थांबतात. सिडनीमध्ये अशाच एका नव्या उपकरणासाठी लुसी कायली (२३) यांनी स्वत: रांगेत थांबण्याऐवजी ठरलेल्या वेळेच्या २७ तास आधी रोबोटला रांगेत उभे केले. रांग जसजशी पुढे सरकत होती तसा रोबोट पुढे जायचा. रोबोटच्या चेहऱ्यावर लुसीने आयफोन अॅटॅच करून फ्रंट स्क्रीनवर तिचे स्वत:चे छायाचित्र लावले होते. त्याद्वारे लुसी बोलू शकत होती. तिचा आवाज ऐकून अन्य लोकांनाही चांगले वाटत होते.

सिडनीमध्ये शुक्रवारी अॅपलचे नवे उपकरण मिळणार असल्याची घोषणा झाली होती. सकाळी वाजता स्टोअर उघडणार होते. लाइनमध्ये उभ्या असलेल्या रोबोटने जसा फोन विकत घेतला, माध्यम प्रतिनिधींनी रोबोटच्या संपर्कातून लुसीची मुलाखत घेतली. लुसी स्क्रीनवर एकदम खुश दिसत होती. हे तंत्र भविष्याची नांदी आहे. येणारा काळ अशा प्रकारचा असेल. यावरून आपण तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करून घेणार आहोत याची माहिती समजते. लुसीने आयपॅड स्क्रीनवरून अॅपलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तिने दिलेल्या क्रेडिट कार्डाचा वापर रोबोटला करण्याची परवानगी मिळाली.

या वेळी स्टोअरच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितले, लुसीने तिच्या बॉसला अडचण सांगितली होती. एकाच वेळी ती दोन ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. शिवाय दोन दिवस रांगेत थांबणे आवडत नव्हते. यासाठी रोबोटला रांगेत उभे केले. तिचे सहकारीही रोबोटला अधूनमधून ऑपरेट करत होते. रोबोटला रांगेत उभे करून खरेदी करण्याचे हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.
valuewalk.com