आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबळ्या नेतृत्वाचा परिपाक : भारत-पाक संघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या वाढत्या घटना आणि पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातील उल्लेखामुळे भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा चर्चेत आले. मला वाटते, या समस्येचा शिक्षणाशी जवळून संबंध आहे. हे शिक्षण घरात, आजूबाजूच्या वातावरणात मिळते. दोन्ही देशांनी कितीही शाळा उघडल्या, विद्यार्थ्यांना अाधुनिक प्रयोगशाळा दिल्या, सुसज्ज वाचनालये, पोहण्याचे तलाव इत्यादी सुविधा दिल्या. या सुविधा मिळूनही मुले केवळ सहा तासच शाळेत घालवतील. मुलांना शाळेऐवजी बाहेरच्या जगातच अधिक ज्ञान मिळते, असा आमचा अनुभव आहे. शिक्षणात द्वेष पसरवला तर हिंसाचारालाच उत्तेजन मिळते.

भारत-पाक स्वातंत्र्य दिन साजरा करतात, तो केवळ उत्सव वाटतो. कारण लढाई आणि संघर्ष तर संपलेला नाही. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात होणारा संघर्ष संपला तरी आपण आपसातच लढतो आहोत. काही दिवसांपूर्वी मी एक इंटरनॅशनल व्हिडिओ पाहिला आहे, भारताची काश्मीर समस्या नसून ती अर्ध्या काश्मीरची समस्या आहे. व्हिडिओमध्ये भारत, पाक आणि चीनपैकी कोणाकडे कितवा हिस्सा आहे, हे दाखवण्यात आले आहे. हे सत्य तर धक्कादायक आहे. आम्हाला जो नकाशा शिकवला गेला तो प्रत्यक्षात वेगळाच आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वास माझे आवाहन आहे : दोघांनीही थेट बोलणी करून समस्या सोडवली पाहिजे. दुबळ्या नेतृत्वामुळे ही समस्या चिघळते आहे. दोन्ही देशांतील लाखो, करोडो जनतेला काही अडचण नाही. ७० वर्षांपासून डोकेदुखी बनलेल्या या समस्येपासून लाखो लोकांची सुटका होईल. ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतील. दोन्ही देश तिसऱ्या श्रेणीच्या नेतृत्वामुळे वेगळ्या जगतातील देश ठरत आहेत. आम्हाला अशी तक्रार करण्याची वेळच आली नसती.

ऋषी शहा, २१,
केपीएमजी, इंडिया
linkedin.com/in/rishishah20
बातम्या आणखी आहेत...