आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत ठणकवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली ७० वर्षे अाम्ही युद्ध करीत अालाे अाणि पुढील काही दशके सुरू राहतील हे सत्य अाम्हाला स्वीकारले पाहिजे. हे युद्ध सीमा अाेलांडून बरेच पुढे विस्तारले अाहे. म्हणूनच अाण्विक संघर्षाची काळजी न करता पाकिस्तानला घेरण्याची अायती संधी चालून अाली अाहे. भारताला मसूद अजहर, दाऊद इब्राहिम अाणि अायएसअायच्या कर्त्या-धर्त्यांना लक्ष्य बनवले पाहिजे. 
 
पाकिस्तानात बाॅम्बहल्ले केल्याने अडचणींत भर पडेल कारण चीनची पाकला साथ असून उर्वरित जगाला अाण्विक संघर्षाची ठिणगी पडू नये अशी काळजी अाहे. मला कळत नाही की, पूर्व पाकिस्तान प्रमाणेच बलुचिस्तानला पश्चिम भारत का बनवले गेले नाही.
 
परंतु, बांगला देशची पुनरावृत्ती करू शकत नाही असे थाेडकेच अाहे. संयुक्त राष्ट्रासारख्या व्यासपीठावर बलुचींचा अावाज उठवला तर पाकिस्तानी लष्कराला शह मिळेल. तसेच भारताने सिंधू पाणी वाटप करारातील शर्तींचा पूरेपूर लाभ घ्यायला हवा, ज्यामुळे पाकिस्तानची गाळण उडेल. 
 
पाकिस्तानचा जागतिक दहशतवादी कारवायांमधील सहभाग, बलुचिस्तान अाणि अधिकृत काश्मिरमधील मानवाधिकाराची स्थिती हे मुद्दे भारताने उचलून धरले तर पाकला बचावाचा पवित्रा घेणे भाग पडेल. अरब अमिरात, सऊदी अरब इत्यादी देशांना दहशतवादाच्या मुद्यावर सहमत करून भारताने पाकिस्तानच्या इस्लामिक कार्डची धार बाेथट केली असली तरी त्याची व्याप्ती अाणखी वाढवायला हवी.
 
 दुसऱ्या बाजूला चीनला देखील पुरेसे संकेत द्यायला हवेत. जपानशी भारताने संबंध बळकट केले तर अापाेअापच चीनवर दबाव वाढेल. भारताला तंत्रज्ञान, भांडवल मिळेल तर जपानला भारतीय बाजारपेठ. बांगलादेश अाणि श्रीलंकेचा विश्वास तर अाम्ही मिळवला अाहेच अाता नेपाळ अाणि अफगाणिस्तानशी जवळीत अाणखी वाढवायला हवी. भारताविरूध्द केलेल्या कट कारस्थानांचा हिशेब पाकिस्तानकडून वसूल केला पाहिजे, अाणि हीच भाषा पाकिस्तानला कळते.
केपीएमजी इंडिया
बातम्या आणखी आहेत...