आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य आशियावर भारताची ऊर्जा सुरक्षा अवलंबून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय सहकारीसंघटनेचा (एससीओ)गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विस्तार होतो आहे. ताश्कंदमध्ये २३ जूनला झालेल्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान सहभागी झाले होते. त्यामुळे याची आशा बळावली आहे. जुलै २०१५ मध्ये झालेल्या शिखर बैठकीत दोन्ही शेजारी राष्ट्रांना सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला. दोन नव्या सदस्यांसमवेत आता संघटनेत आठ सदस्य होतील. त्यांच्या भौगोलिक अस्तित्वाचा विस्तार दक्षिण आशियापर्यंत होईल. संघटनेत सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार, ऊर्जा, संस्कृती, संपर्क आणि एकूण प्रादेशिक स्थैर्याविषयी भूतकाळात अनेक करार यशस्वी झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करणे खूप कठीण जाते आहे. त्यानंतरही चीन आणि रशियासारख्या बलाढ्य शक्तीच्या अस्तित्वामुळे संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

भारताला सदस्य देशासोबत सहभागी करणे संघटनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. भारताची रणनीती, सुरक्षा आणि भू़-राजकीय हितसंबंध या संघटनेच्या जवळचे आणि विस्तारित शेजारी देशातील घटनांशी खूप जवळून संबंधित आहेत. आता या घटनाक्रमात थेट सहभागीदारी करण्याची संधी असेल. संघटने पुरते बोलायचे झाल्यास त्यात आणखी एक आर्थिक शक्ती सहभागी होईल. भारताची पोहोच मध्य आशियापर्यंत असेल. ती नैसर्गिक संसाधनांनी युक्त आणि जैविक इंधनांनी युक्त असेल, ही काळाची गरज आहे. यामुळे आपल्या ऊर्जेशी निगडित हिताचे रक्षण होईल. मग दहशतवाद आणि कट्टरपंथीयाच्या वाढत्या संकटाचा मुकाबला करण्यास सक्षम सदस्यांच्या संघटनेचे महत्त्व सदस्य देशांव्यतिरिक्त अन्य देशांनाही उपयुक्त ठरणार आहे. तथापि, दोन नवे सदस्य जोडल्या जाण्याच्या या निर्णयाची प्रभावी परिणामकारक अंमलबजावणी होते की नाही, हे तर येणारा काळच ठरवेल.

अंडर - चालूघडामोडीवर ३० वर्षे वयाखालील तरुणाईचे मत
बातम्या आणखी आहेत...