आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान तत्त्वातून शाश्वत विकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणून समान तत्त्वातून शाश्वत ग्राम विकासाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू अाहेत.भेदभावाची दरी संपुष्टात आणून सर्व घटकातील गरजूंना योजनांचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न हाेत अाहेत. राज्यात प्रथमच औरंगाबाद जि. प. प्रशासनाने हे पाऊल उचलले असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक चांगला आदर्श ठरेल.
 
जि ल्हा परिषदेतील १४ विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी उपलब्ध झालेला निधी, कधीपर्यंत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावयाची कामे, लोकप्रतिनिधींना वास्तव माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन आणि समान तत्त्वावर गट, गणात लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पथदर्शी पालन अाराखडा तयार केला जात आहे. यातून शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. राज्यात प्रथमच औरंगाबाद जि. प. प्रशासनाने हे काम हाती घेतले असून ते राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एक आदर्शवत ठरेल. 

शहर-ग्राम विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात. काेट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद,  ग्रामपंचायतीमार्फत योजना प्रभावीपणे राबवून शहर व ग्रामविकास साध्य करण्याची जबाबदारी आहे. १०० मागास, १०० ओबीसी, १०० ओपन, आदी गटातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गोरगरिबांचा विकास, महिला सक्षमीकरण आदींसाठी गायी, म्हशी, कृषी पंप, घरकुल, विहिरी, प्रक्रिया उद्योग यंत्रसामग्री आदींचा लाभ देण्याची तरतूद योजनेत असते. याचा सर्व गट व गण, वॉर्डांतील गरजू लाभार्थींना लाभ मिळायला हवा. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. एकाच तालुक्यातील गट व गणांतील, शहराच्या वॉर्डांतील लाभार्थींची निवड करून लाभ दिला जातो. यामुळे उर्वरित वॉर्डांतील, गावातील लाभार्थी, गाव, वॉर्ड विकासापासून आणि त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात. यातून भेदभावाची दरी निर्माण होते. 

सरकारच्या उद्दिष्टाला गालबोट लागते. कल्याणकारी योजना राबवूनही वर्षानुवर्ष शाश्वत विकास साध्य होत नाही.  हाच प्रकार सर्वत्र सर्रास सुरू आहे. त्याला औरंगाबाद जिल्हा परिषद अपवाद नाही. जि. प. कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनियमितता घडली आहे. काही मोजक्याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून योजना राबवण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी योजना पोहोचल्याच नाहीत. यातून विकासाची नव्हे तर भेदभावाची दरी निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांत वाद निर्माण होतात. 

प्रकरणे न्यायालयात जातात. सर्वसाधारण, स्थायी समितीत आरोप प्रत्यारोपातच अधिक वेळ जातो. ही बाब सीईओ मधुकरराजे अर्दड यांच्या अभ्यासातून निदर्शनास आली व त्यांनी यात बदल करण्यासाठी सर्व योजना समान तत्त्वावर राबवण्यासाठी ग्राम विकासाचा पथदर्शक अाराखडा तयार करण्याचे निर्देश सर्व १४ विभागांना दिले आहेत. त्यानुसार विभागनिहाय राबवायच्या योजनांची माहिती, त्यासाठी प्राप्त निधी, कधीपर्यंत कामे पूर्ण व्हायला हवीत, सर्व ठिकाणचे गाव, वस्ती, तांडा, लाभार्थी यांची समान तत्त्वावर निवड करणे व शासनाच्या नियम आणि निकषानुसार कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे चुकीच्या कामांना पायबंद लागेल. कामकाजात पारदर्शकता आणून ग्राम विकासाचा पाय मजबूत करण्यास मदत होणार आहे. भेदभावाची दरी संपुष्टात आणून सर्व घटकातील गरजूंना योजनांचा लाभ मिळेल. राज्यात प्रथमच औरंगाबाद जि. प. प्रशासनाने हे पाऊल उचलले असून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक चांगला आदर्श ठरणार आहे. 

अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नोटिंग लिहिण्यापासून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. चुकीच्या कामांना पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच कामकाजात सुधारणा करण्यासाठी लेखाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागनिहाय अाराखड्याची माहिती घेऊन सूचना केल्या जात आहेत. 

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन 
जि. प. निवडणूक रंगात आली आहे. नवीन पदाधिकारी निवडणुकीत जाहीरनामा तयार करून मतदारांना आश्वासित करत आहेत. कामे नियमात बसतात किंवा नाही हे त्यांना माहीत नाही. निवडून आल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे विकासकामे करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण नियमात बसतील तेवढीच कामे पूर्ण होतील. काही पदाधिकारी राजकीय ताकदीचा वापर करून नियमबाह्य योजना राबवण्याचा अट्टहास धरतील.  यापूर्वी असे घडले असून त्यास अधिकारी तेवढेच दोषी असतात. अशी प्रकरणे नंतर वादाचे कारण बनतात. या बाबींना कायमस्वरूपी पायबंद घालण्यासाठी अधिकारी पदाधिकाऱ्यांना कायेदशीर मार्गदर्शन करणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...