आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य : पक्षाचा नव्हे तर राजांचाच विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयनराजेंचा जनतेशी असणारा संपर्क, सडेतोड स्वभाव, शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन, राजघराण्यावरचे जनतेचे प्रेम, विरोधकांनी विशेषत: महायुतीने उपलब्ध न केलेला सक्षम पर्याय यामुळे उदयनराजे सहज निवडून आले.
सातारा जिह्याने माढा मतदार संघातील विजयसिंह मोहिते-पाटील यांनाही दोन विधानसभा मतदारसंघातून लक्षणीय मतदान करत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांची अब्रू राखली.सातारा वगळता बारामती, माढ्याचे मतदान कमालीचे घटले पण सातार्‍यात गेल्या निवडणुकीपेक्षा भोसले यांचे मताधिक्य कसे वाढले याचा विचार आणि कारणमीमांसा पाहाणे महत्त्वाचे ठरेल.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँगे्रसचा बालेकील्ला होता. कै. यशअवंतराव चव्हाण यांनी चारवेळा तर प्रतापराव भोसले यांनी हा बालेकिल्ला तीन वेळा ताब्यात ठेवला होता. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर आता चौथ्यांचा राष्टवादीने या मतदारसंघावर कब्जा केला आहे. विधानसभेचे सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत. शरद पवारांना मानणारा मोठा गट या जिल्ह्यात आजही कार्यरत आहे.तसेच पवारांचे अनेकांशी थेट, वैयक्तिक संबंधही या जिल्ह्यात आहेत. स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या गटाशी उदयनराजे यांचे तसेच अजित पवारांशी पटत नसले तरी शरद पवारांनी उदयनराजे चांगले खासदार आहेत ,माझे सगळे ऐकतात, माझ्या बैठकीला येतात, असे सांगत त्यांना प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर असलेल्या संपर्कामुळे खिशात टाकण्यास उदयनराजेंना अवघड नव्हते. उमेदवारी देण्याच्या नाट्याचा अंक आठ दिवस लांबल्याने भाकरी फिरणार अशी शक्यता निर्माण झाली होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवल्याने हे प्रकरण गंभीर होते आहे, असे वाटायला सुरुवात झाली होती. मात्र, एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वांनी निग्रहाने काम केले हे 3 लाख 66 हजार मताधिक्यावरून दिसते.

सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा...