Home »Editorial »Columns» Security And Hacker System Update Article

सुरक्षित आण्विक हत्यारेही हॅक होण्याची शक्यता

दिव्य मराठी | Mar 20, 2017, 01:33 AM IST

  • सुरक्षित आण्विक हत्यारेही हॅक होण्याची शक्यता
- ब्रुस जी ब्लेयर, आण्विक धोरणतज्ञ
अमेरिकेने आपल्या श्रेष्ठत्वाचा फायदा करून घेतला पाहिजे. आपली सायबर युद्धकला वेळीच पारखून अमेरिकेने उत्तर कोरियासारख्या स्पर्धकांवर नजर ठेवली पाहिजे. आजच्या काळात हे खूप आवश्यक आहे. उपग्रह संरक्षण प्रणाली सध्या झपाट्याने अद्ययावत होत आहे. अणू हत्यारांच्या जगात सध्या नवनवीन माहिती पुढे येत आहे. मात्र, अमेरिकेचे सैन्य सध्या तरी असे हल्ले रोखण्यासाठी समर्थ नाहीत. कित्येक वर्षे याबाबत कुणी विचारही केला नाही.

२०१० मध्ये आण्विक क्षमतेची ५० मिनटमॅन क्षेपणास्त्रे व्योमिंगमधील जमिनीखाली तैनात होती. मात्र, रहस्यमय पद्धतीने ती अचानक ‘गायब’ झाली. एक तासभर ती कंप्यूटर स्क्रीनवरुन गायब होती.
हा तांत्रिक बिघाड होता की हॅकरने त्याच्या लिंक गायब केल्या होत्या? ही क्षेपणास्त्रे कंप्यूटरच्या एका क्लिकवर प्रक्षेपित करण्यासारखी होती. हॅकर फायरवॉल तोडण्यात यशस्वी झाले होते, असे म्हटले जाते. एअरफोर्सच्या मते, अंडरग्राऊंड कंप्यूटरमध्ये कुणीतरी सर्किट कार्ड लावल्यामुळे क्षेपणास्त्रांची लिंक तुटली होती. काही वेळाने त्यात दुरुस्ती करण्यात आली.
कंप्यूटरशी जोडलेल्या या सामरिक हत्यारांमुळे ही चिंता वाढली आहे. यामुळे एखादा विदेशी एजंटदेखील एखाद्या देशावर क्षेपणास्त्र हल्ला करु शकतो. का? हॅकर्स खोट्या ‘अर्ली वॉर्निंग डेटा’च्या मदतीनेही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करु शकतील का? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न उभे राहत आहेत. अणू हल्ला झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांकडे त्याचे काय प्रत्युत्तर द्यायचे, यासाठी फक्त दोन ते तीन मिनिटांचा अवधी असतो.
ही भीती भयंकर आहे. अणू साहित्य आयात करणाऱ्यांवर अमेरिकन सैन्याचे पूर्ण नियंत्रण नाही. अमेरिकन संरक्षण प्रणालीतील हार्डवेअर, सॉफ्टवेअर्स सहज व्हायरसने प्रभावित होऊ शकतात. अंतर्गत व्यक्तीकडूनही गुप्त माहिती अन्य व्यक्तीबरोबर शेअर केली जाऊ शकते.

Next Article

Recommended