Home »Editorial »Columns» Sharad Pawar Politics

राजकीय छेडछाड हा पवारांचा छंद

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • राजकीय छेडछाड हा पवारांचा छंद

तळ्याच्या काठावर बसून संथ पाण्यावर खडे फेकण्याचा छंद असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सीनियर पवार साहेब. केंद्रात व राज्यात सर्वकाही शांत असताना स्वबळाचा गोटा मारून पवार साहेबांनी चाचणी घेतलीच. आपण फेकलेला खडा पाण्यावर किती टप्पे घेऊन तरंग निर्माण करतो व त्याचे काय अर्थ काढायचे या खेळात तसे ते प्रवीणच. अपेक्षेप्रमाणेच तरंगही उठले. मात्र, आता परिस्थिती थोडी बदलली आहे. महिला अत्याचाराविरुद्ध जसे कठोर कायदे होऊ पाहताहेत. तसेच काँग्रेसनेही पवार साहेबांबद्दल कठोर धोरण स्वीकारायचे ठरवलेले दिसते. कारण या वेळी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसी नेते फार उसळले नाहीत. त्यांनी शांत राहणेच पसंत केले.

ही धोक्याची घंटा पवार साहेबांसाठीच आहे. कारण आजपर्यंत राजकीय छेडछाड हा दखलपात्र गुन्हा ठरत नव्हता. मात्र, 2013 मध्ये आमूलाग्र बदल घडताहेत. असे वरचेवर छेडछाड करणाराविरुद्ध कठोर कारवाईचे सूतोवाच यूपीएने केले आहे. तेव्हा सीनियर पवार साहेबांची ही छेडछाड अशीच सुरू राहिली आणि यूपीए चेअरपर्सनने गंभीर दखल घेतली तर पवार साहेबांना खरोखरीच एखाद्या तळ्याकाठी बसून खडे मारत बसावे लागेल, अशी चर्चा सर्वत्र आहे.

Next Article

Recommended