आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीर : चेंडू आता पाकच्या पारड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि उत्तरेकडील प्रांतासह बलुचिस्तानचाही उल्लेख होता. हे केवळ दिखाऊ होते की धोरणात्मक मोठा बदल होता, हे तपासण्यासाठी आपल्याकडे आणखी पुरावे असण्याची गरज आहे. त्यांचे धोरण उघड झाल्यानंतरच ते समजेल. परंतु आतापर्यंतची पंतप्रधान मोदी यांची शैली पाहता हे नाट्यमय आणि मूलभूत परिवर्तन आहे, असे वाटते. जम्मू -काश्मीरवरून भारताने पाकिस्तानशी संवाद साधण्याची पद्धत गेल्या ७० वर्षांपासून अनेक घडामोडींतून आणि वळणाने गेली आहे. परंतु हा बदल सद्य:स्थितीला मजबूत करून जे वास्तवात दिसते आहे, त्याला वैध रूप देण्याच्या दिशेने जाण्याचे हे संकेत आहेत.

१९६५ पर्यंत भारताने आपल्या बाजूने पाकिस्तानशी बोलणी करण्याची तयारी दाखवली. यात प्रदेशाचे आदान-प्रदान करण्याची सूत्रेही समाविष्ट होती. १९६२ मध्ये चीनकडून दगाफटका झाल्यानंतर सरदार स्वर्णसिंग आणि झुल्फिकार अली भुत्तो यांच्यात टप्प्याटप्प्याने भारत व पाकचे रेल्वेमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या दरम्यान प्रदीर्घ चर्चेच्या फेऱ्या झाल्या. या फेऱ्या पाश्चिमात्य देशांच्या दबावापोटी होत्या. कारण भारताला चीनच्या विरोधात आपली बाजू भक्कम करण्यासाठी सीमा सुरक्षा दल सीमेवर तैनात करायचे होते. त्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून काश्मीरच्या मुद्द्यावर मदतही मागितली होती. उभय देशांच्या चर्चेत काही प्रगतीही झाली होती, असे समकालीन इतिहासकारांनी अधोरेखित केले होते. परंतु पाकिस्तान आपल्या अवाजवी मागण्या पुढे रेटत होता. मिळेल त्याहून आपल्या पदरात जास्त वाटा कसा पडेल, हेच तो पाहत होता. पाकचा कावा ओळखून यात स्वर्णसिंगांनी अाडकाठी आणणे सुरू केले. चीनकडून पराभव पत्करल्याने भारत कोंडीत सापडला आहे. आता संपूर्ण काश्मीर बळकावण्याची हीच खरी संधी आहे, असे आडाखे पाकने बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी काश्मीरमध्ये उपद्रवी घटनांना उत्तेजन दिले. तेव्हाचे हजरतबाल प्रकरण पुढे खूप गाजले होते. यादरम्यान जवाहरलाल नेहरू यांचा अचानक झालेला मृत्यू; त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांची उत्तराधिकारी म्हणून झालेली निवड अशा अनेक प्रश्नांनी देशात थैमान घातले होते. पाकिस्तानने भारताचे सैन्यबल अाजमावण्यासाठी कच्छच्या मैदानात युद्ध छेडले.

भारत युद्धाच्या तयारीत नव्हता. पाकिस्तानकडून अचानक झालेल्या रणगाड्यांच्या आक्रमणामुळे त्यांची अवस्था सैरभैर झाली. तेव्हाच रणनीती आणि स्ट्रॅटेजिकदृष्ट्या या ताकदीने आपले सैन्य न लढवता मोठ्या प्रमाणावर युद्धाची तयारी सुरू करावी, असा निर्णय लालबहादूर शास्त्री यांनी घेतला. त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. हे तेव्हा अनेक लेखकांनी अधोरेखित केले होते. त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर राबवून हजारोंच्या संख्येने घुसखोर (त्यात मोठ्या संख्येने सैनिकही होते) काश्मीरमध्ये पाठवले. तेव्हा पाकला यश मिळाले नाही. फील्ड मार्शल अय्युब खान यांनी छम्बमध्ये रणगाडे आणि तोफखान्यासह ऑपरेशन ग्रँड स्लॅमसह युद्ध छेडले. हे युद्ध २२ दिवस चालले. तसेच अडथळ्यासह संपुष्टात आले. त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. कारण त्यांनी जे काही मिळवण्यासाठी युद्ध केले ते त्यांना प्राप्त तर झालेच नाही. उलट चांगल्या क्षमतेची शस्त्रे नसताना अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे मिळालेल्या पाक सैन्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले, यामुळे पाकला धक्काच बसला. या निर्णायक टप्प्याचे अतिउत्तम असे वर्णन नुकतेच प्रसिद्ध झालेल्या “मान्सून वॉर’ या पुस्तकात आहे. याचे लेखक कॅप्टन अमरिंदर सिंग आणि लेफ्टनंट जनरल टी.एस. शेरगिल आहेत.

१९६५ मध्ये केलेल्या या आगळिकीचा पाकला चांगला धडा मिळाला. घड्याळाचे काटे उलटे फिरून पुन्हा १९४८ वर स्थिरावले. संयुक्त राष्ट्राच्या नियंत्रणाखाली शांतता बोलणी आणि जनमतसंग्रहावर विचारविनिमय करण्याचा हा निर्णय होता. काश्मीरला सैन्याच्या जोरावर जिंकून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पाकला संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव नेणे शक्य नव्हते. ही प्रक्रिया १९७२ मध्ये सिमला करारात पूर्ण झाली. इंदिरा गांधी यांना वाटले की, आपल्याच अटीवर काश्मीरचे मुद्दे ठरवत आहोत. हा इंदिराजींचा गैरसमज होता. त्यानंतर पाकने अण्वस्त्रे मिळवण्याची खूप धडपड केली. काश्मीरचा प्रश्न अजून सुप्तावस्थेत होता आणि काश्मीर खोरे शांत होते. परंतु १९७० च्या उत्तरार्धात अफगाणिस्तानात रशियाचे आक्रमण आणि अमेरिकेचे समर्थन प्राप्त असलेल्या मुजाहिदिनने पाकच्या भक्कम मदतीने रशियाचा मुकाबला केला तेव्हा परिस्थिती बदलली. १९८० च्या दशकाच्या शेवटी पाकला वाटले की, हाच प्रयोग पंजाब आणि काश्मीरमध्ये भारताविरुद्ध वापरण्यास काय हरकत आहे? तेव्हापासूनच काश्मीरमध्ये सध्याच्या अशांततेच्या कारवायांना प्रारंभ झाला. तेव्हापासून पाक आणि भारताने एकच रणनीती आखली आहे. ज्याचे वर्णन माओ “टॉक टॉक, फाइट फाइट’ असे करतो. संघर्ष केवळ निम्न पातळीवर आणि खोऱ्यापर्यंत मर्यादित राहिला. पंतप्रधानांनी सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान व उत्तरेकडील प्रांताचा उल्लेख करून या मुद्द्याला बगल दिली आहे. नवी पद्धत अशी की, जर तुम्ही आमच्या कमकुवत भागात काही गोंधळ कराल तर आम्ही तुमच्या सर्वात नाजूक बनलेल्या प्रदेशात तसेच करू. मग भौगोलिक मर्यादा कशीही असेल. या मर्यादेपर्यंत भारताने खेळाचे नियम बदलले आहेत. आता चेंडू पाकच्या पारड्यात आहे.

शेखर गुप्ता
प्रख्यात संपादक
बातम्या आणखी आहेत...