आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिस:निरर्थक उतावीळपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळात दोन प्रकारचे संघ असतात, असे म्हटले जाते. एक पराजयाच्या जबड्यातून विजय खेचून आणतो. दुसरा विजयाच्या जबड्यातून पराजय ओढवून घेतो. आपण भारतीय खास तिसऱ्या प्रकारचे आहोत. असमंजसपणात आपला हात कोणी धरू शकत नाही. आपण दुसऱ्याचे संकट ओढवून घेतो. भूतकाळात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत असेच धोरण अवलंबले. नव्वदच्या दशकातील आशियातील आर्थिक संकट आणि त्याचवेळी २००८ मधील जागतिक मंदी. आपण पूर्व आणि पश्चिमेकडील समस्यांसाठी आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरणास दोष देत होतो. या समस्या आपल्याकडे कधी ना कधी येतीलच. मात्र, त्यांच्या सुधारणा आणि अटी अंशत: ही लागू केलेल्या नव्हत्या. तसेच या "घोडचुका' केल्या नाहीत म्हणून आपलीच पाठ थोपटून घेत होतो.
जरा आठवून पाहा. इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने २००८ च्या अार्थिक चक्रातून आपला देश कसा बचावला होता, याचा उल्लेख सोनिया गांधींनी अनेकदा केला होता. राष्ट्रीयीकरण होऊन गेल्यानंतर नव्या खासगी बँकांची अार्थिक स्थिती चांगलीच होती. थोडक्यात, भारतीय बँकावरून कोणाला धोक्याचा इशारा मिळालेला नव्हता, तरीही सोनिया गांधी यांनी याचा उल्लेख केला होता. आता आम्ही सर्वजण इसिस आणि जागतिक जिहादच्या बाबतीत तेच तर करतो आहोत.
सध्याच्या काळात एकदा का आपली ठाम समजूत झाली की, कोणाचेही मन विचलित होत नाही. तरीसुद्धा सत्तेवर बसलेले सत्ताधीश आणि टीकाकार दहशतवादाच्या विरोधात जागतिक लढाईच्या बाजूने सहमतीचा सूर आळवत आहेत. जणू इसिसचे हल्लेखोर भारताच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत आणि त्यांना आपण रोखले नाही, तर खूप उशीर होईल, असे त्यांना वाटते आहे. परिणामी, आपल्या देशातील १५ कोटी मुस्लिम नागरिकांना एकाच पारड्यात तोलले जात आहे. जेव्हा "अब्राह्मिक' श्रद्धेनुसार "दुसरे' काफिर किंवा नास्तिक आहेत, असे असूनही येथील भारतीय धर्माच्या अनुयायांनी कधीच दुसऱ्यांच्या विरोधात लढा देण्याचा उपदेश केला नाही. मग असा अविवेकी विचार केला जातो आहे. धार्मिक मुद्दे आणि इतिहासाचे दाखले हा विषय बाजूला ठेवूया. आपल्या देशावर पहिला हल्ला चढवणारा मुहमंद बिन कासिम ७११ मध्ये सिंधमध्ये आला नव्हता. तत्पूर्वीही आपला धार्मिक इतिहास खूप हिंसाचाराने बरबटलेला आहे. कलिंगच्या युद्धातील प्रचंड हिंसाचार पाहूनच तेथील अनिभषिक्त सम्राट अशोक शांततामय मार्गावरील बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यास विवश झाला. हाही मुद्दा आता बाजूला ठेवू.
भारतासमोर इस्लामी दहशतवादाचा धोका तर आहे, परंतु याचा उगम पाकिस्तानात आहे. यामागे लष्कर आणि त्यांचे कर्तेकरविते पाक सेना व आयएसआयचा द्वेष आहे, इस्लाम नव्हे! जिहादचे औचित्य म्हणून इस्लाम हा घटक आहे. पण भारतास हानी पाेहोचावी, तो नेस्तनाबूत करावा किंवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा ध्वज फडकवावा, असा उद्देश यामागे आहे. परंतु इसिसची चळवळ येथे वाढावी, असे नव्हे. यासंबंधात, मला खूप जबाबदारीने आणि योग्य तारतम्य राखून सांगावे लागणार आहे. पाक प्रशिक्षित दहशतवादी हे इसिसपेक्षा कमी क्रूर आहेत, हे सांगण्याचा माझा प्रयत्न अाहे, असे काही सज्जनांना वाटेल, याची मला जाणीव आहे. मी जो फरक दाखवतो आहे, तो असा की; पाकच्या "बृहद योजने'त भारतीय मुस्लिमांना आपले नैसर्गिक सहकारी समजले जात नाही. दुसरे असे की, भारतावर नजर ठेवून असलेली इसिस चळवळ मात्र येथील मुस्लिमांना आपला सहकारी मानते. हेच धोकादायक आहे. आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात पाकचा एखाद दुसरा झेंडा फडकावण्याशिवाय इसिसची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. भारतात १५ कोटींच्या मुस्लिम लोकसंख्येत केवळ ४ संशयित पकडले गेले. तेही जे इसिसमध्ये गेले होते किंवा जाण्याच्या प्रयत्नात होते. आम्हाला मात्र आतापर्यंत १५० लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे सांगितले जाते. जेव्हा इंडियन मुजाहिदिनची चळवळ जोमात असतानाही केवळ शे-दोनशे लोकांपेक्षा अधिकांचा सहभाग नव्हता. प्रत्येक मुस्लिम संघटना, उलेमा आणि धार्मिक राजकीय पक्ष संघटनासुद्धा इसिसच्या विरोधात आहेत. हैदराबाद व आजूबाजूच्या परिसरात असदुद्दिन ओवेसी यांनी मोठे होर्डिंग्ज लावून इसिसला गैर इस्लामी ठरवले आहे. मध्य-पूर्वेत इस्लामची समस्या ही त्या भागातील विशिष्ट समस्या आहे. राज्याची ओळख ठसवण्यासाठी आणि त्यांची ताकद दाखवून देण्यासाठी वहाबी (सौदी अरब) आणि शिया (इराण), यासारख्या कट्टरपंथी मुस्लिमांचा वापर करण्याचा इतिहास आहे. येथे सुन्नी, शिया, कुर्द, तुर्क ख्रिश्चनांचे विविध पंथ, बदायूनी, हाशमी आणि यहुदी इत्यादी धर्म शांततेने येथे नांदले आहेत किंवा विविधता किंवा विविध संस्कृतीचा इतिहास नाही. फ्रान्स आणि ब्रिटनसह युरोपातून झालेला प्रवेश आणि अमेरिकेने नुकताच केलेल्या हल्ल्याचा इतिहास आहे. हा बाहेरचा हस्तक्षेप आणि हल्ल्यामुळे निर्वासित झालेले मुस्लिम आणि त्यांचे युरोपीय वसाहतीचे मालक यांच्यातील काही मुद्दे आहेत. यापैकी कोणताही मुद्दा दहशतवाद्यांसाठी योग्य आहे, असे मानले जाऊ शकत नाही; परंतु हा मुद्दा मध्य-पूर्व आणि युरोपात अस्तित्वात आहे.
आता आम्ही स्वत:ला इतके वेगळे आणि अहम का समजत आहोत? इथपर्यंत की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची शपथ घेणारे राज्यपाल मुस्लिमांनी पाकिस्तानात किंवा बांगला देशात जावे असे सांगत आहेत. आमची वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह आपण सर्व जण इसिसचा धोक्यावरून आपण इतकी विक्षिप्त भूमिका का घेत आहोत. खतरनाक दहशतवादी आपल्या उंबरठ्यावरही आलेले नाहीत आणि जर असा धोका निर्माण झालाच तर भारत आणि भारतीय मुस्लिम समाज त्यांच्याशी सामना करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत. येथे विशेष उल्लेखनीय बाब अशी की, या उपखंडातील मुस्लिम विशेषत: भारतीय मुस्लिम सूफी पंथाने प्रेरित आहेत. त्यांना मूर्तिपूजेपेक्षाही इसिसची विचारसरणी अधिक तिरस्करणीय आहे. अशा प्रकारे उपमहाखंडातील मुस्लिम इसिसला घाबरतात आणि त्यांना विरोधही करतात. आमच्या मुस्लिमांनी ज्या प्रकारचा इस्लाम धर्म स्वीकारला आहे, तो इसिससाठी खूप मोठा अडसर ठरणार आहे. जर तुम्ही येथील मुस्लिमांशी इसिसच्या पाचव्या स्तंभासारखे वागाल तर तुम्ही नवी युरोपीय मानसिकता आणि अनुदारवाद स्वीकाराल आणि त्यांच्या पराभवाला स्वत:च ओढून आणाल!

Twitter@ShekharGupta