आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सैन्यच देश चालवतात... ( शेखर गुप्ता)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९० च्या उन्हाळ्यात भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते. तेव्हा बेनझीर भुत्तो यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. तीसुद्धा एका हाताने दुसऱ्या हातावर कापून टाकण्याची चिन्हं दर्शवत “जग-जग-मो-मो हन-हन’ हिंस्र अशा मुद्रेत म्हटले होते. त्यांनी भारताशी १ हजार वर्षांपर्यंत युद्ध लढण्याच्या वडिलांच्याच धमकीचा पुनरुच्चार केला होता. या घटनाक्रमाची बातमी मिळवण्यासाठी मी पाकिस्तानला गेलो होतो. १ मे रोजी मी लाहोरमध्ये होतो. तेव्हा माध्यमातील माझ्या काही मित्रांनी मला ‘कलाम यांच्या मजूर रॅलीत’ सहभागी होण्यासाठी ‘पाक टी हाऊस’मध्ये आमंत्रित केले होते. उदारमतवादी शायर हबीब जलीब या रॅलीचे स्टार होेते. त्यांनी काश्मीरमधील तणावावरून नव्यानेच रचलेले एक गीत ऐकवले. हृदयाला भिडणाऱ्या त्या गीताचे बोल मला आजही आठवतात.
नशिली आँखों, सुनहरी
जुल्फों के देश को खोकर
मैं हैरां हूं वो जिक्र
वादी-ए-कश्मीर करते हैं

त्यांनी म्हटले, पाक (लष्कराने) या अाधीच देशाचा पूर्वेकडील भाग गमावला आहे आणि यामुळेच आता काश्मीरवरून जिद्दीने भांडणे मूर्खपणा आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नेहमी िवचारतो, पाकचे सैन्य चांगले, वाईट, श्रेष्ठ की दुष्ट कसे आहे? ते अजिंक्य आहे की सहजपणे पराभूत होणारे आहे. ते देशभक्त सैन्य आहे की अण्वस्त्रसज्ज असे इस्लामी लष्कर? तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात त्यावर याचे उत्तर अवलंबून आहे. मी वर दिलेल्या सर्व सकारात्मक पर्यायांचा वापर करेन. परंतु मला निर्वासित म्हणून राहावे लागेल अथवा आपले प्राइम टाइम योद्ध्यांना जसे वाटते की बॉलीवूड चित्रपटामध्ये पाकिस्तानी सैन्याचे जसे वर्णन दाखवले जाते तशाच प्रकारचे अनपढ, भित्रे आणि सहजपणे पराभूत होणारे सैन्य आहे.
तथापि, जे विश्लेषण, चर्चा आणि देशहिताच्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यासाठी पाक फौजा, त्यांची मानसिकता, ध्येय, जुना इतिहास आणि सध्याच्या विचार प्रक्रियेचे व्यावहारिक आकलन असणे गरजेचे आहे. पाकशी व्यवहार करताना असे वाटत राहते की पाकिस्तान आणि त्यांचे सैन्य एकच आहेत की वेगवेगळे? त्यांच्या या विरोधाभासाचे अवघड असे आव्हान असते. तुम्ही केवळ पाकिस्तानशी (किंवा लोकांशी) संबंध ठेवून पाक लष्करास वेगळे ठेवू शकता काय? किंवा सैन्याशी संबंध ठेवून देशाकडे दुर्लक्ष करता का? जर दोघांशी संबंध ठेवायचे असल्यास पहिल्यांदा कोणाशी व्यवहार कराल? ते शक्य आहे का?
असा संशय जरी वाटला तर एका प्रतिष्ठित परदेशी व्यक्तीचा शोध घ्या. यासाठी मी भारत व पाकिस्तान व त्यांच्या सैन्याकडून जागतिक स्तरावर सन्मानित विद्वान प्रा. स्टीफन पी. कोहेन यांच्या ओळींचा उधार घेतो- त्यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘पाकिस्तान आर्मी’ (१९८४, हिमालयन बुक्स) या पुस्तकात त्यांनी पाक सैन्याचा उल्लेख ‘कधीही युद्ध न जिंकलेले जगातील सर्वश्रेष्ठ असे सैन्य’ असा केला आहे. पाक सैन्याची खरी समस्या येथेच आहे. आपण जिंकलो आहोत, हा केवळ त्यांचा भ्रम आहे. पाक सैन्य कठोर, कार्यकुशल, उन्मत्त आहे. परंतु त्यांचा मेंदू डोक्यात असण्याऐवजी गुडघ्यात आहे. पाक सैन्याकडे लढण्याची भयानक अशी ताकद आहे. शिवाय तंत्रज्ञानाचा वापर करणारे, कमांडरच्या आदेशाचेही व्यावहारिक पालन करणारे आणि घातक प्रहार करण्यास सक्षम अशी इस्लामी फौज आहे; परंतु त्यांची ही भूमिका कोणत्याही सराईत अशा सैन्यापेक्षाही अधिक व्यापक, महान, वैचारिक, नैतिक आणि स्वत:ला पवित्र मानते. येथेच भारत व त्यांच्या देशासाठी ही समस्याच वाटते. आता जीएचक्यूने केवळ सत्तेवर ताबा मिळवला आहे असे नव्हे तर देश त्यांच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीतून पाक जातो आहे. पाक सैन्याला अशा प्रकारचा दर्जा व सन्मान घेण्याचा अधिकार आहे काय? याचे उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी अशी कोणती आश्वासने दिली होती हे पाहूयात. जर मुख्य मुद्दा काश्मीर जिंकण्याचा असेल तर त्यात त्यांना यश मिळालेले नाही. पाकिस्तानजवळ १९४८ च्या तुलनेत काश्मीरचा भाग खूप कमी आहे. त्यांनी सियाचीन आणि कारगिल, तुर्तुक इत्यादी गमावलेला आहे. भूभाग आणि वैचारिक सीमेचे रक्षण करण्याचे त्यांचे वचन हाेते; पण बांगलादेश असा शब्द उच्चारताच ते वचन कुठल्या कुठे पळून जाते.
लष्कराने देशातील संस्था आणि लोकशाहीला उद््ध्वस्त केले. त्यांच्या पासपोर्टचा सन्मान गमावला आहे आणि या देशाचे रूपांतर जिहादसाठीच्या जागतिक विद्यापीठात केले आहे.
परंतु भारताने प्रगती केली आणि पाक नव्या खाईत लोटला गेला : ६५ टक्क्यांहून अधिक उत्पन्न असलेला देश २० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तसेच हे अंतर आता दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांनी वाढते आहे. अशा प्रकारे आमच्याशी (चांगल्या प्रकारे) लढलेल्या अनेक लढायांत त्यांचे जे काही दावे असू द्यात त्यांनी आपल्याच गुलाम देशाला गमावले आहे. कधी-कधी काही भारतीयांना ठार मारून त्याचा आनंद घेणे हा आत्मघातीपणा आहे. जगातील एकमेव असे सर्वश्रेष्ठ सैन्य आहे जे आपल्याच देशाला नष्ट करण्यास निघाले आहे.
Twitter@ShekharGupta
बातम्या आणखी आहेत...