आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्मरणात गेलेले युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण लढलेले असे एक युद्ध ज्याची फारशी आठवणही काढली जात नाही, असे कोणते युद्ध असेल बरे? १९६२ मध्ये लढलेले चीनविरुद्धचे युद्ध... नाही. हे युद्ध खूप विनाशकारी होते. या युद्धात लढलेल्या सैनिकांचे कायम स्मरण करतो. ज्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले, त्यांना आदरांजली वाहतो.

लिट्टेच्या विरोधातील असे एकमेव युद्ध आहे.. त्याची आठवणही कोणी करत नाही. या लढ्यातील परमवीर चक्रप्राप्त सैनिकांचे नावही अनेकांना आठवत नाही. आपले राजकारणी, सैनिक, बुद्धिजीवी वर्ग आणि लोकसंस्कृती असलेली समाज व्यवस्था हे युद्ध झालेच नाही, असे जणू दाखवते. शांतिसेनेच्या माध्यमातून भारतीय सेनेने १९८७ मध्ये श्रीलंकेत लिट्टेच्या विरोधात लढा दिला. राजीव गांधी यांनी हे सैन्य पाठवले होते. हे युद्ध १९९० पर्यंत चालले. तेव्हा व्ही. पी. सिंगांनी शांतिसेनेला परत बोलावण्याची प्रक्रिया सुरू केली. ही काही छोटी-मोठी लढाई नव्हती. खूप दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. सेनेच्या मुख्य मोर्चातील तीन संपूर्ण डिव्हिजन जाफना, प्रायद्वीप, बट्टिकलोआ आणि त्रिकोमालीमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. या युद्धात खूप मोठे बलिदान झाले. आपले १२०० सैनिक शहीद आणि काही हजार सैनिक जखमी झाले.

दुर्दैव असे की, आपली सेना फक्त लिट्टेशीच लढत नव्हती. कल्पनेपलीकडे धूर्त आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज असलेला तो शत्रू होता. याउलट आपले सैन्य एका मोठ्या कारस्थानात फसलेले होते. भारत-श्रीलंकेतील राजकीय पक्ष, सैन्य दल आणि गुप्तहेर संघटनाही या कारस्थानात सहभागी होत्या. हे सर्व परस्पर अविश्वास आणि वेगळ्याच उद्दिष्टांसाठी काम करत असल्याचे दिसून येत होते. लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरन मारला किंवा पकडला जावा, असे आपल्या राजकीय नेतृत्वालाच नव्हे, तर गुप्तहेर संघटनेलाही वाटत नव्हते, हे भारतीय सेना तेव्हाच उमजून चुकली होती. काही लोकांना प्रभाकरनच महत्त्वाचा वाटत होता. त्याला आणि त्याच्या साथीदारांना आपल्याच गुप्तहेर संघटनेने प्रशिक्षित केलेले होते. तो आपल्या कामाचा माणूस आहे, असेच त्यांना वाटत होते.

जयवर्धने यांच्यानंतर प्रेमदासा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा तर परिस्थिती अधिकच बिकट बनली. आपल्या देशात भारताकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा ते तिरस्कार करत असत. जयवर्धने यांनी देशाचे स्वातंत्र्य गहाण टाकले, असा त्यांनी आरोप केला होता. त्यांनी शांतिसेनेच्या विरोधात प्रभाकरनसोबत हातमिळवणी केली. राजीव गांधींच्या हत्येनंतर मी कोलंबोला गेलो. तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि सक्षम असे संरक्षण मंत्री असलेले ललित अथुलतमुथली यांनीच मला सांगितले, उत्तरेत शांतिसेना लढत होती, आपल्या सैनिकांचे बलिदान होत होते, तेव्हा प्रेमदासा लिट्टेला शस्त्रात्रे आणि दारूगोळा पुरवत होते. श्रीलंकेस भारत सरकारने भेट म्हणून दिलेल्या ट्रकमधूनच या दारूगोळ्याचा पुरवठा व्हावा, ही दुर्दैवाची बाब आहे.

काही वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगे यांनी अधिकृतरीत्या याला दुजोराही दिला. भारतीय सेना अशा रक्ताच्या दलदलीत सापडली होती. जेव्हा ती उत्तरेत गनिमी हल्ले, इलेक्ट्रॉनिक विस्फोटके आणि तांत्रिक व युद्धसामग्रीचा धाडसाने मुकाबला करत होती तेव्हा कोलंबोतील मुख्य राजमार्गावर (प्रेमदासा सरकारच्या चिथावणीवरून) शांतिसेनेचे विकृतीकरण केलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. शांतिसेनेच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येत होती.
या दरम्यान दिल्लीत मोठे राजकीय फेरबदल झाले. राजीव गांधी १९८९ मध्ये निवडणूक हरले. आणि व्ही. पी. सिंग आघाडी सरकारचे पंतप्रधान झाले. या आघाडीमध्ये द्रमुक सहभागी हाेता. द्रमुक नेते करुणानिधी यांनी शांतिसेनेच्या प्रति असलेली नाराजी लपवलेली नव्हती. राजीव गांधी यांच्या लंका करारास एमजीआर यांचा आशीर्वाद होता. (त्यांचे निधन डिसेंबर १९८७ मध्ये झाले तेव्हा लढाई आरंभीच्या काळात जोरात सुरू होती.) त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या धोरणांना पाठिंबा देण्यास तयार नव्हते. हा इतिहासातील असा अध्याय आहे की, ज्याची खास नोंद झालेली नाही. जर तुम्ही तरुण असाल तर याची काही माहिती तुम्हाला असेलच. तुम्ही शुजित सरकारचा "मद्रास कॅफे' हा चित्रपट पाहिला असेलच. तर या चित्रपटात रक्तरंजित कारस्थान पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

श्रीलंकेत प्रेमदासा आणि भारतात व्ही. पी. सिंग असताना शांतिसेनेची भूमिका पूर्णपणे अस्वीकार्य ठरली. मग भारतीय सेनेने श्रीलंकन्सना तशा अवस्थेत सोडून परतण्यास सुरुवात केली. सैनिकांचा पहिला टप्पा चेन्नईच्या बंदरावर पोहोचला. या वेळी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी तामिळींच्या मारेकऱ्यांचे स्वागत करणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. हा आपल्या राष्ट्रीय तथा सैन्याच्या इतिहासातला सर्वात दु:खद क्षण होता. शांतिसेना आणि तिन्ही डिव्हिजनचे कोणीही स्वागत केले नाही की शौर्याचे गीत गायले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत वाईट युद्ध अशा स्वरूपात ते बाद ठरवले.
राजकीय स्वरूपात भारतात आघाडीचे स्वरूप आले. द्रविड, द्रमुक किंवा अण्णाद्रमुकची केंद्रात सरकार स्थापण्यासाठी गरज पडू लागली. शांतिसेनेचा लढा कधी झालाच नाही, असे दाखवण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. हे युद्ध आणि शांतिसेनेचे बलिदान सोयीस्करपणे विसरले गेले. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांचे सरकार स्थापन झाले. त्यांनी शांतिसेनेच्या स्मरणार्थ संस्मरणीय असे स्मारक तयार केले. द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्ष नाराज होतील म्हणून भारतीय नेते त्या स्मारकास भेट देण्याचे धाडसही करत नाहीत. कोलंबो दौऱ्यात मनमोहनसिंग यांनीही स्मारकाची भेट टाळली. आता कुठे नरेंद्र मोंदींनी तेथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर भारतातील अनेक मान्यवरांनी श्रीलंकेच्या दौऱ्याप्रसंगी शांतिसेनेच्या स्मारकाचे महत्व जाणले. गेल्या आठवड्यात कोलंबोला गेलो असता मी स्मारकास भेट दिली. वार्ताहर म्हणून युद्धांचे वार्तांकन केले होते, त्या आठवणी ताज्या झाल्या. राजकारण किती तिरकस आणि स्वार्थी असू शकते, याचीही जाणीव झाली. शांतिसेनेचे सर्व सन्माननीय सैनिक त्याचे बळी कसे ठरतात हेही कळले. जर कोलंबोला कधी गेलात तर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करा. ऊर अभिमानाने भरून येईल.