आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमध्ये क्रांती नको, सुधारणा हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या क्रीडा प्रकाराच्या यशस्वितेसाठी वय, राजकारण, अार्थिक स्थिती, खेळाची पार्श्वभूमी यापैकी कशाचाही संबंध नाही. त्यामुळे देशातील सर्वोत्कृष्ट असलेल्या क्रिकेट या खेळाचा प्रमुख कोण असेल, हे ठरवण्यास लोढा समितीचीही मानके योग्य आहेत का? 
 
न्यूझीलंडकडून  तसेच ऑस्ट्रेलियन टीमकडून झालेल्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू इम्रान खान संतापला आहे. तो म्हणाला, ‘पाकिस्तानमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, भारतापेक्षा कमी लोकसंख्या असूनही पाकिस्तानने भारतापेक्षा जास्त चांगले आणि वेगवान बॉलर्स जन्माला घातले आहेत.’ या वक्तव्यातील गर्वहनन आपण अनेक पद्धतींनी करू शकतो. मात्र, इम्रान पुढे म्हणाला की, भारतीय खेळाडूंमध्ये नाही, तर क्रिकेट बोर्डातच खोट आहे. काही चतूर लोकांच्या हाती त्याची सूत्रे आहेत. सुधारणा केली तर देश सर्वोच्च स्थानी पोहोचेल. 

आपल्याकडेही हेच म्हटले जाते की, आपले खेळाडू उत्कृष्ट आहेत, पण बीसीसीआयवर भ्रष्टांचेच राज्य आहे. त्यात सुधारणा झाली तर सर्वकाही सुरळीत होईल. पाकिस्तानमध्ये आधी राष्ट्रपती आणि आता सरकारद्वारे बोर्ड प्रमुखाची नियुक्ती केली जाते. सध्या माजी परराष्ट्र सचिव आणि भारतीय उच्चायुक्तालयात काम केलेले शहरयार खान हे पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख आहेत. ते भारतीय खेळाडू मन्सूर अली खान नवाब पटौदीचे नातेवाईक आहेत, एवढाच त्यांचा आणि क्रिकेटचा संबंध. बोर्डाच्या अशा कारभारामुळे पाकिस्तानी क्रिकेट लयास गेला आहे. याउलट स्वायत्त बोर्डाच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट बहरत आहे. इतर खेळांचा विचार केल्यास, कुस्तीत आपण विविध पदके काबीज करत आहोत. एवढेच नाही, तर प्रो रेसलिंग लीगद्वारे जगातील उत्कृष्ट, प्रतिभावान  खेळाडूंना आकर्षित करत आहोत. बॅडमिंटनमध्येही आपण नवी जागतिक शक्तीच्या रूपात चीन आणि मलेशियाला आव्हान देत आहोत. राजकीय नेते अखिलेश दास हे भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रमुख आहेत. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. बॅडमिंटन संघात अनेक वाद आहेत, मात्र बॅडमिंटन यापूर्वी कधीही एवढ्या चांगल्या स्थितीत नव्हते. दास कधीही बॅडमिंटन खेळले नाहीत.  

भारतीय कुस्ती महासंघ म्हणजे पाच वेळा खासदार राहिलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांची मक्तेदारी. त्यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत आरोप आहेत. टाडाअंतर्गत ते तुरुंगातही होते. कुस्ती महासंघ आणि बॅडमिंटन संघाचे शरण आणि दास हे लोढा समितीच्या मानकांनुसार अपयशी ठरले असते. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली हे खेळ बहरत आहेत. २००७ ते २०१२ पर्यंत बॉक्सिंगही यशोशिखरावर होती. तेव्हा अभयसिंह चौटाला हे महासंघाचे सर्वेसर्वा होते. चौटालांच्या माघारी या खेळाचीही दुर्दशा झाली. आता स्पाइस जेटचे मालक आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे जुने मित्र अजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे पुनर्गठन केले जात आहे. कबड्डीत आंतरराष्ट्रीय लीगच्या लिलावात खेळाडू कोट्यवधी रुपये कमावत आहेत. राजकीय नेते जनार्दनसिंह गहलोत  हे अनेक वर्षांपासून कबड्डीवर नियंत्रण ठेवून आहेत. पत्नी डॉ. मृदुल भदौरिया यांच्या कार्यक्षम हातात कबड्डी महासंघ सोपवून स्वत: आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाचे ते प्रमुख बनले आहेत.  

काही अपवादही आहेत. अॅथलेटिक्स फेडरेशनचे प्रमुख उत्कृष्ट अॅथलीट आहेत. एडिल सुमारीवाला अनेक वर्षे देशातील वेगवान धावपटू होते. लोढा समितीच्या मानकांनुसार ते तंतोतंत योग्य आहेत. भारतीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) नेतृत्व बराच काळ केपीएस गिल यांच्याकडे होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत अधिकाऱ्यांकडून लाच घेताना पकडल्यामुळे त्यांना (सुरेश कलमाडींच्या भारतीय ऑलिंपिक  संघाकडून) निलंबित करण्यात आले. कलमाडींच्या नेतृत्वाखालील ऑलिंपिक महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाने हॉकी इंडियाची स्थापना केली. आतापर्यंत त्यावर नरिंदर बत्रा यांची सत्ता होती. ते एका रुग्णालयाचे मालक आहेत.  २५ वर्षांनंतर सध्या आपण जगातील शीर्ष ५-६ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. ज्युनियर गटातही आपण जगज्जेते बनलो. आता बत्रा हे एफआयएचे अध्यक्ष आहेत. भारतीय हॉकीने कल्पनाही केली नसेल एवढा पैसा येत आहे. क्रिकेटच्या टी २० च्या धर्तीवर ५-५ खेळाडूंचा संघ असलेल्या हॉकीची सुरुवात झाल्यानंतर या खेळात आणखी पैसा येईल. यावरुन असा निष्कर्ष काढता येईल की, एखाद्या क्रीडा प्रकाराच्या यशस्वितेसाठी वय, राजकारण, अार्थिक स्थिती, खेळाची पार्श्वभूमी यापैकी कशाचाही संबंध नाही. त्यामुळे देशातील सर्वोत्कृष्ट असलेल्या क्रिकेट या खेळाचा प्रमुख कोण असेल, हे ठरवण्यास लोढा समितीचीही मानके योग्य आहेत का? ही संघटना क्रिकेटची एकमेव आर्थिक महाशक्ती आहे. बीसीसीआय अपारदर्शी आणि भ्रष्ट संघटना आहे. यातील ‘लाभार्थींमध्ये’ मतभेदही आहेत. अनेकदा यात अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, पण खेळाडूंबाबत कधीही अन्याय नाही झाला. उद्देश चांगला असला तरी तीन माननीय न्यायाधीश या समस्येतून कसा मार्ग काढतील?  

बीसीसीआयने न्यायालयाचा आदेश न मानून मोठी चूक केली. मात्र, मी नम्रपणे सांगू इच्छितो की, लोढा समितीवर सुधारणेची जबाबदारी सोपवणे हे रागात उचललेले पाऊल आहे. न्यायालय किंवा लोढा समितीने बीसीसीआयमधील सुधारणेचे काम स्वत:कडे घ्यायला नको होते.   समितीचा अहवाल सरकारला दिला गेला असता त्यातून उत्तर मिळवले असते. भ्रष्टाचाराची प्रकरणे सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाकडे सुपूर्द केली असती. न्यायाधीशांनी घोर मेहनत घेतली, पण नव्या दमाच्या खेळाचा एक स्वभाव त्यांच्या लक्षात आला नाही. आधुनिक खेळात ग्लॅमर, भडकपणा, पैसा, फटाके, चिअरलीडर्स, सुंदर टीव्ही अँकर्स हे सर्व येतेच. सध्याच्या क्रिकेटचा हा अविभाज्य भाग आहे.  उद्योगाच्या दिशेने खेळाचे व्यावसायिकीकरण झाले तर तो यशस्वी होईल. मग खेळाचा म्होरक्या कुणीही असला तरी चालेल.
 
शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार