आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखर्जी यांच्या चढ-उताराचा काळ (शेखर गुप्ता)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव मुखर्जी खचितच सर्वाधिक सुविद्य अर्थात जाणकार राजकीय व्यक्तिमत्त्व; मात्र पत्रकारांशी बोलताना नेहमी सतर्क राहूनच बोलणाऱ्यांपैकी एक आहेत. आमच्यापैकी ज्या लोकांनी त्यांच्याशी वार्तालाप केला त्यांना हेही माहिती आहे की, मुखर्जी यांनी इंदिरा गांधींची एक प्रकारे पूजा केली आहे, आजही ते त्यांचे प्रशंसक आहेत. इंदिरा गांधी मुखर्जींबद्दल बोलताना म्हणत : एकदा जर त्यांच्या पोटात एखादी गोष्ट शिरली असेल तर ती पुन्हा बाहेर व्यक्त होत नाही. फक्त त्यांच्या पाइपमधूनच धूर निघतो, ही आठवण आजही मुखर्जी मोठ्या आनंदाने सांगतात.
प्रणव मुखर्जी यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच हे इथे उल्लेखनीय वाटते. १९८०-९६ चा काळ म्हणजे चढ-उताराने भरलेली वर्षे असा उल्लेख केला जातो. याचाच विस्तार विद्यमान खंडात आहे. पहिला खंड गेल्या वर्षी प्रकाशित झाला. यात आधीच्या काळातील तपशील होता. दुसऱ्या खंडात चढ-उताराच्या काळातील प्रसंगवर्णन असून तो १९९६ मध्ये पीव्ही नरसिंह राव सरकारच्या शेवटानंतरच संपतो. तथापि, यापेक्षाही मोठा चढ-उतार काँग्रेसने त्यानंतर पाहिला. १३ दिवसांचे एनडीएचे सरकार, संयुक्त आघाडीच्या सरकारातील दोन अल्पावधी पंतप्रधान, सीताराम केसरी यांचा काळ आणि मग सोनिया गांधींचा राजकारणातील उदय. १९८०-९६ चा जो काळ सांगण्यात आला, त्या कालखंडात तर फारसे चढ-उतार झालेच नाहीत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्याची सुरुवात झाली. या कालखंडात काँग्रेसचे राजकारण आणि सत्तेची अंतर्गत समीकरणे नाट्यमयरीत्या बदलली.
राजीवऐवजी संजयशी प्रणव यांचे जवळिकीचे संबंध होते, हे तर उघडच आहे. संजय गांधी यांच्याबद्दल तर मुखर्जी खूप उत्साहाने सांगतात; पण राजीवबाबतचे संदर्भ असतील तर त्यांनी खूप सतर्कता बाळगली व त्यात ठोस अशी माहिती दिसून येत नाही. राजीव गांधी यांनी जे बिगर राजकारणी मित्र त्यांच्यासोबत आणले होते, त्यांच्याबद्दल राजीव यांना साशंकता होती. त्या संशयावर बोट ठेवण्यास प्रणव यांनी वाव ठेवलेला नाही. विशेषत: अरुण नेहरू अाणि विजय धर यांनी जुनीच व्यवस्था रेटण्याचे काम सुरू ठेवले होते. प्रणव यांनी म्हटले की, जणू वॉल स्ट्रीटमधून बाहेर काढले जावे तितक्या कठोरपणे आर. के. धवन यांना बाहेर हाकलले होते. धवन यांना त्यांची कागदपत्रे सावरण्याचीही संधी दिली नाही. तुमची कागदपत्रे पॅक करून घरी पाठवण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. या कालखंडासंदर्भात प्रणव मुखर्जी यांचा रोख असा की, त्यांनाही राजीवच्या काळात अशाच पद्धतीने बाजूला सारले गेले होते, असाच आहे. त्यांनी स्वत:साठी "आऊटकास्ट'(बहिष्कृत) असा शब्द वापरला आहे. तेव्हा कमलापती त्रिपाठी आणि नरसिंह राव यांना सोडून काँग्रेसमधील अन्य कोणीही त्यांच्या संपर्कात नव्हते की साधी ओळखही दाखवत नव्हते.
राजकीय सैबेरियाच्या वर्षांचे ज्या इमानदारीने ते वर्णन करतात ते खूपच प्रभावी वाटतात. मग त्यात खूप काही सांगण्यासारखे किस्से नसतीलही. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना कॅबिनेटमधून, मग कार्यसमितीतून आणि पक्षाच्या संसदीय बोर्डातूनही निष्कासित केले होते. त्यानंतरही ते संसदेच्या केंद्रीय हॉलमध्ये एकटे फिरत असत. त्यांची सोबतही लोक टाळत होते. काँग्रेसची संस्कृती पाहता ही गोष्ट समजू शकतो. सार्वजनिकरीत्या जाहीरपणे त्यांचा अवमान होताना अनेकांनी पाहिले आहे. १९८५ मध्ये मुंबई काँग्रेसच्या अधिवेशनात "सत्तेच्या दलालां'मध्ये खळबळ उडवून देणाऱ्या भाषणानंतर (ज्या भाषणाला त्यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीने खूप काही दुरुस्त्या करून मंजुरी दिली होती) त्यांना कार्यसमितीतून बडतर्फ करण्यात आले.
प्रणव नेहमी म्हणतात की, इंदिराजींच्या हत्येनंतर त्यांच्या मनात हंगामी पंतप्रधान होण्याचा विचारही कधी आला नाही. तथापि, कान भरणाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या मनात संशयाची बीजे पेरण्यासाठी तसे सांगितले असावे. राजीव गांधी यांना शपथ दिली जावी, असे सुचवणारी पहिली व्यक्ती मीच होतो, असे ते ठामपणे सांगतात. तथापि, घटनात्मक बाब लक्षात घेता, त्यांनी दोन अटी ठेवल्या होत्या, प्रथम काँग्रेस संसदीय बोर्डाने राजीव गांधी यांची नेतेपदी निवड करावी. दुसरी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग संध्याकाळी दिल्लीत परतणार आहेत तोपर्यंत त्यांची वाट पाहिली जावी. इंदिराजींचे पार्थिव ज्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ठेवण्यात आले होते, तेथील कॉरिडॉरमध्ये चाललेल्या घटनेचा तपशील सांगताना ते म्हणतात, "परंतु राजीव गांधी यांच्या जवळच्या दरबाऱ्यांना खूप घाई झाली होती. पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव पी. सी. अलेक्झांडर आणि राजीव गांधी यांचे सहकारी अरुण नेहरू झैलसिंग यांची वाट न पाहता तत्काळ शपथविधी व्हावा, या मताचे होते. कारण (ब्ल्यूस्टार ऑपरेशननंतर) गांधी कुटुंबीयांच्या आणि झैलसिंग यांच्या नात्यात आलेला तणाव पाहता झैलसिंग यांच्यावर विश्वास ठेवण्यास ते तयार नव्हते. जर झैलसिंग यांनी राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती देण्यास नकार दिला तर कसे होईल? त्यामुळे उपराष्ट्रपतींनी तत्काळ राजीव गांधी यांना शपथ द्यावी. प्रणव यांना मात्र विश्वास होता की, झैलसिंग तसे काही करणार नाहीत. यासाठी त्यांनी विचारले की, जर यामुळे नाराज होऊन त्यांनी उपराष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती मान्य करण्यास नकार दिला तर काय? कारण देशांतर्गत दौऱ्यावर असल्याने त्यांनी उपराष्ट्रपतींना तसे अधिकार दिलेले नव्हते. प्रणव यांच्या युक्तिवादानंतर तो दिवस टळला. केवळ काँग्रेस संसदीय बोर्डाने राजीव गांधी यांची नेतेपदी निवड केली. तीसुद्धा काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यापूर्वीच करण्यात आली. त्यामुळेच या गोष्टीचा वापर करून दरबाऱ्यांनी त्याचा नंतर वचपा काढला. ज्याला ते रूढिवाद म्हणतात : "हे पाहा, प्रणव मुखर्जी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे झैलसिंग येईपर्यंत तुमचे पदग्रहण रोखण्याचा प्रयत्न केला.' (ही प्रणव मुखर्जी यांची माहिती नसून माझ्या कल्पनेतील शब्द आहेत.) प्रणव यांनी खरोखरच धाडसाने एक नोकरशहा (अलेक्झांडर) यांचा अधिकार अाणि बाहेरील व्यक्ती (अरुण नेहरू) यांच्याद्वारे नव्या पंतप्रधानांची निवड आणि त्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु प्रणव थेट यावर टीका करत नाहीत. फक्त इतकेच म्हणतात की, विद्वान आणि विश्लेषकांनी भविष्यात यावर विचार करावा. प्रणव मुखर्जी टीकेपासून आपला बचाव करू इच्छितात, असे म्हणणे सोपे अाहे, ते तर आपल्या खास शैलीतच सांगत आहेत.
बातम्या आणखी आहेत...