आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झापडे बंद असतील तर विज्ञानाचे काय? (शेखर गुप्ता)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी सेंटरमध्ये एक छोटीशी प्रयोगशाळा असून येथे २२ ते ६५ वर्षे वयाचे २४ संशोधक अानुवंशिकरीत्या सुधारित वाणावर संशोधन करत असतात. संशोधकांचे प्रमुख प्रा. दीपक पेंटल यांनी सांगितले, “जेनेटिकली माॅडिफाइड’मुळे गैरसमज होतो. ते जेनेटिकली इंजिनिअर्ड शब्दाला प्राधान्य देतात. प्रा. पेंटल आणि त्यांच्या कोअर टीममध्ये सहभागी जेनेटिक रिसर्चमधील पाच अन्य दिग्गज संशोधकांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग मंजुरी समिती (जीइएसीने)त्यांच्या ३२ वर्षांच्या परिश्रमाला मान्यता देऊन मोहरीच्या जीएम वाणाला सुरक्षित ठरवले आहे.
त्यांनी ५ हजार पानांच्या अहवालाकडे निर्देश देऊन सांगितले, यात सुरक्षित डेटा असून त्यांच्या टीमने जीइएसीकडे सोपवला होता. यावर तीव्र टीका तर झालीच, त्यांच्यावर बौद्धिक चोरीचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्या संशोधनात अडथळे निर्माण करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला. हे जीएम वाण वाईट, लालची बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केल्याचा आरोप करण्यात आला. पेटेंट, तंत्रज्ञान व जीन स्टॉकवर मालकी हक्क व त्याचा एकदा वापर केल्यानंतर नष्ट होणाऱ्या बियाणांपासून ते पुरवठा करणे व त्यांच्या किमतीवर एकाधिकार मिळवून शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, असाही कांगावा करण्यात आला. वस्तुस्थिती अशी की : मोहरी संपूर्णत: सरकारी प्रयोगशाळेत तयार झाली. त्यासाठी सरकारी एजन्सीजकडून पैसे मिळाले.
डॉ. वर्गिस कुरियन यांच्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने राजीव गांधी राष्ट्रीय तेलबिया प्रकल्पात स्वारस्य दाखवले, हे उल्लेखनीय. भारतात नेहमी खाद्यतेलाची कमतरता जाणवते. त्यासाठी परदेशातून खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. भारतात खाद्यतेलाच्या उत्पादनात माेहरीचा तिसरा हिस्सा आहे. इतर फायद्यांबरोबरच अाता मोहरीचे उत्पादन २५ ते ३० टक्के इतके वाढेल. कारण वर्गिस यांनी १९८७ मध्येच तरुण शास्त्रज्ञ दीपक पेंटल यांच्या लॅबला निधी देण्याचा निर्णय घेतला होता. हे पेंटल यांचे स्वप्न होते.
वनस्पती तज्ज्ञ पेंटल यांनी परागणीकरणामध्ये पीएचडी केली आणि पोलंडमध्ये संशोधनाच्या दरम्यान मोहरीच्या प्रेमात पडले. त्यांनी संकरित वाण तयार करण्याची साधारण पद्धत (परागीकरण)शोधून काढली. त्यापासून पोलिश आणि भारतीय जातीच्या संकरित वाणावर संशोधन केले. ही अशक्यप्राय गोष्ट होती. वनस्पती तज्ज्ञ मोहरीच्या फुलांना हर्मोफ्रॉडाइट असे म्हणतात. म्हणजे उभयलिंगी ज्यात पुयुग्म आणि स्त्रीयुग्म दोन्ही असतात. त्यांच्यापर्यंत बाहेरील पुयुग्म आणण्याआधीच स्वपरागीकरण होते. त्यांनी विचार केला जर नर घटकाला पूर्णत: निष्क्रिय केले तर काही शक्य होईल. मग एका जातीला स्त्रिलिंगी बनवून दुसऱ्या जातीशी याचे परागीकरण करता येते. पेंटल आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले. त्यांनी मोहरीच्या देशी जातीमध्ये तीन नवे जीन्स प्रवेश करण्याचे कार्य हाती घेतले. सुरुवातीचे दोन जीन्स मातीत आढळून
येणाऱ्या जीवाणूपासून घेण्यात आले, तर तिसरे जीन्स स्ट्रेप्टोमायसिस प्रजातीचे आहे. हे निर्धोक होते.
प्रा. पेंटल दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू झाले, परंतु त्यांनी प्रयोगशाळा सोडली नाही. त्यानंतर पूर्णवेळ संशोधक म्हणून पुन्हा सुरुवात केली. देशाची वैज्ञानिक अधोगती, बुद्धिवंतांचे परदेशी वास्तव्यास जाणे, इतर देशांतील उत्पादनावर विसंबून राहणे आदी बाबींवर आपले सतत रडगाणे सुरू असते. पेंटल यांच्या मते, एकदा मुख्य पद मिळाले की आपले शास्त्रज्ञ संशोधन सोडून ‘सायन्स ब्युरोक्रॅट’ होतात. पेंटल यांना यूपीएससीचे सदस्य होण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. हे शास्त्रज्ञ आपल्या मोहरीचा वापर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी करणार काय? तर पेंटल यांनी ठामपणे स्वीकृती दिली. जगभरात अब्जावधी जातीच्या जीएम वाणाचा आहारात समावेश आहे. कॅनडात १९९६ मध्ये तयार मोहरी कनोला सर्वप्रथम मान्यता देण्यात आली. हे जीएम वाणच आहे.
भारतात दरवर्षी तीन लाख टन कनोला आयात केला जातो. आमच्या खाद्यतेल आणि वनस्पतीमध्ये सोयाबीन तेलाचा मोठा वाटा आहे. सुमारे ३० लाख टन तेल आयात केले जाते. आपले बहुतांश कापूस बियाणे जीएम/बीटी आहे. आपण आजही रामदेवबाबांचा केवळ शुद्ध देशी तूप खाण्याचा सल्ला मानून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या देशी गाईला बिनोला पशू आहार खाण्यास दिला जातो. भारतात बीटी नसलेला बिनोला शोधणे खूप अवघड आहे.
अंडी आणि चिकनबाबत बोलायचे झाल्यास पोल्ट्री आहारात जीएम मक्याचे वाण आहे. आपण स्वायत्त देश असल्याचे सांगतो. आपली चर्चा शास्त्रविरोधी आहे आणि पुराव्याने आपण गोंधळून जात नाही, पण चीनला याची पर्वा नाही. त्यांनी ४३ अब्ज डॉलर खर्चून जगातील तिसरी मोठी क्रॉप सायन्स /जीएम संशोधनाची बहुराष्ट्रीय कंपनी सिंजेंटा विकत घेतली आहे. प्रा. पेंटल यांनी म्हटले, चीनला त्यांची माेहरी विकत घ्यायची आहे. ती फक्त ५० कोटी रुपये खर्चून विकसित केली आहे. चिन्यांनी त्यांच्या कागदपत्रांचे श्रेय पेंटल आणि त्यांच्या टीमला दिले आहे. कारण त्यांच्यात दुष्काळाचा सामना करण्याची तयारी आहे. ते मोहरीचे तेल खातात. मॉलिश करण्यासाठी नव्हे. सर्व चिनी भाज्या ज्या त्यांच्या खाण्यासाठी लागतात त्यात मोहरीचे तेल लागतेच. मला वाटते यानंतर यावर काही विचार मंथन तर आपण केलेच पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...