आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘श्रीं’ ची भाईगिरी आणि क्रिकेटचा गेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोनची बेल वाजते. श्री धावतपळत दिवाणखान्यात येतात. कपाळावरचा घाम पुसतात. रिसीव्हर उचलतात. ‘हॅलो’ पलीकडून आवाज येतो.
‘कोण?’ ‘पैचाना नहीं क्या ?’ ‘नहीं... कोण?’
‘पैचाना नहीं ? माझे नाव घेत राहता आणि आवाज ओळखत नाही ? भाई ! मी भाई बोलतोय.’
‘भाई ! माफ करा भाई. टेन्शन.. . माफी भाई.’ ‘आता ओळखले. गनीमत है.’ ‘सलाम वालेकुम भाई.’ ‘हूं ! अस्सलाम वालेकुम.’ ‘तुम्ही का त्रास घेतला भाई?’
‘तुम्ही त्रास दिला म्हणून!’‘काहीतरीच काय ? आमची औकात आहे का तुम्हाला तकलीफ द्यायची भाई ?’
‘अच्छा ? मग माझे नाव का घेतले बेटिंग आणि फिक्सिंगमध्ये?’
‘खोटे कसे बोलणार भाई का?’ ‘रहम भाई रहम ! पण हे सगळे तुमच्याकडूनच शिकलो ना भाई’ ‘काय शिकले माझ्याकडून ? खरे बोलणे की बेटिंग करणे?’
‘दोन्ही भाई पहले बेटिंग करायचे आणि अडकू लागलो की खरे बोलून तुमचे नाव सांगायचे. तुमचेच चेले ना आम्ही भाई ’ ‘पण हे काय करून बसलात रे तुम्ही ? चुका तुम्हीच करायचा, पकडले गेले की चौकशी तुम्हीच करणार, फैसला तुम्हीच देणार, क्लीन चिटही तुम्हीच देणार आणि मलाही तुम्हीच अडकवणार? हद्द झाली.’ ‘तुमचीच स्टाइल आहे ना भाई ही’ ‘म्हणजे?’
‘तुम्ही नाही का समांतर सरकार चालवता. हुकूमत तुमची, अदालत तुमची, फैसला तुमचा, सजा तुम्हीच देता. हो ना भाई.’ ‘हो, पण तेच शिकलो भाई आम्ही.’ ‘अरे वा ! म्हणजे तुम्ही पण समांतर सरकार चालवता?’ ‘तर ! आमच्यावर कुणाचेही बंधन नाही भाई! आम्ही कुणाला जुमानत नाही. आम्ही कायदा मानत नाही, आमचे कायदे वेगळे आणि ते आम्हीच बनवतो भाई.’ ‘क्या बात करते हो ? अरे, देशाचे कायदे, आरटीआय, सा-या देशाला, सरकारला नेत्यांना सर्वांना लागू होतात.’ ‘हो, पण आम्ही स्वायत्त आहोत. आमचा कोणीही बाप नाही. काय? मग मी कोण आहे!’ ‘छे छे, तुमच्याबद्दल नाही बोललो’ ‘भाई. तुम्हीच तर आमचे माय-बाप सर्व काही आहात. म्हणूनच आमचे नाव अडकले की आम्ही तुमचे नाव लावतो... बापाचे नाव लावण्याची पद्धत आहे ना भाई ?’ ‘व्वा ! खुश कर दिया. पण सांभाळून. नाही तर माझ्यासारखे पलायन करावे लागेल’ ‘छ्या ! तसे होणार नाही भाई. मी जे केले ते सा-यांना सोबत घेऊन केले. जावई, नातलग, मित्र, खेळाडू म्हणजे मिल बाट के खाने का भाई’ ‘म्हणजे ? मी तसे केले नाही असे म्हणायचे आहे का तुला?’
‘माफी भाई. तसे नव्हते म्हणायचे मला’ ‘मग? आणि काय रे, काहीही झाले की माझे नाव पुढे करता, बॉम्बस्फोट... अतिरेकी हल्ला... गँगवॉर... बॉलीवूडमध्ये कुणाला खंडणीचा फोन येऊ दे...नाही तर सट्टेबाजी होऊ दे. हे काय?‘भाई, ही सवलत ९3 पर्यंत नव्हती ना ?तुम्ही 93 स्फोटानंतर पलायन केले अन् ही सवलत आम्ही वेळोवेळी वापरली.’ ‘होता ना भाई , पूर्वी ओसामाचे नावही घ्यायचे. काही ही झाले की, अल कायदा... तालिबान...ओसामा मारला गेला. आता तुम्ही एकटेच राहिलात भाई ‘व्हाट ? माझ्यानंतर म्हणजे ? मला कोण संपवणार?’ ‘माफी भाई... तसे नव्हते म्हणायचे. मरे तुम्हारे दुश्मन आणि तसे ही तुम्ही आहात तो पर्यंत सारे घोटाळेबाज सेफ आहेत. तुम्ही तर फश्कढ रआहात आमच्यासाठी’ ‘ठीक, ठीक. पण काळजी घ्या रे. अशाने खेळ संपायचा. क्रिकेटची काळजी घ्या बुवा.’ ‘म्हणजे काय भाई ?’‘गुड! आणि अशात माझ्यावर कोणता चित्रपट बनवला रे बॉलीवूडवाल्यांनी, ज्यात माझे पात्र चिंटूने केले आहे? ‘बॉस ‘डी डे.’ ‘आता तुझी भूमिका वठवण्याची वेळ आली आहे. यशस्वी झालास तर यावरही चित्रपट बनवू. नाव काय ठेवू माहीत आहे?’ ‘क्या भाई?’
डी-डे प्रमाणे ‘श्री - डे!’ ओके ?