आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या विलीनीकरणातून आशादायी चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अग्रेसर बँकांमध्ये चीनच्या चार बँकांचा समावेश आहे. मात्र पहिल्या २५ बँकांमध्ये एकही भारतीय बँक नाही. यामुळे भारताच्या बँकिंग क्षेत्रात मोठी सुधारणा करावी लागेल हे स्पष्टच आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय)मध्ये पाच सहयोगी बँकांचे बहुप्रतीक्षित विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र चांगलीच प्रगती करू शकते.  
 

आता स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँका एसबीआयमध्ये विलीन होतील.
 भारतीय बँकिंग प्रणालीत आजवरचे हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. हे एक मोठे पाऊल अाहे. फायदे-तोटे काहीही असले तरी या अनुषंगाने बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर येतात.  सध्या बँकांसमोरील सर्वात मोठी समस्या एनपीए आहे. विलीनीकरणानंतर यात सहभागी झालेल्या बँकांचीही मदत मिळेल. कारण यातील काही खाती सारखीच असतील.
 
 नंतरचा मुद्दा बँकिंग प्रणालीतील तंत्रज्ञान वापरण्याचा. तंत्रज्ञान वापरात एसबीआय अन्य पाचही बँकांपेक्षा सरस आहे.  विलीनीकरण यशस्वी करण्यासाठी हा फरक लवकरात लवकर भरून काढावा लागेल. तंत्रज्ञानाच्या बाबतीत या मोठ्या बँकेला समान पातळीवर काम करावे लागेल. यापैकी काही बँकांच्या शाखा जवळजवळ असू शकतात, मात्र विलीनीकरणानंतर काही दिवसांनी त्यापैकी एक चालू राहील.
 
 अशा वेळी शाखांचेही विलीनीकरण होईल. सकारात्मक बाब अशी की, या विलीनीकरणाच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. कारण देशाला महाशक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे भक्कम पाऊल आहे. कारण बँकिंग प्रणाली हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया असतो. खबरदारी घेण्याची बाब अशी की, बँकांचे परिचलन करण्यासाठीची रक्कम नफ्यापेक्षा जास्त नसावी. अर्थात, विलीनीकरणामुळे बँकेचे महत्त्व वाढेल आणि यामुळे पूर्वीपेक्षा अधिकच लाभ होईल.
 
बातम्या आणखी आहेत...