आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिवासींविना सिलिकॉन व्हॅलीला अस्तित्वच नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दशकांनंतर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या एखाद्या निर्णयाला सिलिकॉन व्हॅलीने एवढा तीव्र विरोध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सर्वच अनिवासींना एकाच पारड्यात तोलत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी चुकीचे निर्णय घेतले जातील, असा अंदाज सिलिकॉन व्हॅलीतील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सिलिकॉन व्हॅलीतून अनिवासींना हटवले तर तिची मूळ ओळखच नाहीशी होईल. यासोबतच अमेरिकेतील आयटी उद्योग पूर्णपणे ढासळेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केल्याच्या निर्णयाला इंटेल आणि अॅपलसारख्या काही निवडक कंपन्यांनी जाहीर विरोध केला नाही. मात्र सिलिकॉन व्हॅलीतील १३० कंपन्यांनी या निर्णयाला कायदेशीर विरोध केला आहे. येथील तंत्रज्ञान कंपन्या जगभराशी जुळलेल्या आहेत. येथे काम करणारे लाखो लोक  विविध देशांचे नागरिक आहेत. आता या नोकरदारांना भविष्याची चिंता सतावत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या आश्वासनानुसार सर्वच अनिवासींवर कारवाई केली गेली तर केवळ सिलिकॉन व्हॅलीच नाही तर संपूर्ण अमेरिकेचे व्यावसायिक संतुलन बिघडेल.  

सिलिकॉन व्हॅलीतील ज्या कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे  ‘मौनातून’ समर्थन केले आहे, त्यामागील कारण म्हणजे ट्रम्प यांनी कॉर्पोरेट टॅक्स आणि रेग्युलेशन्समध्ये कपात करण्याची केलेली घोषणा. व्यवसाय चालवण्यासाठी सरकारशी चांगले संबंध ठेवावे लागतात. ही बाब अमेरिकेलाही लागू पडते. यामुळेच बहुधा इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन कझानिक यांना एरिझोना येथील नव्या फॅक्टरीची घोषणा करण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये जावे लागले.   ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर कझानिक म्हणाले की, ते फॅक्टरीसाठी ४७५ अब्ज रुपये खर्च करतील. यामुळे ३ हजार रोजगार निर्मिती होईल. कझानिक यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी निधी देण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा नकार दिला होता. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कझानिक ट्विटमध्ये म्हणाले की, एक अनिवासी तसेच एका कंपनीचा सहसंस्थापक या नात्याने मी कायदेशीर मान्यताप्राप्त अनिवासींच्या धोरणाला पाठिंबा देऊ इच्छितो. इंटेलच्या सुरुवातीच्या काळातील तृतीय कर्मचारी तसेच दीर्घकाळ एक्झिक्युटिव्ह असलेले अँड्रयू एस ग्रुव्ह १९५६ मध्ये सोव्हिएत आक्रमणानंतर हंगेरीहून अमेरिकेत आले होते. त्यानंतर अमेरिकेतच स्थायिक झाले. 
 
ट्रम्प यांच्या धोरणांचा बारकाईने अभ्यास केल्यास केवळ सिलिकॉन व्हॅलीत काम करणाऱ्यांनाच त्यांनी टार्गेट केले आहे, असे नाही. ट्रम्प यांनी अफोर्डेबल केअर अॅक्ट (ओबामा केअरचे नवे नाव) दिग्गज कंपन्यांसाठी बंधनकारक केला नाही तर अनेक जण खुश होतील. यापैकी बहुतांश जण मेक्सिको सीमेवरील प्रस्तावित भिंतीसाठी सहमत नाहीत. तंत्रज्ञान कंपन्यांत काम करणारे सर्वच जण ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अनपेक्षित लाभ पदरी पाडून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, मुलांच्या देखभालीसाठी करात सवलत, घरी जाण्यासाठी मोफत सुविधा घेऊ शकतात. तसेच करात मिळणाऱ्या सलवतीत सुट्यांमध्ये एक किंवा दोन टूर पॅकेज सहज मिळू शकतात. या सर्व गोष्टी विविध अंगांनी समजून घेता येतील. पहिले- मागील दोन आठवड्यांपासून सिलिकॉन व्हॅली आणि सिएटल येथे ट्रम्प यांच्याविरोधात जी निदर्शने होत आहेत, त्याचा उद्देश कमी कालावधीत आर्थिक लाभ मिळवणे हा आहे.  सिलिकॉन व्हॅलीतील लोकांचा विरोध समजून घेण्यासाठी अमेरिकेतील ‘ओपन इमिग्रेशन पॉलिसी’ चे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.  सिलिकॉन व्हॅली आणि अमेरिकेतील संपूर्ण तंत्रज्ञान उद्योग जगात अव्वल स्थानी असण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका ओपन इमिग्रेशन पॉलिसीचीच आहे. ही पॉलिसी बंद झाली तर अमेरिकेतील आयटी उद्योगासह इतरही व्यवसायावर गंभीर परिणाम होतील.  

सिलिकॉन व्हॅलीतील कर्मचारी आणि तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आणि त्यांच्या संभाव्य निर्णयांमुळे उद्योग क्षेत्रात मोठे वादळ निर्माण होईल. असे घडले तर जगाला सर्वोत्कृष्ट संशोधक, शास्त्रज्ञ देणारा दीपस्तंभ अशी अमेरिकेची ओळख नाहीशी होईल. सॅन फ्रान्सिस्को येथील पेमेंट स्टार्टअप स्ट्रिपचे सहसंस्थापक जॉन कॉलिसन म्हणतात, जगातील कुठेही दडलेल्या अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा, हे अमेरिकेला पक्के ठाऊक आहे. जागतिक स्तरावरील आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांची तुलना केल्यास कुणालाही हा फरक समजू शकतो. अमेरिकेतील हा उद्योग असामान्य आहे.  सिलिकॉन व्हॅलीने मागील काही दशकांमध्ये एवढे यशस्वी प्रयोग केले आहेत की, जगभरातील बौद्धिक संपदा येथे येण्यासाठी उत्सुक आहे. ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या धोरणात बदल केला नाही तर अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योग पूर्णपणे ढासळू शकतो.
 
इथे फक्त प्रतिभावंतांचे स्वागत, सीमांचे बंधन नाही
सॅन फ्रान्सिस्को येथील पेमेंट स्टार्टअप स्ट्रिपचे सहसंस्थापक जॉन कॉलिसन हे सहा वर्षांपूर्वी आयर्लंडहून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. ते म्हणतात, सिलिकॉन व्हॅली ही एखादी घटना किंवा पूर्वनियोजित असा भाग नाही. सिलिकॉन व्हॅलीची अस्मिता, गौरव आणि यशामागील मुख्य कारण म्हणजे येथे अनेक सीमा ओलांडून येणाऱ्या दूरदूरवरील देशांतील नागरिकांचे स्वागतच होते. सिलिकॉन व्हॅली कोणत्याही सीमांचे बंधन पाळत नाही. सिलिकॉन व्हॅलीची प्रतिकृती लंडन, पॅरिस, सिंगापूर किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांत उभारली जाऊ शकते का, हा प्रश्न मी अनेकांना विचारला.  या सर्व ठिकाणी सिलिकॉन व्हॅलीसारखे टेक हब होऊ शकतात. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे आज जगातील प्रत्येक आयटी तंत्रज्ञान अवगत असलेल्या व्यक्तीला सिलिकॉन व्हॅलीची ओढ लागलेली असते.
 
दिग्गज कंपन्यांच्या उच्च पदांवर अनिवासीच
उदार धोरण, विविधता आणि सामाजिक सहभाग यासाठी सिलिकॉन व्हॅली प्रसिद्ध आहे. नव्या धोरणामुळे अनिवासींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. महिला आणि आशियाबाहेरील कर्मचारीही या उद्योगात कार्यरत आहेत. एवढेच नाही तर येथील उद्योगाचे एक्झिक्युटिव्ह आणि व्हेंचर कॅपिटॅलिस्टपैकी मोठा वर्ग अनिवासी आहे. येथील अनेक कंपन्यांचे मालक आपल्याकडे येणाऱ्या प्रतिभेची पारख रंगावरून करत नाहीत. अमेरिकेतील आयटी उद्योगाचा इतिहास लिहायला गेल्यास यासाठी अनिवासींचे किती मोठे योगदान आहे, हे दिसून येईल. 
{ अनेक लोकप्रिय कंपन्यांचे संस्थापक अनिवासी आहेत. उदाहरणार्थ, गुगल. संस्थापक सर्गी ब्रिन रशियाहून आले होते. गूगलचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे अनिवासी भारतीय आहेत. 
{ मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला हेदेखील भारतीयच आहेत. ईबे आणि याहूची सुरुवातदेखील अनिवासींनीच केली होती. फेसबुकची सर्वात मोठा सहायक कंपनी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची स्थापनाही अनिवासींनीच केली होती तर अॅपलच्या स्थापनेत अनिवासी नागरिकाच्या वंशजांची भूमिका आहे.
 
मंदीतून बाहेर काढले, लाखोंची रोजगारनिर्मितीही 
नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या थिंक टँकने मागील वर्षी केलेल्या संशोधनानुसार, अमरेकेत ८७ खासगी कंपन्यांची किंमत ६८ अब्ज रुपयांहून अधिक आहे. यापैकी निम्म्याहून अधिक कंपन्यांचे संस्थापक अनिवासी होते. या कंपन्यांमध्ये ७१ टक्के अनिवासी एक्झिक्युटिव्ह पदावर नियुक्त होते.  
{ या कंपन्यांमध्ये उबर, टेस्ला, प्लेंटिरसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांन हजारो रोजगार निर्माण केले. मागील दशकात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावली. अब्ज, खर्व डॉलर कमाई करून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या कंपन्यांचे संस्थापक विविध देशांतील नागरिक आहेत. भारत, ब्रिटन, कॅनडा, इस्रायल आणि चीनसारख्या देशांत या संस्थापकांची मुळं आहेत.  
{ २०११ मध्ये  ‘पार्टनरशिप फॉर अ न्यू अमेरिकन इकॉनॉमी’ या समूहाच्या सर्वेक्षणानुसार, फॉर्च्यून-५०० च्या यादीतील ४० टक्के कंपन्यांची स्थापना अनिवासी किंवा त्यांच्या वंशजांनी केली आहे. या संस्थेच्या मते, फॉर्च्यून-५०० च्या नव्या यादीतही अनिवासींनी स्थापन केलेल्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...