आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त स्मार्टफोनचे बाजारयुद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये येत्या मे महिन्यात विको हा स्वस्त स्मार्टफोन विक्रीस येत आहे. हे सांगण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विकसित देशातसुद्धा आता स्वस्त दरातील मोबाइल फोनची बाजारपेठ निर्माण होत असून विकसनशील आणि गरीब देशातील मोबाइल फोन कंपन्या भविष्यात विकसित देशांमध्येही घुसखोरी करू शकतात, असे म्हणावयास हरकत नाही.
गेल्या काही वर्षांत स्मार्ट फोनची बाजारपेठ विस्तारण्याचे प्रमुख कारण म्हणजे या फोनच्या उतरलेल्या किमती. काही वर्षांपूर्वी अ‍ॅपल, नोकिया, मोटारोला, एचटीसी, इरिक्सन आणि सॅमसंग या बड्या कंपन्यांचा जगभरातील मोबाइल फोन बाजारपेठेवर वरचष्मा होता. पण ही परिस्थिती स्मार्टफोनच्या आगमनानंतर व स्मार्टफोनमधील स्वस्त प्रोसेसरमुळे एकाएकी बदलली. अमेरिकेची क्वॉलकॉम, तैवानची मीडियाटेक व चीनची स्प्रेडट्रम या मोबाइल प्रोसेसर उत्पादन करणार्‍या कंपन्यांमध्ये किंमतयुद्ध सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या किमती उतरण्यात झाल्या. स्मार्टफोनचा स्क्रीन चार इंच व त्यापेक्षा मोठा झाल्यामुळे ग्राहकवर्गात कमालीची वाढ झाली. 12 ते 75 अशा वयोगटाला डोळ्यापुढे ठेवून विविध स्मार्टफोन बाजारात विक्रीस आले. बहुतांश फोन गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असल्यामुळे ग्राहकांची सोय झाली त्याचबरोबर फोनच्या ब्रँडविषयी फारसे कुतूहलही राहिले नाही. विविध अ‍ॅप्लिकेशनच्या भडिमारामुळे स्मार्टफोनची उपयुक्तता वाढली, त्याचे वापरणे सोपे व जलद झाले. अ‍ॅपल, सॅमसंग यासारख्या कंपन्यांनी ब्रँड म्हणून आपल्या फोनच्या किमती चढ्या ठेवल्या होत्या. त्यामुळे सामान्य ग्राहक त्यापासून वंचित झाला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
चीनमध्ये हुवेई, ऑप्पो, व्हिवो, द. कोरियाची ग्रँटेड, भारतामध्ये मायक्रोमॅक्स, कार्बन, बांगलादेशमध्ये सिंफनी, फ्रान्समध्ये विको या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांतील आपापल्या देशात वेगाने
स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज केली आहे. भारतात ‘स्वदेशी’ कंपन्यांना सध्या दिसत असलेले सोन्याचे दिवस हा किंमतयुद्धाचा परिणाम आहे.