आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संपादकीय : तरुणाईला समजून घेण्यात सरकारने केली ऐतिहासिक चूक; देशाने मात्र रोखले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदमासे दहा दिवसांपासून अवघा देश क्षुब्ध होता. घराघरात चर्चा सुरू होती. कडवट बोल. प्रत्येक जण विचारत होता : अखेर सरकारला झाले आहे तरी काय? आमच्या 16 वर्षे वयाच्या मुलांना सेक्ससाठी चिथावणी देण्याचा सरकारचा इरादा का आहे. संबंधांचे वय घटवण्याच्या विरोधात भास्कर समूहाने सर्वप्रथम आंदोलन छेडले. जनआंदोलन. जबाबदारी निभावण्याच्या उद्देशाने. आपल्या कोट्यवधी वाचकांशी, समाजाशी, देशाशी बांधिलकी जपणाच्या शुद्ध हेतूने.

महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्यात केंद्र सरकारकडून होणार्‍या चुकीपुरताच हा प्रश्न र्मयादित नव्हता. विवाहाचे वय 18 वर्षे असतानाही संबंधांचे वय 16 वर्षे करून सरकार 'लग्नाआधी सेक्स'ला मान्यता देण्याची चूक का करत आहे, हादेखील प्रश्न नव्हता. या सगळय़ांपेक्षाही तो मोठा होता. भारतीय समाजाची 'फॅमिली व्हॅल्यू सिस्टिम' ढासळवण्याच्या प्रयत्नाचा प्रश्न होता. ज्यांच्यावर फक्त आमचा आणि आमचाच अधिकार आहे अशा आमच्या मुलांशी निगडित हा प्रश्न होता. परंतु, बंद खोलीत बसून काही मंत्री निर्णय घेत होते. घेतलाही गेला होता. त्याचा धिक्कार व्हायला हवा होता आणि तसा धिक्कार झालादेखील.

परंतु भास्कर समूहाच्या माध्यमातून राष्ट्रीय विरोध उभा ठाकला तेव्हादेखील केंद्रीय मंत्रिमंडळ डोळेझाक करत मनमानीपणे हा निर्णय घेऊन टाकला. तेव्हा अवघ्या देशाची अवस्था कोंडीत पकडल्यासारखी झाली. प्रश्न एकच होता की, एवढे काय आहे या समाजविरोधी प्रस्तावात? फायदा काय? अख्खा देश संताप व्यक्त करत असल्याचेही या चाणाक्ष राजकीय पुढार्‍यांच्या लक्षात का येत नाही? नेते आणि सरकारे सगळी कामे फायद्यासाठीच करतात. मग याबाबतीत ते आपला कसा काय विसरले? असे काय आहे यात?

हाच तो प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. खरोखरच देशाने योग्य तेच म्हटले आहे- नेते आणि सरकारे सगळी कामे राजकीय लाभासाठीच करतात. याठिकाणीही त्यांनी भलामोठा फायदाच बघितला. त्यांना वाटले की, देशात 65 कोटी तरुण आहेत आणि ते नेहमीच मुक्त होत आहेत. पुढे जात आहेत. मीडिया, टीव्ही, इंटरनेट, मोबाइलने त्यांना जग दाखवले आहे. अगदी कमी वयात. नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग. कैक प्रकारच्या महत्त्वाकांक्षा. वाढत्या, मनमोकळय़ा इच्छा-आकांक्षा. बस, एवढीच चूक झाली मंत्र्यांकडून. चूक नव्हे, तर ऐतिहासिक चूक. आमची मुले, तरुण यांना समजून घेण्यात. त्यांना ओळखण्यात. मंत्र्यांना वाटले, विरोध तर प्रौढ करत आहेत. तरुण तर मोकळय़ा मनाने स्वीकारतील. हेच सरकार आपल्यासह आपल्या गरजा समजून घेऊ शकते, असा विश्वास नवतरुणांना वाटेल. व्यावहारिक पातळीवर. बदलत्या समाजाला समजून घेत आहे. आधुनिक आहे. अल्ट्रा मॉडर्न तरुणांना अल्ट्रा मॉडर्न नेतृत्वच हवे आहे. म्हणजेच कच्च्याबच्च्या कोट्यवधी मुलांमध्ये वर्ष-दोन वर्षांनंतरच्या कोट्यवधी मतदारांचा शोधण्यात येत होते. तरुण मतदारांच्या मतांचे राजकारण होते यात.

बस चूक एवढीच आहे. भारतीय तरूण खुल्या विचारांचे आहेत. त्यांची र्शद्धा कौटुंबिक मूल्यांवर आहे. त्यांना कमी वयात जगरहाटीची जाणीव होऊ लागली आहे. सोशल नेटवर्किंगला सरकार सुरूवातीलाच चुकीचे मानून त्याचे दमन करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच नेटवर्किंगवर तरूण काय करत आहेत, याची मंत्र्यांना काहीही माहिती नाही. कौटुंबिक फोटो मित्रांसोबत शेअर केले जात आहेत. कॅट, नेट, गेट, सेटची तयारी सुरू आहे, असे लिहिले जात आहे. सर्व गोष्टी खुलेपणाने सुरू आहेत. खूप काही चुकीचे देखील होत आहे. त्या गोष्टी रोखल्या जाव्यात, अशी कुटुंबाला चिंता वाटते. त्यानुसार त्यांचे काही ना काही प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी त्यांना सरकारची गरज नाही. एकूणच बघितले तर शिक्षण, आरोग्य, भविष्याविषयी नवीन पिढीत दिसणारी जागरूकता पूर्वी कधीही नव्हती.

दिल्लीतील अमानुष घटनेनंतर देशात अभूतपूर्व अशी जागृती आल्याचे दिसते. त्यात तरूणांचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. तरूण रस्त्यावर उतरल्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करणे भाग पडले होते. त्याच तरूणांनी 'संबंध ' विषयीच्या संमती वयात घट करण्याच्या प्रस्तावास जोरदारपणे नाकारले आहे. विरोधी पक्षाने तरूणांचा सूर लक्षात घेऊन हा मुद्दय़ावर सरकारला सरळ मार्गावर आणले आहे. 'भास्कर' ने देश भावनेस अनुसरून आपली जबाबदारी निभावली आहे. भारतातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूहा्या रुपाने 'भास्कर' ने आपल्या व्हिजनमध्ये सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे माध्यम बनण्याचे निश्चित केले आहे. समाजावर थोपवण्यात येणार्‍या अयोग्य आणि जनहित विरोधी बदलांच्याविरूद्ध खुलेपणाने आवाज बुलंद करणे आणि जागरूकता निर्माण करणे, या गोष्टींचा त्यात समावेश आहे. कोणत्याही विचारधारेचे राजकीय तज्ज्ञ त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या भल्यासाठी असे चुकीचे निर्णय आपल्यावर माथी थोपवू शकतात. म्हणूनच आपण, सामान्य भारतीय नागरिकांनी त्याकडे डोळसपणाने पाहिले पाहिजे. भास्कर त्यासाठी जागल्याची भूमिका निभावेल.