आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाभोवतीच निरंतरपणे फिरणारी सृष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो जन्मला तो अजन्माची आराधना करतो आहे. जो स्वयं अनंत आहे, तो अनादीची प्रार्थना करतो आहे. जो सृष्टीच्या अाधी होता तो महाप्रलयानंतरही असणार आहे. जो महाकाल आहे, तो क्षणभंगूरही आहे. ही सर्व जगन्मान्य शक्तीच्या विलासाची लीला आहे. शेवटी ही सृष्टी शिवानेच पेलली आहे. अज्ञात कारणामुळे शक्तीला स्वातंत्र्याचा बोध होतो. तेव्हा सृष्टीच्या इच्छेच्या निमित्ताने शिवाच्या हृदयातून शक्ती बाहेर पडते. या जगताची मूळ शक्ती किंवा ऊर्जा एक निष्काम कलेने पूर्ण आहे. या अर्थाने शक्ती आणि शक्तिमान कोण याला समजून घेतले पाहिजे.

हे ब्रह्म जेव्हा तिघांमध्ये विभाजित होते तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आहे. हा काल जेव्हा तिघांमध्ये विभाजित होतो, तेव्हा भूत, भविष्य आणि वर्तमान आहे. हे दोन्ही जेव्हा तीनमध्ये विभाजित होतात तेव्हा लांबी, रुंदी आणि उंची आहे. त्या आधी महाकाश आणि चिदाकाश आहे. हे सत्त्व जेव्हा त्रित्व(तीन)मध्ये विभाजित होते, तेव्हा ते सत, रज, तम असते. जग हे चक्राचे दुसरे नाव आहे, जे निरंतर चालतच असते. याला चालण्यासाठी एका स्थिर अक्षाची गरज भासते. ते फिरत नसते. स्थिर अक्षाशिवाय कोणतेही चाक फिरू शकत नाही. या अर्थाने शिव सृष्टीचे स्थिर अक्ष आहेत. ते अनंत जीवन, अनंत मृत्यूचे समष्टीसुद्धा आहेत. त्यांनी सृष्टीसाठी अमृत लोकांना वाटले आणि सृष्टी कल्याणासाठी हलाहल विष पचवले. ते मृत्युंजय आहेत. त्यामुळेच हलाहल विष त्यांच्या कंठाखाली उतरू शकले नाही. ते भुजंगांची माळ गळ्यात घालतात. त्यांच्या जटांमधून पवित्र गंगा नदी वाहते. द्वितीयेचा चंद्र जटांची शोभा वाढवतो.
ते त्रिनेत्रधारी आहेत. आपल्या तिसऱ्या डोळ्याने पापकर्मामुळे जड ओझे बनलेली धरती क्षणात नष्ट करण्याची त्यांच्यात शक्ती आहे. त्यांनी समष्टीनंतर अादिनादाचे डमरू हातात घेतलेले आहे. काळ, नियती आणि मृत्यूचा त्रिशूल एका हातात असून त्याच्या प्रहारापुढे कोणी वाचू शकत नाही. ते अनंत काळापर्यंत समाधी ग्रहण करू शकतात; परंतु प्रत्येक क्षणाला त्यांची आद्यशक्तीने रचलेल्या या सृष्टीवर कृपा निरंतर असते. ते संहारासारख्या कठोर कार्याची देवता तर आहेतच, म्हणून तर नवसृष्टीच्या नवजीवनात त्यांनी सातत्य राखले आहे. नित्य प्रलयाशिवाय निरंतर जीवन शक्य नाही. ते इतक्या विशाल अस्तित्वाची सत्ता असूनही कोणालाही प्रसन्न होणारे भोळासांब आहेत. त्यांच्या वरदानाच्या कृपेपासून ऋषी, मुनी, देवता, तपस्वीच नव्हे, तर असुर-दैत्यसुद्धा वंचित राहिलेले नाहीत. त्यांच्या साध्याभोळ्या स्वभावाची महती गाण्यासाठी एखाद्या शतकभराचा काळ लागेल. त्यांनाच नष्ट करण्यासाठी आलेल्या भस्मासुरालाही ते वरदान देण्यास संकोच करत नाहीत.

रामेश्वरममध्ये भगवान श्रीरामसुद्धा त्यांची पूजा करतात आणि ज्याचा नाश करण्यासाठी ते गेले होते तो रावणसुद्धा शिवभक्त होता. शिवाला माहिती आहे की, सर्व अभिशाप आणि वरदान मी दिलेलेच आहेत. लोकांना वाटते शिव वरदानी आहेत; पण तुमच्या तपश्चर्येचे वरदान तुम्हाला कितपत मिळायला पाहिजे, हेसुद्धा ते जाणून आहेत. तुम्ही त्या वरदानाचे काय करणार हे माहिती असूनही असा वर देतात. भस्मासुराला वर देताना त्यांना माहिती होते की, विष्णूच्या मोहिनीरूपात त्याचा मृत्यू अटळ आहे. ते महाकाल आहेत. त्यांना त्याच वेळी माहिती असते की, तुम्ही असेच कराल! मलाच मारण्यासाठी अंगावर धावून याल.
ते आद्यशक्तीचे एकनिष्ठ अतूट प्रेमी आहेत. कठोर तपश्चर्या करून तिने शिवाला प्राप्त केले होते. या देशातील स्त्रिया चांगला पती मिळावा म्हणून श्रावण महिन्यात पुण्यव्रत करते. शिवाचे स्मरण करण्याच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. समष्टी खूप दिशांना खुलते; परंतु प्रत्येक दिशेला आपण तिला पूर्ण रूपातच पाहतो. तिची एक उपमा, एक स्वरूप अर्धनारीनटेश्वराचेही आहे. ही जगत ऊर्जा आणि चेतनेच्या शक्तीपासून बनलेली आहे. या महिन्याचा महिमा पार्वतीच्या कठोर तपाशी संबंधित आहे. त्यामुळेच तर तिला शिव प्रसन्न झाले होते.
( लेखक, मध्य प्रदेश आदिवासी तथा लोककला अकादमीचे माजी संचालक आहेत.)