आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चूक लक्षात येताच जॉब्ज करत ‘फ्लिप फ्लॉपिंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी कंपनीचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत. त्यापैकी एका गोष्टीचा कुक आवर्जून उल्लेख करतात. जॉब्जकडे ‘फ्लिप-फ्लॉपिंग’ ची (आपला चुकलेला निर्णय तत्काळ बदलणे)अद्भुत कला होती.
हे असे वैशिष्ट्ये आहे की त्याचे कधीही समर्थन करता येऊ शकत नाही. कुक सांगतात की, आपल्याकडून झालेली प्रत्येक चूक स्वीकारण्याचे धाडस जॉब्ज यांच्याकडे होते. एवढेच नाही तर चुकीची जाणीव होताच ते केवळ एकाच दिवसात आपला निर्णय पूर्णपणे बदलून टाकत असत. तुम्ही चूक केली असेल तर त्यापासून धडा घ्या. चुकांकडे लक्ष देऊन वेळ घालवण्यापेक्षा भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करा. जॉब्जच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावशाली बनले, असे जॉब्स नेहमी सांगत असत.