आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंनी थोडं भान ठेवावं!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीए सरकारच्या काळात आठ खासदारांच्या जिवावर ३ केंद्रीय मंत्रिपदं मिळवण्याचा पराक्रम शरद पवारांनी केला होता. परंतु आता त्याहीपेक्षा मोठा चमत्कार रामदास आठवलेंनी करून दाखवला आहे. स्वतःच्या पार्टीचा एकही खासदार निवडून आलेला नसताना केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळाले आहे! किंबहुना, हट्टाने ते मिळवले आहे असे म्हणता येईल.

लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआय(ए)चा एकही खासदार निवडून आला नाही. एवढेच नव्हे तर स्वतः निवडून येण्याचीही खात्री नसल्याने आठवलेंनी भाजपच्या कोट्यातून राज्यसभेतली जागा कशीबशी हट्टाने मिळवली आणि भाजपनेही रणनीतीचा भाग म्हणून ती दिली. एवढंच काय तर एनडीएमध्ये राहून, अन्यायाच रडगाणं गावून, प्रसंगी सरकारविरोधी  वक्तव्य करून राज्यमंत्रिपदही मिळवलं!

सत्ताधारी पक्षाकडून इतके लाभ मिळूनही आठवले ‘अन्याय झाल्यास सरकारची अमुक गोष्ट खपवून घेणार नाही’ वगैरे भाषा करतात. अमेरिकेत जाऊन ट्रम्प ह्यांचे अभिनंदन करण्याच्या गोष्टी करतात. अशा प्रकारची हास्यास्पद भूमिका भारतासारख्या देशाच्या सामाजिक न्यायमंत्र्यांना नक्कीच शोभनीय नाही.

ट्रम्प ह्यांचा वर्णद्वेष जगद््विख्यात आहे. ट्रम्प ह्यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या विचारधारेचा आठवलेंनी कितपत अभ्यास केलाय हेदेखील एक कोडेच आहे. एकीकडे, राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावरही अमेरिकन रिपब्लिकन पार्टीचे बहुतांश सदस्य ट्रम्प ह्यांना आपल्या पार्टीचे मानत नसताना, आठवले मात्र ते जणू आपल्याच रिपब्लिक पार्टीचे सदस्य असल्याच्या आवेशात अमेरिकेत जाऊन अभिनंदन करण्याची भाषा वारंवार करीत आहेत. 

भारतामध्ये आपण विषमता दूर करून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असतानाच वर्णद्वेषी विचारसरणीचा ठपका असलेल्या ट्रम्प यांचे गुणगान गाताना आणि सरकारविरोधी वक्तव्ये करताना आठवलेंनी, आपल्या पक्षाचे खासदार,आमदार, नगरसेवक किती याचा अंदाज घेऊन, आणि परिस्थितीचा विचार करून नक्कीच थोडे भान जपण्याची आवश्यकता आहे.

- ओमकार शौचे, मास मीडिया, वायसीएमओयू, इंजिनिअरिंग, मेट, नाशिक
बातम्या आणखी आहेत...